Sunday, 21 January 2018

बारा मावळे

*बारा मावळे*
--------------------

बारा मावळे - बारा मावळ पुण्याखाली बारा मावळ जुनराखाली असे तानाजी मालुस-याच्या पोवाडयांत म्हटले आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखाच्या एका सनदपत्रांत (१६१४) बारा मावळे हे शब्द आहेत असे रा. राजवाडे सांगतात. शिवाजीमहारांज्याच्या वेळी जुन्नरापासून चाकणपर्यंत व पुण्यापासून शिरवळापर्यंत चोवीस मावळे प्रसिध्द होती. जुन्नरापासून चाकणपर्यंत पुढील मावळे प्रसिध्द होतीः-
(१) शिवनेर, (२) जुनेर, (३) मिननेर, (४) घोडनेर, (५) भीमनेर, (६) भामनेर, (७) जामनेर, (८) पिंपळनेर, (९) पारनेर, (१०) सिन्नर, (११) संगमनेर व (१२) अकोळनेर. ही बारा नेरे-नेहेरे उर्फ मावळे प्रसिध्द आहेत.

पुण्याखालील बारा मावळे पुढीलप्रमाणे आहेत - (१) अंदरमावळ, (२) नाणेमावळ, (३) पवनमावळ, (४) घोटणमावळ, (५) पौडखोरे, (६) मोसेमावळ, (७) मुठेमावळ, (८) गुंजळमावळ, (९) वेळवंडमावळ, (१०) भोरखोरे, (११) शिवतरखोरे व (१२) हिरडसमावळ
=========================
*श्रीधर कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...