देवीभक्तीचे महात्म्य -
सावित्री म्हणाली, "मला देवीभक्ती दे. तेच मुक्तीचे कारण आहे. ती देवी अशुभांचा नाश करते, कर्माचे छेदन करते, पापाचे हरण करते. हे धर्मराजा, मुक्तीचे प्रकार किती ? भक्तीचे स्वरूप काय ? तिचे प्रकार कोणते ? हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले तत्त्वज्ञान मला सांग. दान, यज्ञ, स्नान, व्रत, तप ही पुण्याच्या सोळाव्या कलेस पात्र आहेत. पित्यापेक्षा मातेची महती शंभरपट अधिक आहे. त्याहीपेक्षा गुरू शंभरपट जास्त आहे."
धर्मराज म्हणाला, "हे देवी, तुला मी इष्ट असा वर दिलेला आहे. माझ्या वरामुळेच तुला शक्तीची भक्ती जडेल. वक्त्याच्या व श्रोत्याच्या कुलाचे रक्षण करणारी ती देवी श्रेष्ठ आहे. हजार मुखे असून शेषही तिचे वर्णन करू शकणार नाही. मृत्युंजयसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहे. चतुर्मुख ब्रह्मदेव, सर्वज्ञ विष्णु, सहा मुखांचा कार्तिकेय, योग्यांचा गुरू गणेश, प्रत्यक्ष चार वेद हे सर्वही तिची कीर्ती सांगण्यास असमर्थ आहेत.
प्रत्यक्ष सरस्वतीही तिचे वर्णन करू शकली नाही. सनत्कुमार, धर्म, सनंदन, सनक, कपिल, सूर्य असे सर्वजण तिचे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत. मी तिचे कीर्तन कसे करणार ? साक्षात् ब्रह्मदेव, विष्णु, शिव हेही तिच्या पदकमलाचे चिंतन करीत असतात. ब्रह्मदेवापेक्षा गणेश अधिक जाणकार असून सर्वज्ञ शंभु त्याच्याहीपेक्षा अधिक जाणतो. कारण पूर्वी कृष्णाने गोलोकातील रासमंडळात एकांतात त्याला उपदेश दिला होता. नंतर पुढे शिवाने ते ज्ञान धर्मास दिले. धर्माने सूर्याला सांगितले. माझ्या पित्याने तप करून तिच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली.
हे सुव्रते, मी पूर्वी यमलोकाचे अधिपत्य घेण्याचे टाळीत होतो. मी तपाची इच्छा केली. तेव्हा पित्याने देवीचे चरित्र सांगितले. ते आता तू ऐक.
सर्वांवर नियंत्रण करणारी तसेच सर्वांचे परिपालन करणारी ती देवी नित्यरूप, देहवान्, निराकार, निरंकुश, निर्गुण, निरामय, निर्लेप अशी आहे. तिच्या विकारांना प्रकृती म्हणतात. सर्वसाक्षी, सर्वाधारभूत परात्पर, प्रकृतीमय, परमात्मा व प्रकृती परस्पर भिन्न नाहीत. ती सच्चिदानंदरूपिणी आहे.
प्रथम त्या देवीने गोपालसुंदरीरूप उत्पन्न केले, ते सुंदर, रमणीय, शामवर्ण असे किशोररूप अत्यंत लावण्यसंपन्न होते. मनोहर पद्मांची शोभाही त्याच्यापुढे फिकी पडेल. विविध भूषणांनी विभूषित चेहर्यावर स्मित असलेले, पीत वस्त्र परिधान केलेले, ब्रह्मतेजाने झळकणारे, राधेला प्रिय, रासमंडलात रत्नांच्या सिंहासनावर अधिष्ठित झालेले, हातात मुरली असलेले, द्विभुज, वनमाला धारण केलेले, वक्षस्थलावर कौस्तुभमणी विराजत असलेले, कुंकुम, अगरू, कस्तुरी, चंदन देहावर चर्चिले आहेत असे, मालतीपुष्पे ल्यालेले, भक्त ज्याचे नित्य पूजन करीत असतात असे ते रूप होते.
ज्याला जगत्कर्ताही भयभीत होऊन सृष्टी निर्माण करतो, कर्माप्रमाणे पुरुषांचा हिशोब करतो, ज्याच्यायोगे विष्णू जगताचे पालन करतो, रुद्र संहार करतो, तो योगेश्वर प्रभू ज्याच्यामुळे ज्ञानी झाला. परमानंदरूप, भक्तीवैराग्ययुक्त, शीघ्र गमन करणारे, ज्याच्या भीतीमुळे वायू वाहतो, सूर्य उष्णता देतो, इंद्र वृष्टी करतो, मृत्यु प्राण्यांमध्ये संचार करतो, अग्नी दहन करतो, दिक्पाल दिशांचे रक्षण करतात, राशीचक्रे व ग्रह फिरत असतात अशा प्रकारचे सर्वाधारभूत असे सर्वत्र संचार करणारे ते स्वरूप होते.
ज्याच्या आज्ञेने वायु जलराशींना धारण करतो, उदक कूर्माला आधार देतो, कूर्म अनंतास सावरतो, भूमी, समुद्र, पर्वत, रत्ने यांना आधार देतो, पृथ्वी क्षमारूप होते.
अठठावीस युगे हे इंद्राचे आयुष्य होय. असे अठठावीस इंद्र म्हणजे ब्रह्मदेवाची एक अहोरात्र. असे तीन दिवस झाले म्हणजे एक महिना, दोन महिन्यांचा ॠतु, असे सहा ॠतूंचे एक वर्ष, ते ब्रह्मदेवाचे आयुष्य होय. ब्रह्मदेवाचा देहत्याग होताच हरीचे नेत्र मिटतात. यालाच लय असे म्हणतात.
