*भस्म माहात्म्य*
-------------------------
अग्नीजन्य पण गौण भस्मामुळे अज्ञानाचा नाश होतो. अग्निहोत्राच्या अग्नीपासून झालेले मुख्य भस्म होय. विरजा व स्मार्त अग्नीपासून झालेले, समिदग्नीपासून झालेले, पंचाग्नी, दावानलाग्नी यापासून झालेले, असे पाच प्रकारचे भस्म आहे. तीन वर्णियांनी अग्नीहोत्रापासून निर्माण झालेले विरजाग्नीपासूनचे भस्म घ्यावे. गृहस्थांनी स्मार्त अग्नीपासूनचे व ब्रह्मचार्यांनी समिदग्नीपासून निर्माण झालेले भस्म लावावे. श्रोतियांच्या घरातील पाच अग्नीपासून उत्पन्न झालेले भस्म शूद्रांनी धारण करावे. विरजानल भस्माचा काल चित्रक्षत्र युक्त पौर्णिमा व रहाण्याचे ठिकाण हाच देश होय. क्षेत्र, बाग, अरण्य ही स्थळेही प्रशस्त आहेत. तेथे शुक्रत्रयोदशीला सुस्नात होऊन नित्यकर्म उरकून आचार्यांनी अनुज्ञा घ्यावी. त्यांचे पूजन करावे. शुभ्र वस्त्रे धारण करून यज्ञोपवीती करावी. पुष्पमाला घालून चंदन लावावे. दर्भासनावर बसावे. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. तीन प्राणायाम करावे. देव व देवी यांचे ध्यान करावे. ''मी हे व्रत करतो'' असे म्हणून दीक्षा घ्यावी. शरीर नाश होईपर्यंत अथवा ठराविक मुदतीपर्यंत संकल्पाप्रमाणे विरजाहोमाकरता शास्त्रोक्त अग्नी उत्पन्न करावा. आज्य, समिधा, चरू यांनी यथाविधी हवन करावे. तसेच याच द्रव्यांनी मूलमंत्राने हवन करावे. ''माझ्या देहातील तत्वे शुद्ध होवोत'' असे चिंतन करावे. पाच इंद्रिये, सात धातु, पंच वायु, मन, बुद्धी, अहंकार, तीन गुण,
प्रकृती, पुरुष, राग, अविद्या, कला, नियती, काल, माया, विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ति, शिवतत्त्व ही तत्त्वे क्रमाने असतात. विरजामंत्राच्या हवनाने ही शुद्ध होतात. नंतर गोमयाचा गोळा करून अभिमंत्रण करावे. तो अग्नीत ठेवावा. त्या दिवशी हविष्यान्न भक्षण करावे. चतुर्दशीस प्रातःकाली पूर्वोक्त सर्व क्रिया करून निराहार रहावे. पौर्णिमेच्या दिवशी तसेच करून रूद्राग्नीचा उपसंहार करून होमाची समाप्ती करावी. एकच शिखा ठेवून मुंडन करावे. स्नान करून भोजन करावे. साधकाची लज्जा नष्ट झाली असेल तर त्याने दिगंबर रहावे अथवा काषाय वस्त्र परिधान करावे. पाय धुऊन आचमन करावे व विरजाग्नीपासून झालेले भस्म धारण करावे. ते मंत्रोक्त मस्तकापासून मुख्य अंगास चोळावे व क्रमाने सर्वांग लिप्त करावे. *शिवाय नमः* या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे. नंतर पुंड्र लावावा. शिवत्याचे आचरण करावे. या प्रमाणे त्रिकाल आचरण ठेवावे. हेच पाशुपत व्रत होय. भुक्ती, मुक्ती देणारे आहे. हे पशुत्वाचे निवारण करते. हे व्रत धरून लिंगाकृत महादेवाची पूजा करावी. भस्मस्नान हे अत्यंत पुण्यकारक व सौख्य प्राप्त करून देणारे आहे. त्यामुळे आयुष्य, बल, आरोग्य संपत्ती, पुष्टी प्राप्त होते. म्हणून रक्षण, मंगल व सर्व समृद्धी यासाठी भस्मलेपन करावे. जे आपले शरीरास भस्मलेपन करतात, त्यांना महामारीपासून भय प्राप्त होत नाही. शांतिक, पौष्टिक, कामिक असे तीन प्रकारचे भस्म आहे.
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment