*🐍🐍 नागबली महिती 🐍🐍*
सर्प योनीचा मनुष्य योनीशी निकटचा संबध आहे . विशेषत: सर्प कुलात नाग हा श्रेष्ठ आहे . अनेक धर्मग्रंथामधुन,कथांमधुन,संस्कृती मधुन नागयोनीचे अनंन्य साधारण महत्व असल्याचा आपणास बोध होतो . अशा प्रकारे नागाचे एकुण आठ कुळावंश आहेत . त्यात सर्पादीकांचा देखील समावेश आहे व अशा या नाग, सर्प कुळातील कुठल्याही सर्पाची , नागाची एखाद्या मनुष्याकडून या जन्मात अगर मागील जन्म जन्मान्तरात हत्या झाली असेल तर त्या नागकुळाचा श्राप त्या मनुष्यास व त्याच्या संपुर्ण कुळास लागतो व अशा प्रकारच्या सर्प श्रापामुळे अनेक दुष्परिणाम होतात.
उदा. वंशवृध्दी होत नाही,शिवाय काही रोग उत्पन्न्न होतात।वात,पित्त,त्रिदोषजन्य ज्वर , शुळ, उदर, गंडमाला,कुष्ठ कंडु, नेत्रकर्णमुल,मुत्रकृच्छ,आदींरोग असे रोग होऊन औषधोपचाराने गुण नसल्यास तर ते सर्प श्रापा ने उत्पन्न्न झालेले रोग आहे असे समजावे.
वरील विषयास अनुसरून काही संदर्भ
*पुत्रस्या भाजुमंदारा स्वर्भानु:शशिजीगिरा |*
*निर्बली पुत्रालाग्नेशी सर्पशापात्सुतक्षय : ||*
*निर्बली पुत्रालाग्नेशी सर्पशापात्सुतक्षय : ||*
लग्नेश राहु संयुक्ते , पुत्रशे भौम संयुते |*
कारके राहु संदृष्टे, सर्प शसर्पशापात्सुतक्षय : ||*
कारके राहु संदृष्टे, सर्प शसर्पशापात्सुतक्षय : ||*
वरील संदर्भावरून आपणास सर्प शापाच्या दुष्परिणामांचा बोध होतो.
सदर दोषाच्या निवारण हेतु शौतक ॠषींनी ''नागबली'' हा विधी सांगितला आहे . हा विधी केल्याने नाग / सर्प शापाचा दोष निवारण होऊन इच्छित फलप्राप्ती होते.
या विधीमध्ये पिष्टमय नागाचे विधीवत आवाहन पुजन करून दहन केले जाते त्याचा दोषनिवार्णार्थ अष्टबली प्रदान केले जाते व दहनांगभुत एका सुवर्णनागाचे चांदीचे पात्रात दुग्ध,घृत घालुन ब्राम्हणास दान केले जाते सदर सुवर्ण नाग दानास अनंन्य साधारण महत्व आहे.
*संदर्भ :-*
*सौवर्णभार निष्पन्न्नं नागंकृत्वातथैवगां |*
*विप्रायदत्त्वा विधीवत्पितुरा नृष्य माजवान |*
*रजतपात्रे संपुज्य विप्राय दद्यात |*
*विप्रायदत्त्वा विधीवत्पितुरा नृष्य माजवान |*
*रजतपात्रे संपुज्य विप्राय दद्यात |*
अशा प्रकारे नारायण नागबली हा त्र्यंबकेश्वर येथे विधिवत केल्याने जातकांच्या (विधीकरणाच्या व्यक्तिच्या ) पितरांना सदगती प्राप्त होते , पितरांचे आशिर्वाद व संरक्षण प्राप्त होते, त्या योगे जातक दिर्घायुषी होऊन त्यास सुखाची प्राप्ती होते सर्व रोगांचा नाश होतो दिर्घायुषी संतती प्राप्त होते व आयुष्यातील सर्व दु:ख निवारण होतात.
श्रीधर कुलकर्णी
📝 *ज्ञानामृत मंच*
No comments:
Post a Comment