*महादेवाचे शारीरिक ,अध्यात्मिक आणि भौतिक वैशिष्ट्ये*
-------------------------------------------------
*राखाडी रंग"*
शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. मूळ पांढर्या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरीरावर असते. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.
*गंगा*
जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले,म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.
*चंद्र*
शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे. चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.
*नाग*
शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विश प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाटी वासुकी नाग शिवाने धारण केला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेंद्र असे संबोधले जाते.
*तिसरा डोळा*
शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.
*व्याघ्रांबर*
वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.
*गजचर्म*
शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे, म्हणून त्याला पशुपती असे म्हणतात.
*〽आध्यात्मिक वैशिष्ट्ये〽*
*उत्तम गुरुसेवक*
शंकराची महाविष्णूवर फार श्रद्धा आहे. त्याने महाविष्णूच्या पायाखालची गंगा आपल्या मस्तकी धारण केली आहे.
*महातपस्वी आणि महायोगी*
सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो.
*वैरागी*
ज्याचे चित्त अविकारी आहे असा शिव खरा जितेंद्रिय होय.
*दुसर्याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिद्ध (तयार) असलेला*
समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी शिवाने हालाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले.
*महाकालीचा आवेग शांत करणारा*
राक्षसांचा संहार करतांना महाकाली सुसाट वादळासारखी भयंकर झाली. तिला आवरणे असंभव झाले ! तेव्हा शंकराने प्रेतरूप घेतले आणि तिच्या कालनृत्याच्या वाटेत ते शिवाचे शव पडले. राक्षसांची प्रेते तुडवीत ती कालरात्री शंकराच्या शवावर आली. त्या शवाचा स्पर्श होताच कालरात्रीच्या नृत्याचे भयंकर वादळ शांत झाले, आवेग शांत झाला.
*भुतांचा स्वामी*
शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.
*देव आणि दानव दोघेही उपासक असलेला*
स्वतः श्रीविष्णू हे शिवाचे उपासक आहेत. केवळ देवच नाही, तर बाणासुर, रावण इत्यादी दानवही शिवाचे उपासक आहे
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*