*कथा श्रीकृष्णजन्माची*
-----------------------------------
बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी, धेनुक बाणासुर, भौमासुर इत्यादि पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला.
तेव्हा ते भयभीत होऊन कुरू, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना *अनंत* असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले.
मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. "देवी ! कल्याणी ! तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहात आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. हे कल्याणी ! नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. सर्व वर देण्यास समर्थ असणार्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, नैवेद्य इत्यादि अर्पण करून तुझी पूजा करतील. लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादि अनेक नावे ठेवतील. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात ’ *संकर्षण* ’ म्हणतील, तो लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम म्हणतील, आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे ’बल’ सुद्धा म्हणतील. (६-१३)
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने "जशी आपली आज्ञा’ असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला, तेव्हा तेथील नागरीक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला, असे म्हणू लागले.
भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. जगाचे मंगल करणार्या, सर्वात्मक व आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. (येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता.) घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसर्याला न देणार्या गर्विष्ठ ज्ञान्याच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचासुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहात असूनही लोकांना जाणवला नाही. (हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती.) देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या देहर्यावर पवित्र हास्य होते; आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा तो मनात म्हणू लागला की, "यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत. कारण यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. आता या बाबतील मला लवकरात लवकर काय केले पाहिजे बरे ? देवकीला मारणे तर उचित होणार नाही. कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपलापराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून, माझी बहीण आहे. तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तत्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. जो अत्यंत क्रूरपणे वागतो, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात, इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो." कंस जरी देवकीला मारू शकत होता, तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारापासून परावृत्त झाला. आता भगवंतांच्याबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला. (भगवत् सान्निध्यामुळेच त्याचे दुष्ट विचार मावळले.) तो उठता, बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपेत आणि चालता-फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसु लागले
========================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment