*धारणा म्हणजे काय ?*
………………………………………
*धारणा म्हणजे चित्त एकाग्रता, आणि ते केले तरच साधन होईल ना.*
.
भक्ती म्हणजे ईश्वराविषयी, धर्माविषयी प्रेम. भक्तीचे नऊ प्रकार आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.. याचे श्रेष्ठत्व १ पासून ९ पर्यंत असे असते.
.
*भक्तीचेन योग देव|*
*निश्चये पावती मानव॥*
*ऐसा आहे अभिप्राव|*
*इये ग्रंथी॥*
.
श्रद्धा हा व्यक्तीचा अत्यंत मौलिक असा अलंकार आहे. आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? ही म्हण आपलेकडे प्रसिद्ध आहे. अंतःकरणात श्रद्धेचा जिवंत झरा नसेल तर भक्ती हा केवळ सोपस्कार होईल. श्रद्धायुक्त भक्तीच साधकाला मोक्ष सुखाचा अनुभव देऊ शकते. सर्वच संतांनी या भक्तीच्या नऊ पायऱ्या सांगितल्या आहेत.
.
आपण फक्त या देहाचे विश्वस्त आहोत. खरा मालक वेगळाच आहे ही धारणा अंतःकरणात पक्की झाली की पुढची सगळी कर्मे आपोआप आपले कडून होतात. नवविधा भक्तीची पहिली पायरी ‘‘श्रवण’’ ही आहे. प्रयत्नपूर्वक चिकाटीने व श्रद्धेने श्रवण केले तर खऱ्या अर्थाने दुसरी पायरी ‘‘कीर्तन’’ आपोआप होईल. कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मियता साधली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
.
भक्तीमध्ये जीवाचे ईश्वराशी नाते जोडले जाते. प्रत्येक जण कशाशी तरी कोणाशी तरी जोडलेला असतो. ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल यत्किंचितही संशय मनात असू नये. यालाच भाव असे म्हणतात. ईश्वर आहेच या दृढ विश्वासातूनच भक्ती जन्म घेते. जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्ये आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाढलेला असतो.
.
पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्चित जाणीव झाली की भाव केंद्रित होतो. आपल्या हक्काचा आणि हाताशी असलेले स्वानंद जीव गमावून बसतो याचे कारण त्याचे मन. या मनाला भगवंताकडे वळविण्यासाठीच भक्तीचे नऊ प्रकार सांगावे लागले.
.
भक्तीमध्ये ज्ञान आहे. हे ज्ञान झाल्यावाचून जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे. भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हापुन्हा त्याचेच चिंतन करीत राहतो. भक्तीमध्ये कर्म आहे. कारण भगवंतासाठी काहीतरी केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही. भक्तीमध्ये योगदेखील आहे. कारण खर्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करताकरता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो.
➖ ➖ ➖ ➖📕 ➖ ➖ ➖ ➖
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:
Post a Comment