Sunday, 21 January 2018

कुंभविवाह

🔺 कुंभविवाह🔺
〰〰〰〰〰〰〰

कन्येचा विवाह करणारा पिता इत्यादिकाने

*"कन्यावैधव्यहरं कुंभविवाहं करिष्ये"*

असा संकल्प करून नान्दीश्राद्धांपर्यंत कर्म करून

*'मही द्यौ०"*

इत्यादि मंत्राने कुंभाची स्थापना करावी. नंतर त्या कुंभावर वरुणाचे प्रतिमेचे ठिकाणी वरुणाची पूजा करून कलशाचे मध्यभागी विष्णूचे प्रतिमेचे ठिकाणी विष्णूची षोडशोपचार पूजा करून प्रार्थना करावी. प्रार्थनेचे मंत्र

*"वरुणाङ्गस्वरूपाय जीवनानां समाश्रय । पति जीवय कन्यायाश्चिरं पुत्रसुखं कुरु ॥*
*देहि विष्णो वरं देव कन्यां पालय दुःखत ।"*

याप्रमाणे प्रार्थना केल्यावर

*"विष्णुरूपिणे कुंभाय इमां कन्या श्रीरूपिणी समर्पयामि"*

असे वाक्य उच्चारून कन्या कुंभस्वरूपी विष्णूला अर्पण करावी. नंतर "परि त्वा०" इत्यादि मंत्रानी खाली व वर कुंभ व कन्या यांना मंत्राच्या आवृत्तीसह सूत्राने वेष्टन करावे. नंतर कुंभ एकीकडे काढून जलाशयामध्ये टाकून द्यावा. शुद्धोदकाने "समुद्र ज्येष्ठा०" इत्यादि मंत्रानी कन्येवर पंचपल्लवयुक्त अभिषेक करावा. आणि ब्राह्मणांना भोजन घालावे. याप्रमाणे कुंभविवाह सांगितला.
@ धर्मसिंधु....
〰〰〰〰♦〰〰〰〰
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...