*भिकबाळी*
〰〰〰〰
काही पुरुषांच्या कानात भिकबाळी हा एकच दागिना दिसून येतो. मुलांना दृष्ट लागू नये म्हणून नातेवाईकांनी व ओळखी-पाळखीच्यांनी "भीक" घालून दिलेल्या पैशातून ही बाळी बनवत असल्यामुळे तिला हे नाव पडले.
कितीही दागिने घातले, तरी नाकात सुंदर, मोत्यांची ठसठशीत नथ जशी स्त्री सौंदर्याला शोभा आणते, तशीच दोन टप्पोरे मोती आणि मध्ये माणिक असलेली भिकबाळी पुरुषांचं सौंदर्य खुलवते. भिकबाळीला पेशवेकालीन परंपरा असल्याचे मानतात. पेशवेकाळात बुद्धिमत्ता, कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर वस्त्रे, पगडी देऊन जेव्हा एखाद्याचा सन्मान केला जाई, त्यावेळी भिकबाळी दिली जात असे. भिकबाळी ही स्वतहून घालण्याची पद्धत नव्हती, ती सन्मानाने प्रदान करण्याची गोष्ट होती, अशा काही गोष्टी भिकबाळीबद्दल सांगितल्या जातात. भिकबाळी ही उजव्या कानाच्या वरच्या बाजूला घातली जाते.
〰〰〰〰🌷〰〰〰〰〰
*सं:- श्रीधर कुलकर्णी*

No comments:
Post a Comment