*🌱दुर्वा गणपतीलाच का वाहतो?*🌱
राज्यात दुर्वेची भरपूर कुरण राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळच संपूर्ण जीवन चक्रच हिरव्या गवतावर निर्भर होतो. आता ही आहेच. भाद्रपदात सर्वत्र राना-वनात सर्वत्र हिरवीगार दुर्वा आपल्याला दिसून येते. पण पुढच्या पावसाळ्या पर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुं पासून या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा.
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवते, पर्वतांना आणि नद्यांच्या किनार्याना ढासळू देत नाही. पाण्याला स्वछ आणि निर्मळ करते. हिरवी गार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतातच शिवाय सूर्यप्रकाशात प्राणवायू ही उत्सर्जित करतात. अर्थातच पर्यावरण दृष्टीने दुर्वेचे महत्व आहे.
‘दुर्व’ धातूचा अर्थच नष्ट करणे आहे. दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते.
जसे आपण सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करतोच. तसेच मानव जीवन जीवन स्वस्थ, पुष्ट आणि आरोग्य प्रदान करणारी दुर्वा गणाध्यक्ष अर्थात राजाला अर्पित करून, त्याचा कडून दुर्वेची कुरणे सुरक्षित ठेवण्याची अपेक्षा करणे साहजिक आहे. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.
यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक :-
*काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.*
*एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च.*
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी : अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]
हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर.🙏
*श्रीधर कुलकर्णी*
*📝 ज्ञानामृत मंच*
No comments:
Post a Comment