*मौन् सर्वर्था साधन्*
…………………………………
…………………………………
मौन म्हणजे चूप राहणे, निःशब्द असणे किंवा न बोलणे आहे. साधारणतः, याचा अर्थ अश्या प्रकारे घेतला जातो.परंतू, निःशब्दता व भारतीय लोकांत प्रचलित असलेले 'मौन' यात बराच फरक आहे.मुळात, ही एक मनुष्यजीवनातील उच्चकोटीची मानसिक स्थिती आहे.संस्कृतमध्ये या शब्दाची व्याख्या *'मुनैर्भावः इति मौन'*(मुनींच्या मनात असलेला भाव) अश्या प्रकारे केल्या गेली आहे.
*स्वरूप आणि कारणे*
शक्यतोवर, दुःख झाल्यास, भीतीमुळे,प्रकृती अस्वास्थ्य,अ़ज्ञानापोटी, न बोलण्याचे ठरवुन, प्रतिक्रिया देण्याची स्थिती टाळण्यासाठी,वाणीभंग झाल्यास,असमंजस व्यक्तिंशी सामना झाला असल्यास, अपराधीपणा वाटल्यास, पापाशन, अति कर्तुत्ववान व्यक्तिच्या दर्शनाने, भांडण/ वादावादीचा प्रसंग आल्यास,चिंतन करण्यासाठी इत्यादी कारणांमुळे सहसा मौन धारण करण्यात येते किंवा ती व्यक्ती मौन होते.
*गुण किंवा फायदे*
एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे,मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे इत्यादी असे याचे अनेक गुण व फायदे आहेत. *(मौनं सर्वार्थ साधनम्)*
*कधी मौन रहावे*
*ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे | मौन स्वीकारावे हेचि भले |*
- ज्ञानेश्वर
- ज्ञानेश्वर
वरील उद्धरणाचा चिंतन/विचार न करता बोलण्यापेक्षा मौन स्वीकारणेच उत्तम आहे.
दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसात बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात.
*आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः । बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् ॥*
-- पंचतंत्र ४.४८
-- पंचतंत्र ४.४८
अर्थ-स्वतःच्या मुखातील दोषामुळे(बोलण्यामुळे), शुक(पोपट) व मैनेस बंधनात (पिंजर्यात) ठेवले जाते. तेथे बगळ्याला मात्र बंधनात ठेवले जात नाही.(कारण तो बोलत नाही). मौनाने सर्व काही साधते.
*स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा | विनिर्मितं छादनमज्ञताया: | विशेषतः सर्वविदां समाजे | विभूषणं मौनमपण्डितानाम् ||*- भर्तृहरेः सुभाषितसंग्रह--६८
शेवटच्या ओळीचा अर्थ : विशेषत:, विद्वानांच्या समाजात मौन हे अपंडितांचे भूषण आहे.
*उच्चारे मिथुनेचैव प्रस्रावे दन्तधावने। स्नाने भोजनकालेच षट्सु मौनं समाचरेत्।।*
---हारीत नामक धर्मगंथ
---हारीत नामक धर्मगंथ
*मनुष्याने कधी मौन धारण करावे याबाबत असे साधारणतः सांगितले जाते की* -
उच्चार करण्यापूर्वी(बोलण्यापूर्वी), मैथुन करतांना,शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), दात घासतांना, अंघोळ करतांना, जेवतांना अशा सहा वेळी मौन धारण करावे
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
उच्चार करण्यापूर्वी(बोलण्यापूर्वी), मैथुन करतांना,शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), दात घासतांना, अंघोळ करतांना, जेवतांना अशा सहा वेळी मौन धारण करावे
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
No comments:
Post a Comment