Tuesday, 23 January 2018

वास्तुटिप्स

*वास्तुटिप्स*
-----------------

• मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णत: वर्ज्य करावेत.

• घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.

• आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते.

• कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करुन बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. सार्थचरक संहितेमध्ये या संबधीचा स्पष्ट उल्लेख आहे.

• चुकूनसुध्‍दा कोणत्याही प्रकारचे कॅक्टस किंवा काटेरी रोपटे, फ्लॅटमध्ये लावू नये. परंतु एखाद्या इसमास अशा प्रकारच्या रोपटयांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील .

•  वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.

•  काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.

•  ज्याला संतती होत नाही, अशा व्यक्तिला, अश्र्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात कोणतीही शक्ती प्राप्त करुन घ्यावयाची असेल तर अधिक शक्तीमान अशा अश्र्वत्थाचे पूजन केल्यानेे व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोचित लाभ प्राप्त होतो. (त्याचबरोबर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचारही करणे)
====================================
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...