प्राकृतप्रलयासमयी चराचर सृष्टी वगैरे सर्व काही श्रीकृष्णाच्या नाभीकमली लीन होते. शेषशायी विष्णु कृष्णाच्या डाव्या बाजूला लीन होतो. त्याच्या ज्ञानामध्ये शिवाचा लय
होतो. दुर्गाशक्ती श्रीकृष्णाच्या बुद्धीमध्ये बुद्धीची अधिष्ठात्री देवता होते. श्रीकृष्णाचा अंश, देवांचा अधिपती जो गणपती तो त्याच्या बाहूमध्ये लीन होतो. पद्मेच्या अंशभूत देवीसहित लक्ष्मी राधेमध्ये लीन होते. गोपी वगैरे सर्व स्त्रियाही तिच्यात लीन होतात.
श्रीकृष्णाच्या प्राणांची अधिष्ठात्री देवता राधा ही कृष्णाच्या प्राणामध्ये वास करते. वेद, शास्त्रे, सरस्वतीमध्ये लय पावतात. वाणी परमात्म्याच्या जिव्हेत लीन झाली. गोपाल त्याच्या लोमात लीन झाले. प्राण वायूत, अग्नी जठराग्नीत, जल जिव्हाग्रात, विष्णूभक्त चरणकमलात लीन होतात. विराटाचे सर्व अंश महाविराटात लय पावतात. महाविराट कृष्णात लय पावतो. ज्याच्या रोमरंध्रामध्ये विश्वब्रह्मांडे असतात, त्याच्या नेत्रोन्मीलनानंतर प्राकृत प्रलय होतो. नंतर त्याचे नेत्र उघडताच पुन्हा सृष्टी निर्माण होते.
श्रीकृष्णाच्या नेत्रांच्या एका उघडझापीएवढया काळात ब्रह्मदेवाची शंभर वर्षे होतात. तेव्हा सृष्टीचा सूत्रलय होतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कणांची गणना करता येणार नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या सृष्टीची व प्रलयांची गणना करता येत नाही. त्या परमात्म्याच्या नेत्रांच्या उघडण्याच्या वेळी सृष्टी होते व नेत्र मिटताच प्रलय होतो. कृष्ण प्रलयकाली प्रकृतीमध्ये लीन होतो.
पराशक्ती एकच असून निर्गुण ईश्वर परमपुरुष होय. पूर्वी सर्व जगत् सत होते. मूलप्रकृती अव्यक्त असून ती संज्ञायुक्त आहे. तिचे गुणकीर्तन करण्यास ब्रह्मांडात कोण समर्थ आहे ?
वेदाज्ञेप्रमाणे चार प्रकारच्या मुक्ती आहेत. देवभक्ती ही सर्वात श्रेष्ठ व सालोक्य मुक्ती देणारी आहे. दुसरी सारुप्यमुक्ती, तिसरी सामिप्य मुक्ती व चवथी निर्वाणमुक्ती आहे. पण भक्तसालोक्य मुक्तीची अपेक्षा धरतात. शिवत्व, अमरत्व, ब्रह्मत्व, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, भय, शोक, धन, दिव्यरूपधारण, निर्वाण, मोक्ष या सर्वांना भक्त तुच्छ लेखतो.
कर्माचा भोग भोगल्यानेच कर्मनाश होतो. कर्माचे खंडन करणे म्हणजेच श्रीविष्णूचे सेवन करणे होय. हे सावित्री, मी तुला सर्व ज्ञान सांगितले. आता तू सुखाने स्वगृही जा."
असे म्हणून सूर्यपुत्र यमाने सत्यवानास जिवंत केले. सावित्रीने त्याला नमस्कार केला. त्याने तिला आशीर्वाद दिला. पण यम जाण्यास निघाल्याने तिला साधूवियोगाचे दुःख होऊन ती रडू लागली. तेव्हा धर्मराज म्हणाला, "पुण्यमय भारतभूमीत तू लक्ष वर्षे सुख भोगशील. शेवटी देवीलोकात जाशील. तू बहात्तर वर्षे सावित्रीव्रत कर. तेच स्त्रियांना मोक्ष देणारे आहे.
भाद्रपदातील शुक्ल, अष्टमीस महालक्ष्मीचे व्रत करतात. ज्येष्ठातील शुक्ल चतुर्दशीला सावित्रीचे व्रत करावे. हे सावित्री, हे व्रत दहा वर्षे करावे. देवीस प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक शुक्ल षष्ठीस, मंगल षष्ठीस, आषाढातील संक्रातीस व्रत करतात. कार्तिकी पौर्णिमेस, राधेस, प्रत्येक शुक्लाष्टमीस विष्णूमायेस, भगवतीस, दुर्गेस, जगदंबेस, यंत्रात संबोधून यंत्राची पूजा करावी. अशाप्रकारे देवीचे नित्य पूजन करावे."
असे सांगून धर्मराज स्वगृही गेला. सावित्री व सत्यवान स्वस्थानी परत आली. नंतर सावित्रीच्या पित्याला वराप्रमाणे पुत्र झाले. श्वशुरास नेत्र प्राप्त झाले. तसेच पुढे सावित्रीलाही पुत्र झाले.
नंतर पुण्यक्षेत्र भारतात एक लक्ष वर्षे सुख भोगून आपल्या पतीसह ती देवीलोकाप्रत गेली. ती सूर्याची अधिदेवता, मंत्रांची अधिष्ठात्री देवता, वेदांचीही माता असल्यामुळे तिला सावित्री असे म्हणतात."
=================================
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

No comments:
Post a Comment