Sunday, 21 January 2018

वयोवस्था शांती

*वयोवस्था शांती*
………………………………
आपल्या आयुष्यात पन्नास वर्षे पूर्ण झाल्या नंतर प्रत्येक पाच वर्षाने एक-एक शांत करायला सांगितली आहे. त्या शांती कशासाठी सांगितल्या आहेत ? शांती केल्यानंतर होणारे फायदे कोणते ? सर्वसाधारण कलियुगामध्ये मनुष्याची जीवनमर्यादा शंभर वर्षे मानली आहे.
ही वयोमर्यादा जास्तीत जास्त मानली आहे. भागवत ग्रंथामध्ये द्वादशस्कंधामध्ये असे वर्णन आहे की कलियुगाच्या चतुर्थ चरणामध्ये मनुष्याची वयोमर्यादा वीस ते पंचवीस वर्षे असेल. सध्या प्रथम चरण चालू आहे.
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा तीन अवस्था येतात. जन्म झाल्यापासून पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत बाल्य अवस्था. पंचवीस ते पन्नास वर्षे पूर्ण होईपर्यंत तारुण्य अवस्था. पन्नास वर्षापासून पुढे वार्धक्य अवस्था मानली आहे.

तिसर्‍या अवस्थेमध्ये म्हणजेच वार्धक्य अवस्थेमध्ये मनुष्याच्या शरीराच्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजार, आघात, कमी दिसणे, कमी ऎकू येणे अशा अनेक प्रकारच्या व्याधी जवळ येतात. पन्नास वर्षे पूर्ण झाली की     *“वैष्णवी शांत”* व पंचावन्न वय झाले की  *“वारूणी”* शांत करतात. पन्नास वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायला काही त्रास होत नाही परंतु हळू-हळू वय जेसे वढत जाते तसे आपल्याला जाणवू लागते की आता आपल्याला काम करण्यासाठी आणखी कोणाचीतरी गरज आहे. एकट्याने काम करणे अशक्य आहे. या शरीराला वेदांमध्ये रथ अशी उपमा दिली आहे. म्हणजे साठवर्षे पूर्ण झाल्यावर खूप ठिकाणी साठी शांत केली जाते. त्या साठीशांतीचे नाव। *“उग्ररथ”* शांत असे आहे. प्रत्येक पाच वर्षा नंतर वेगळी शांत सांगितली आहे तसे आपल्या शरीररूपी रथाचेही नाव बदलले जाते. पासष्टी शांत तिचे नाव  *“मृत्युंजय-महारथी”* शांत , सत्तरीशांतीला  *“भीमरथशांत”*, पंचात्तरी शांत ज्याला आपण पंचात्तरी म्हणतो त्या शांतीचे नाव  *“ऎंद्री शांत”* ऎंशी वर्षे झाल्यावर। *“सहस्रचंद्रदर्शन शांत”* करतात. तसे पंचाऎंशी वय झाले की  *“रौद्री शांत”* नव्वद वय पूर्ण झाल्यावर “सौरी शांत” या प्रमाणे पंच्यांण्णव वर्षाला  *“त्र्यंबक महारथी”*शांत व वयाची शंभर वर्षे पूर्ण झाल्यावरती जी शांत करतात त्याला   *“महामृत्युंजय”* शताब्दी शांत असे म्हणतात. या सर्व शांती शौनकऋषी व भट्टभास्कर या मुनिवर्यांनी सांगितल्या आहेत.
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...