*रूद्राक्षधारणाचे फल*
--------------------------------
रुद्राक्षाचे मुख ब्रह्मदेव व बिंदू रुद्र होय. विष्णु हे त्याचे पुच्छ आहे. ते भोग व मोक्ष देणारे आहे. पंचमुख व काटेरी लाल, पांढरे, मित्र असे पंचवीस रुद्र एका सूत्रात गुंफावेत व माला तयार करावी. मालेचा मेरु ऊर्ध्वमुख करावा. अशी माला मंत्रसिद्धी प्राप्त करून देते. तिला गंगोदकाने धुऊन पंचगव्य शिंपडून नंतर शुद्ध पाण्याने धुवावे. नंतर मंत्रांचा तिच्यावर न्यास करावा. शिवस्त्रमंत्राने स्पर्श करून शिवकवचाने एकत्र करावे. नंतर त्यावर मूलमंत्राचा न्यास करावा. '' *सद्यो जात* '' इत्यादि एकशे आठ मंत्रांनी प्रोक्षण करावे. मूलमंत्राने तिला शुद्ध भूमीवर ठेवावे. नंतर शिवाची स्थापना करावी. म्हणजे माला सर्व मंत्रसिद्धी देते. ज्या देवांचे मंत्र असेल त्यांची पूजा करावी. नंतर माला गळ्यात घालावी. नित्य रुद्राक्षमालेच्या योगाने जप करावा. सारांश, रुद्राक्ष धारण करणे हे महत्त्वाचे आहे. स्नान, दान, तप, वैश्वदेव, देवपूजा, श्राद्ध, दीक्षासमय यावेळी रुद्राक्ष धारण
करणे अवश्य आहे. त्यावेळी केलेली कर्मे नरक प्राप्त करून देतात. अपवित्र पुरुषाने रुद्राक्ष धारण करू नये. रुद्राक्ष धारण करणारा पापी असला तरी तो पापमुक्त होय असे जबालोपनिषदात सांगितले आहे. रुद्राक्ष धारण करणारे पशूही रुद्रत्व पावतात. रुद्राक्ष धारण करणारे पुरुषांच्या, म्हणजे ब्रह्मदेव, विष्णु, शिव इत्यादी देवांच्या विभूतीच होत. वेदांचे प्रतिपादन करणार्यांना रुद्राक्षाची धारणा संमत नाही. पण अनेक जन्मानंतर त्यांना रुद्राक्षाची इच्छा होते. रुद्राक्षाच्या दर्शनानेही कोटीपटीने फल पुण्ये मिळतात. रुद्राक्षमालेसहित जप केल्यास असंख्य कोटीपट पुण्य प्राप्त होते. रुद्राक्ष धारक सर्वांना अवध्य आहे. तो देव व राक्षस यांना वंदनीय आहे. रुद्राक्ष धारण केलेले कुत्रे सुद्धा मृत्युनंतर मुक्त होते. रुद्राक्षधारक उत्तम गतीला जातो. म्हणून महत्प्रयासाने रुद्राक्ष धारण करावा. त्यायोगे एकवीस कुले उद्धरतील व त्याला रुद्रलोकी मान्यता मिळेल.
@ देवीभागवत...
≠========================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment