*डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती*
== प्रत्येक गणेशभक्त गणपती घेत असताना डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती पाहून घेतो. त्यामागचे शास्त्र काय ते आपण या लेखात पाहू. डाव्या सोंडेच्या गणपतीकडे पहिल्यास चांगले वाटते. असा एक समज आहे, की सोंडेचे टोक उजवीकडे असलेली मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती आणि सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची, पण हे चूक आहे. सोंडेचे सुरवातीचे वळण कोणत्या बाजूकडे आहे. यावरून ठरवावे. गणेशमूर्तीतील सोंडेचे पहिले वळण जर उजवीकडे असेल व सोंडेचे तोंड डाव्या बाजूकडे वळलेले असेल, तरीही ती मूर्ती उजव्या सोंडेची आहे, असे समजावे.
*१. उजवी सोंड-*
_______उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो. सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप- पुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते. मृत्यूनंतर जशी छाननी होते, तसे मृत्यूपूर्वी दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास छाननी होते. दक्षिणाभिमुख मूर्तीची पूजा नेहमी सारखी केली जात नाही. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्विकता वाढते व दक्षिणेकडून येणाऱ्या रजलहरीचा त्रास होत नाही.
*२. डावी सोंड-*
________ डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी दिशा किवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते. उत्तर बाजू आध्यात्माला पूरक आहे. आनंददायी आहे. म्हणून बहुधा वाममुखी गणपती पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
=====================================
श्रीधर कुलकर्णी
*📝 ज्ञानामृत मंच*

No comments:
Post a Comment