*वज्रगोपिकानाम*
---------------------------
*भाग :- ७..*
क्षीरसागरनिवासी लक्ष्मीही तुझ्या चरणरजाची इच्छा करते. तुझा अवतार या व्रजात झाल्यापासून ही लक्ष्मी येथे कायमची वास्तव्य करून आहे. तू या व्रजातील सर्वांचेच भय दूर करीत आहेस, तुझ्या सौंदर्याने त्रैलोक्याला शोभा प्राप्त होत असते. तू केवल गोपिका (यशोदा) नंदन नव्हेस, तर अखिल प्राणिमात्रांचा अंतरात्मा साक्षी आहेस. जे तुला अनन्यशरण होतात त्यांना तू सर्व पातकांपासून मुक्त करतोस.
ब्रह्मदेवाने या विश्वाच्या रक्षणाकरिता तुझी प्रार्थना केली होती, त्या प्रार्थनेवरून तू हा अवतार धारण केला आहेस, हे देवाधिदेवा, अनेक भक्त या दुःखमय संसारापासून मुक्त होण्याकरिता तुझाच आश्रय घेतात. आणखीही गोपी असे वर्णन करतात की, हे श्रीकृष्णा ! तुझ्या लीलाकथाही अमृतस्वरूप आहेत. विरहाने तप्त झालेल्या लोकांना शांत करणार्या आहेत. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांनी त्यांचे गायन केले आहे. त्यांच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. त्या कथा सर्व पाप तर नष्ट करतातच, त्याबरोबर परम मंगल कल्याणाचे दानही करतात, जे तुमच्या या लीलाकथांचे गायन करतात. तेच या भूलोकात मोठे दान करणारे असे म्हणविले जातात. त्यांच्याच द्वारा जगावर सर्वांपेक्षा अधिक उपकार होतात. तुमच्या कथेचे जर हे माहात्म्य आहे तर प्रत्यक्ष संगसौख्याचे वर्णन कोण करू शकेल ?
श्रीमद्भागवत दशमस्कंध, अध्याय एकोणतीस ते तेहतीसमध्ये जे रासलीलेचे वर्णन आहे त्यावरून व्रजवासी गोपिकांना महात्म्यज्ञान किती पूर्ण होते हे सहज सिद्ध होते.
गोपिकांच्या महात्म्यज्ञानाचे श्रीएकनाथमहाराज, श्रीकृष्ण-उद्धव संवाद प्रसंगी वर्णन करीत आहेत -
*नवरसांचा रसिक । नवरंगडा मीचि एक । *
*यालागी माझ्या कामी कामुक । भावो निष्टंक गोपिकांचा ॥ *
*जीवा आतुलियें खुणें । मीचि एक निववू जाणे । *
*ऐसें जाणोनि मज कारणें । जीवें प्राणें विनटल्या ॥ *
*अंगी प्रत्यंगी मीचि भोक्ता । सबाह्य सर्वांगें मीचि निवविता ।*
*ऐसें जाणोनि तत्त्वतां ।* *कामासक्तता मजलागी ॥ *
*ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजी मीचि एक । **
*हा गोपिकी जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियला ॥*
एकनाथी भागवत, अ. १२. १९७ - २००
श्रीतुकाराममहाराज ही म्हणतात -
*लोका गोकुळीच्या झालें ब्रह्मज्ञान । केलिया वांचून जपतपें ॥ *
*जपतपे काय करावी साधनें । जंव नारायणें कृपा केली ॥ *
*सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ॥*
व्रजवासी गोपिकांना सामान्य समजणे हे घोर अज्ञान आहे. स्वतः चतुर्मुख ब्रह्मदेव श्रीकृष्णापुढे त्यांचे वर्णन करीत आहे -
*अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा ॥ *
*यासां विभो वत्सतरात्मजात्मना यतृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥* -
भागवत १० - १४ - ३१
'मोठमोठे यज्ञ तुमची तृप्ती करू शकत नाहीत, परंतु या व्रजातील गायी व गोपिकांची धन्य आहे, ज्यांची वासरे व बालके बनून तुम्ही मोठ्या आनंदाने त्यांचे दुग्ध प्राशन केले आहे.'
भक्तवर्य उद्धव तर आपली आत्यंतिक अभिलाषा प्रकट करून म्हणतो -
आसामहोचरणरेणुजुषामहं स्यां वृन्दावने किमपि गुल्मलतौषधीनाम ।
या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुन्दषदवीं श्रुतिभिर्विमृग्याम ॥ - भागवत १० - ४७ - ६१
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment