Monday, 22 January 2018

कालसर्प योग

🐍🐍 कालसर्प योग :- 🐍🐍

या संपुर्ण विश्वामध्ये जेव्हा एखादा प्राणी जन्माला येतो तो क्षण , ती वेळ व त्यावेळेची नवग्रहांची असलेली गृह स्थिती ही त्या जातकासाठी अत्यंत महत्वाची असते. कारण त्या वेळेच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या सहाय्याने त्या जातकाचे संपुर्ण आयुष्याचा आराखडा आपण अभ्यासु शकतो . त्या आधारे आपण त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी घडणा-या शुभ-अशुभ घटनांविषयी सतर्कता बाळगु शकतो.

वरील प्रमाणे जातकाच्या जन्मवेळेच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने जातकांची कुंडली बनविली जाते सदर कुंडलीमध्ये बारा भाव स्थान असतात या बारा भाव स्थाना मध्ये नवग्रहांच्या स्थितीप्रमाणे वेगवेगळया प्रकारचे शुभ - अशुभ योग बनतात व सदर शुभ-अशुभ प्रभाव पडतो यातीलच एक योग म्हणजेच ''कालसर्प योग ''कालसर्प योग हा एक काष्टकारक योग मानला जातो कालसर्प योग कारक गृह म्हणजे राहु आणि केतु राहु आणि केतु हे दोन्ही छाया ग्रह आहेत चंद्राचा भ्रमण मार्ग पृथ्वीच्या भ्रमण मार्गास ज्या दोन ठिकाणी छेदतो त्यापैकी एका छेदन बिंदुस राहु व दुस-या छेदन बिंदुस केतु असे म्हणतात.

राहु हा शुभ स्थितीत असता भाग्यदायक व पराक्रमी उत्तम वैभव देतो त्याचे प्रभुत्व तंत्र मंत्र अंघोरी विद्यांचे ठिकाण असते व दुषित असता स्मृती नाश,अपकिर्ती पिशाच्च बाधा संततीला अपाय ठरतो,नेहमी अपयश येते आरोग्य बिघडते फसवणुक होते उद्योग धंद्यात नुकसान होते.

कालसर्प योगाचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात देखील आढळतो सदर ग्रंथामध्ये श्रीपाद प्रभु व नरसिंह वर्माच्या संवादात कालसर्पचा उल्लेख आहे सदर संवादात श्रीपाद प्रभु नृसिंह वर्मांना कालसर्प विषयी सांगतात.

''राहु ग्रहाचे बळ नसल्यामुळे जिवांना अनेक संकटांना तोंड दयावे लागते . आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो . *यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात *.( -श्री.अ.21 पान नं.179 ).

राहु व केतु च्या मध्ये एकाच बाजुस ( उजवे किंवा डावे बाजुस ) रवि,चंद्र,मंगळ, बुध,गुरू ,शुक्र,शनि हे सात ग्रह आले असता कालसर्प योग होतो .

कालसर्प योग आपल्या पत्रिकेत कसा होतो यांची काही उदाहरणे व कालसर्प योगाचे काही प्रकार

*अनंत , कुलीक , वासुकी शेखपाल , पदम , महापदम , तसक , कर्कोटक , शेखनाद, पातक , शेषकाम राहु केतुची भाव फले वयाचे 30 ते 42 वर्षापर्यत मिळतात कालसर्प योगाचा शुभ अशुभ परिणाम वयाच्या 08 ते 50 पर्यत जाणवतो .*

सदर कालसर्प दोष निवारणार्थ त्र्यंबकेश्वरी येऊन " कालसर्प शांती विधान " केले असता सदर दोषाची तिव्रता हळूहळू कमी होते व जातकास शुभ फल प्राप्ती होते यश ,किर्ती ,आरोग्य लाभते जातक दिर्घायुषी होतो उद्योग धंद्यात बरकत व परिवारात सुख व आनंद नांदते,संतती योग,विवाह योग,जुळुन येतात .

श्रीधर कुलकर्णी
📝 *ज्ञानामृत मंच*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...