*वज्रगोपिकानाम*
---------------------------
*भाग :- ९..*
संस्कृत भाषेत अपवाद शब्दाचा प्रयोग दोन अर्थात केला जातो असे व्याकरणामध्ये सामान्य विधि (उत्सर्ग) चा विशेष विधि द्वारा बाध वा संकोच होतो तेव्हा त्या विशेष नियमाला सामान्य नियमाचा अपवाद असे म्हटले जाते. पूर्व मीमांसा धर्मशास्त्रामध्येही अपवाद शब्दाचा याच अर्थामध्ये प्रयोग होत असतो असे वेदामध्ये 'मा हिंस्यात सर्वाभूतानि' (कोणाही भूताची हिंसा करू नये.) हा सामान्य नियम आहे, पण काही यज्ञात विधीने पशुहिंसा सांगितली आहे, तो तेवढ्यापुरता अपवाद (म्हणजे सामान्य नियमाचा बाध) समजला जातो. साहित्यशास्त्रात अपवाद शब्द दुसर्याच अर्थाने योजिला जातो. असे परापवाद, मिथ्यापवाद इत्यादी येथे अपवाद शब्द कलंक या अर्थाने योजिला आहे. एक कथा आहे - एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी होती, त्या दिवशी सायंकाळी पूजापात्रात दूर्वा, पुष्पे, अक्षता, चंदन इत्यादी पूजासाहित्य घेऊन चंद्रावली नामक गोपी चंद्राला अर्घ्य देण्याकरिता निघाली, रस्त्यात अकस्मात नारदमहर्षी भेटले. त्यांनी विचारले की, "अग तू आज हे काय करीत आहेस ? तुला वेड तर लागले नाही ? आज चतुर्थी आहे, आज चंद्रदर्शन निषिद्ध आहे." चंद्रावली म्हणाली, महाराज 'आज चंद्रदर्शन केल्याने काय होते ? नारद म्हणाले, "निष्कारण कलंक लागतो - आळ येतो." चंद्रावली म्हणाली, "तेच तर मला पाहिजे आहे. माझ्या अन्य सख्यांकडे श्रीकृष्ण पाहतात, हसतात व बोलतात. त्यांच्या घरी जातात, पण या जगात मीच एकटी अशी भाग्यहीन कलंकिता आहे की माझ्याकडे ते पाहतही नाहीत. मी अशी अपेक्षा करते की, सत्य भाग्यात नाही, तर खोटा आळ तरी माझ्यावर यावा की श्रीकृष्ण भगवान माझ्याकडे पाहतात, बोलतात, माझा त्यांच्यांशी सबंध आहे. असा खोटा आळ आला तरी त्यात माझा गौरवच आहे !
*मिथ्यापवादवचसाप्यभिमानसिद्धिः । *
असो. येथे सूत्रात जो अपवाद शब्द आहे तो व्याकरण व धर्मशास्त्रातील अर्थाने नसून व्यावहारिक कलंक (दोष) या अर्थाने घ्यावा. भक्ताच्या जीवनात प्रभूंच्या महात्म्यज्ञानास विसरणे हा कलंक आहे, पण असा कलंक गोपिकांच्या जीवनात मुळीच नाही, तर त्यांना पूर्ण महात्म्यज्ञान होते हे वरील विवेचनावरून सिद्ध होते. कित्येक वेळी गोकुळातील गोप-गोपी, नंद-यशोदा याच्या व्यवहारात त्यांना महात्म्यज्ञानाची विस्मृती झाली होती की काय असा भास होतो; पण तो भासच आहे, ती विस्मृती भगवानच मुद्दाम घडवून आणीत होता. असे जर न होईल तर दासबंधनादि लीलाच संभवल्या नसत्या. पण एवढ्याने महात्म्यज्ञानाचा अभाव मानता येत नाही. गोपिका वियोगावस्थेत जे गीत गायल्या त्यात पदोपदी महात्म्य ज्ञानाचा प्रत्यय येतो.
माझ्या अनन्य भक्तांना मी अज्ञानी ठेवीत नाही, मीच त्यांना बुद्धियोग देतो व त्यांच्या हृदयातील अज्ञानांधकार ज्ञान-दीपाने दूर करतो असे श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेच्या दहाव्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे.
श्रीमद्भागवत दशमस्कंध अध्याय ब्याऐंशीमध्ये श्रीकृष्णानी स्वतः गोपिकांना अध्यात्मज्ञान सांगितले.
*अध्यात्मशिक्षया गोप्य एवं कृष्णेन शिक्षिता ॥*
*तदनुस्मरणध्वस्तजीवकोशास्तमध्यगन*
भागवत १० - ८२ - ४८
========================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment