Monday, 22 January 2018

*देवतेला नैवेद्य दाखवणे*

*देवतेला नैवेद्य दाखवणे*
_______________________

 नैवेद्यासाठीचे पदार्थ बनवतांना तिखट, मीठ आणि तेल यांचा वापर अल्प करावा अन् तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर अधिक करावा. 
नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान घ्यावे.
 नैवेद्यासाठी सिद्ध केलेल्या पानात मीठ वाढू नये. 
 देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी ते अन्न झाकून ठेवावे.

             नैवेद्य दाखवतांना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करून देवासमोर भूमीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे पान (किंवा ताट) ठेवावे. नैवेद्याचे पान ठेवतांना पानाचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करावे. 

      नैवेद्य दाखवतांना ताटाभोवती एकदाच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाणी फिरवावे. (पाण्याचे मंडल काढावे.) परत उलट्या दिशेने पाणी फिरवू नये.
➖➖➖➖➖➖📕
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...