Sunday, 21 January 2018

एेंद्री शांती

*♦……एेंद्री शांती……♦*
………………………………………
शांत का करावी याची माहिती वयोवस्था शांती या विषयामध्ये दिली आहे. यजमानंच्या पंचात्तर वर्ष पूर्ण झाल्यावर ऎंद्री शांत करतात ज्याला आपण पंचात्तरी म्हणतो. या शांतीमध्ये प्रथम पंचगव्य प्राशन, अधिकारानुसार यज्ञोपवीत ( जानवे ) धारण केले जाते. देवादिकांचे व आलेल्या गुरूजींचे आशीर्वाद घेऊन ऎंद्री शांतीचा संकल्प केला जातो. आज वयाची पंचात्तर वर्षे पूर्ण झाली त्या अनुशंगाने येणारे रोग, विविध प्रकारची व्याधी, आपत्ती, जन्म कुंडली मध्ये अनिष्टस्थानी असलेले ग्रह व त्यांची हॊणारी पीडा इ. सर्वांचा नाश हॊऊन कुटुंबातील सर्व व्यक्तिंना आयुः, आरोग्य प्राप्त होण्याच्या हेतूने ऎंद्री शांत करतो असा संकल्प करून निर्विघ्नतेसाठी गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन नांदीश्राद्ध केले जाते . गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन नांदीश्राद्ध या विषयांची माहिती अनुक्रमणिकेत गणेश पूजन
या विषया मध्ये दिली आहे.गृहशुद्धी करून ब्रह्मादीमंडलावरती कलश स्थापन करून ऎंद्री शांतीची मुख्य देवता *इंद्रकौशिक* या देवतेचे सुवर्णाच्या प्रतिमेवरती आवाहन करून बाकी परिवार देवतांचे आवाहन पूजन करतात.

बाजूला ग्रहमंडल देवतांचे आवाहन पूजन केले जाते. त्यांची कृपा यजमान यांना प्राप्त होण्यासाठी हवन केले जाते. पहिल्यांदा ग्रहमंडलातील देवतांसाठी हवन करुन मुख्य देवता इंद्रकौशिक याला समिधा, भात / तांदूळ, पायस, तूप या द्र्व्याने १००८ / १०८ या संख्येने हवन केले जाते. हवनाच्या समाप्तिनंतर बलिदान पूर्णाहुती करून सपत्नीक यजमान यांना विविध मंत्र ऎकवले जातात. आलेले आप्तेष्ट आहेर करून औक्षण करतात . या शांतीच्या सांगतेसाठी गुरूजींना दहाप्रकारची दाने विशेष सुवर्ण दान करावे असे सांगितले आहे . पाप क्षालनासाठी कासे या धातूच्या पात्रामध्ये तूप ऒतून त्यामधे यजमान स्वतःचा चेहरा पाहतात शेवटी मार्कंण्डेय ऋषिंची प्रार्थना करावी शक्य असल्यास ब्राह्मण भोजन घालावे. अशाप्रकारे ऎंद्री शांत संपूर्ण होते
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...