Sunday, 21 January 2018

प्रपौत्र मुखदर्शन विधी

*🔥॥ प्रपौत्र मुखदर्शन विधी ॥*🔥

पणतू झाल्यावर हा विधी अवश्य करावा. पपौत्रमुखदर्शन होणे याला खूप महत्व सांगितले आहे. खूप कमी प्रमाणात हा विधी होतो. पणजी व पणजोबा यांनी आपल्या पणतूचे मुखदर्शन घेण्याचा विधी असून, याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते त्याचबरोबर सर्व पुण्यतिर्थांचे, सर्व प्रकारची दान केल्याचे पुण्य मिळते एवढे महत्व आहे. ( पणजोबा – पणजी काही कारणामुळे पूजेला बसू शकत नसतील तर फक्त संकल्प त्यांच्याकडून करून घ्यावा व बाळाच्या आई – वडिलांनी पुढचे सर्व विधी करावे. ) प्रथम पणजोबा – पणजी यांना बसवून शरीरशुद्धीसाठी पंचजव्य देऊन अधिकारानुसार पणजोबांना यज्ञोपवीत (जानवे) घातले जाते. जिच्या आशीर्वादाने हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आला त्या कुलदेवी – कुलदेव यांच्यासाठी विडा – नारळ , ग्रामदेवता , सद्गुरू , वास्तूदेवता यांच्यासाठी विडे ठेवले जातात. आलेले गुरूजी मंगलाचरण म्हणून मुख्य संकल्प करून घेतात. त्याच्या अंगभूत कार्य निर्विघ्नतेने होण्यासाठी गणेश पूजन, मांगल्यार्थं पुण्याहवाचन , हिंसा निवारणार्थ मातृका पूजन , पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी नांदीश्राद्ध केले जाते. हे विषय जवळपास सर्व धार्मिक कार्यामध्ये होत असल्यामुळे याची माहिती अनुक्रमणिकेमध्ये गणेशपूजन …………………………

या विषयामध्ये सविस्तर दिलेली आहे. यानंतर प्रत्यक्ष जाऊन गंगापूजन करणे अशक्य असल्यामुळे कलशामध्ये गंगामाईचे आवाहन करून पूजन केले जाते. सर्व मंडळी, यजमान यांच्यावरती अभिषेक केला जातो. पणजी – पणजोबा , पूजेला बसलेले सपत्नीक – यजमान पापक्षयार्थं कासे या धातूच्या पात्रामध्ये तूप ओतून स्वतःचे मुख पहावे. नंतर सुवर्णाचा दिवा घेऊन बाळाचे औक्षण करावे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पणजी – पणजोबा यांनी पणतूचे मुखकमल न्याहाळावे. या आनंदामध्ये सुवर्णाची शंभर / दहा फुले उधळावी. प्रत्येक फूल अर्पण केल्यावर एका यज्ञाचे फळ मिळते. सर्व पापातून मुक्त करणार्‍या विष्णूचे पूजन करून त्याला पायस ( खीर ) याचा नैवेद्य दाखवावा. त्याची प्रार्थना करावी. ब्राह्मणांना गोप्रदान करून विष्णू प्रतिमा दान द्यावी. आलेल्या सर्वांना पेढे इ. वाटून कार्यक्रमाची सांगता करावी.
〰〰〰〰♦〰〰〰〰
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...