*भीमरथी शांती*
----------------------
*( सप्ततितमे वर्षे क्रियमाणा )*
सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावरती ही भीमरथी ( सत्तरी शांत ) केली जाते. जन्मदिवशी , जन्मनक्षत्रावर, चंद्रबल असेल त्यावेळी किंवा शुभ दिवस पाहून ही शांती करावी. यजमान सपत्नीक आसनस्थ होतात. त्यांच्या शरीरशुद्धीसाठी पंचजव्य प्राशन केले जाते. अधिकारानुसार यज्ञोपवीत धारण केले जाते. कुलदेवता, वडीलमंडळी यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन कार्याला प्रारंभ केला जातो. प्रथम आलेले गुरूजी मंगलाचरण पंचांग म्हणून संकल्प केला जातो. त्याचा भावार्थ असा…….
भविष्यात संभाव्यमान सूचित नानाप्रकारचे रोगव्याधी, वाईट स्वप्न पडणे, नवग्रह पीडा परिहार, पत्नी-पुत्र वियोग इ. संकटांचा परिहार होऊन कुटुंबाला आयुष्य, आरोग्य, सुख, शांतता प्राप्त होण्याच्या उद्देशाने भीमरथी शांत करतो. त्याच्या अंगभूत ( गणेश पूजन पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध केले जाते.
हे विधि झाल्यानंतर गृहशुद्धी केली जाते. आलेले गुरूजी या शांतीची मुख्य देवता मृत्युंजय, वरूण या देवतांची स्थापना करतात त्यांच्या आधारभूत ब्रह्मादीमंडल देवता यांचीसुद्धा स्थापना पूजा करतात. त्यानंतर ग्रहमंडल देवतांची स्थापना पूजा होते. या सर्व देवतांच्यासाठी हवन केले जाते. मुख्य देवता मृत्युंजय १००८ / १०८ या संख्येने तीळाचे हवन केले जाते. बलीदान, पूर्णाहुती करून यजमानांच्या आयुष्यवृद्धीसाठी विविधसूक्ते म्हटली जातात. ब्राह्मणाना दीप दान सांगितला आहे. आशीर्वाद घेऊन आलेले आप्तेष्ट यजमान दंपती यांना आहेर करून औक्षण करतात व पेढे वाटले जातात. अशाप्रकारे भीमरथी शांत संपन्न होते.
=========================📓
*सं:- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment