*अनंत व्रत*
----------------
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजाकरून हे व्रत पूर्ण करतात. मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्याला १४ गाठी असतात.
प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.
दोर्यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्या ग्रंथीपर्यंत वहाणार्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे.
१४ गाठींच्या दोर्याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.
यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते.
जिवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प-अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात.
हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते.पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.
*पूजेचे स्वरूप*
हे व्रत भाद्रपद शु. चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्त असेल तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम मानतात. व्रत करणार्याने त्या दिवशी प्रात:स्नान करून
*'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये* *'श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'*
असा संकल्प सोडून जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी.
*नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर ।*
*नमस्ते सर्व नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"*
असा श्लोक म्हणून नमस्कार करावा
त्याच्यापुढे १४ गाठींचा रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात.त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात.कुंभातील जळाला *यमुना* म्हणतात.शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात.पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात.नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात.जुन्या दो-राचे विसर्जन करतात.वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.
*न्यूनातिरिक्तानिपरिस्फुटानि यानीह कर्माणि मया कृतानि ॥*
*सर्वाणि चैतानि मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'*
या मंत्राने विसर्जन करावे आणि
*दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव विष्णु: ।*
*तस्मात्त्वया सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'*
या मंत्राने वाण द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .
या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात.पूजा करतात. हातात ' *अणत* ' बांधतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment