Thursday, 19 April 2018

अष्टांगयोग

*अष्टांगयोग*
-------------------

ध्यानधारणेचे परिपाठ दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे प्राणायाम व प्राणरोध होय आणि दुसरा म्हणजे चित्तरोध.म्हणजे ध्यान धारणा आणि नामस्मरण होय. प्राणायाम म्हणजे योग सिद्धीसाठी नाडी साधन व त्यांचे जागरणा साठी केलेल्या श्वास प्रश्वासांचे नियमन होय.
त्या योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम,प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे आहेत. यात यमाचे पाच भाग आहेत व नियमाचेही पाच भाग आहेत.
योगाची अष्टांगे
             _*१.  यम*_ 
 *१) यम :* अहिंसा सर्व प्राण्यावर दया करून कोणाचाही प्राणघात न करणे तसेच कायिक, वाचिक, मानसिक, हिंसा न करणे. (इंद्रियनिग्रह)
 *२) सत्य :* नेहमी खरे बोलणे. प्रसंगाशिवाय खोटे न बोलणे. कारण खरे बोलणे पुण्य आहे आणि खोटे बोलणे पाप आहे.
 *३) अस्तेय :* वस्तू, पदार्थात आसक्ती ठेवू नये. त्यांची चोरी करू नये म्हणजे दुसऱ्याची वस्तू घेऊ नये व सापडली तरी तिच्यावर आसक्त होऊ नये. ज्याची त्यास परत करावी.
 *४) ब्रम्हचर्य :* विषय,वासना, इच्छा,वाढविणाऱ्या सर्व पदार्थाचा त्याग करून व वीर्याचे रक्षण करणे आणि ब्रम्हप्राप्तीचे शुद्ध पवित्र आचरण करणे हे ब्रम्हचर्य आहे.
 *५) अपरिग्रह :* शरीररक्षणास लागेल तेवढेच ठेवणे. जास्त साठा न करणे.
             *_२ . नियम_*
 *१) नियम –* म्हणजे मनुष्याला कर्तव्य परायण बनवून जीवनाला सुव्यवस्थित करणे हा नियम होय.
 *२) शौच :* शौच म्हणजे आंतरिक व बाह्य मनाची शुद्धी. ती दोन प्रकारची आहेत. आंतरिक शुद्धी म्हणजे आत्मारामाच्या ध्यानाने मन पवित्र करणे व बाह्य शुद्धि म्हणजे पाण्याने शरीर स्वच्छ करणे.
 *३) संतोष :* प्रारब्धाने अन्न व वस्त्र आदि भौतिक पदार्थ मिळतील त्यातच समाधान मानणे. समाधान हे सुखाचे मूळ आहे.
 *४) तप :* तप दोन प्रकारचे आहे. एक अंतरनिष्ठ व दुसरे बहिर्निष्ठ होय. अंतरनिष्ठ तप म्हणजे मन, इंद्रीये, विषय, विकार, गुण यांना ताब्यात ठेवून आत्मस्वरुपाकडे वळविणे.बाह्य तप म्हणजे शरीराचे आचार नीतीने चालविणे.
 *५) स्वाध्याय :* सत् शास्त्र, श्रवण,पठण करून मन आत्मस्वरूपाच्या ध्यानास लावणे.
 *६) ईश्वरप्रणिधान :* तन, मन, धन, यांच्या व्दारे ईश्वर सेवा करून मनाला आत्मस्वरूपी विलीन करणे.
            *_३. आसन_* 
आसन म्हणजे कोणत्याही प्रकारच्या बैठकीवर मन स्थिर करणे यांस आसन म्हणतात. आसन शरीराला आरोग्य प्राप्त करून देणारा उपाय आे.
          *_४. प्राणायाम_*
प्राणायाम म्हणजे श्वास प्रश्वासाने अस्थिर मनाला स्थिर करणे. घोडा लगामाने जसा आकळला जातो त्याप्रमाणे कुम्भकाने प्राण आकळला जातो, व फुफ्फुसे, छाती या अवयवांना आरोग्य प्राप्त होते.प्राणायामाने मनाची चंचलता आणि विक्षिप्त अवस्थावर विजय मिळतो.
            *_५ . प्रत्याहार_*
प्रत्याहार म्हणजे आंतरनिष्ठ व बहिर्निष्ठ इंद्रियांना विषयापासून दूर करून संयमित ठेवणे.
            *_६] धारणा_*
धारणा म्हणजे चित्ताला एक विशेष स्थानावर केंद्रित करणे व आत्मस्वरूपाकडे मनाची सर्व वृत्तीप्रवाह लावणे.
              *_७. ध्यान_*
ध्यान म्हणजे ध्येय वस्तू अर्थात आत्मस्वरूपाचे चिंतन करत चित्त तद् रूप करणे. पूर्ण ध्यान अवस्थेत अन्य वस्तूचे ज्ञान किंवा त्याची स्मृति चित्तात प्रविष्ट होत नाही.
             *_८] समाधी_*
समाधी म्हणजे चित्ताची अवस्था आहे ज्यात चित्त ध्येय वस्तूच्या चिंतनात पूर्ण रुपाने लीन होते, जीवभाव, देहभाव आणि जगभाव आत्मस्वरुपामध्ये विलीन करणे. ही समाधी होय.
आता दुसरा परिपाठ चित्तरोध आहे.त्यालाच *ध्यान धारणा* व *नामस्मरण* म्हणतात.संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे.
 *नामापरते तत्त्व नाहीरे अन्यथा ||*
*वाया आणिक पंथा जासील झणी || (ज्ञा.हरिपाठ).*
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...