Sunday, 21 January 2018

सहस्त्र चद्र दर्शन शांती

*सहस्त्रचंद्र दर्शन शांती*

〰〰〰〰〰〰

  *( अशीतितमे वर्षे प्राप्ते )*
 ऎंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतर सहस्रचंद्रदर्शन शांती केली जाते. 
ऎंशी वर्ष पूर्ण झाली की त्या मनुष्याच्या आयुअष्यात १००० चंन्द्र पाहून होतात म्हणून ही शांत विशेष सांगितली आहे तसेच या शांतीची मुख्य देवतासुद्धा चन्द्र हीच आहे. सपत्नीक यजमान आसनस्थ होतात शरीरशुद्धीसाठी पंचगव्य प्राशन, अधिकारानुसार यज्ञोपवीत धारण करून कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरू, वास्तुदेवता तसेच घरातील वडिलधारी मंडळी या सर्वांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मुख्य शांतीच्या कार्याला प्रारंभ होतो. हातामध्ये अक्षता घेऊन यजमान संकल्प करतात ईश्वराच्या कृपेने ऎंशी वर्षे पूर्ण झाली वयोमानानुसार येणारे नानाप्रकारचे रोग, व्याधी, तसेच कमी दिसू लागणे, भिती वाटणे, पत्नी-पुत्र यांचा वियोग, जन्मकुंडली मध्ये अनिष्ट फल देणार ग्रह ही सर्व विघ्न दूर हॊऊन सर्व कुटुंबाला आयुष्य, आरोग्य लाभावे या हेतूने सहस्रचंद्रदर्शन शांती करतो असा मुख्य संकल्पा बरोबर निर्विघ्नतेसाठी गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध करतो असे उपसंकल्प केले जातात . गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध हे विषय जवळपास सर्व ठिकाणी येत असल्या करणाने याची माहिती अनुक्रमणिकेमध्ये गणेशपूजन……………………………

या विषयामध्ये सविस्तर दिली आहे. नांदीश्राद्धा पर्यंतचे विधी पूर्ण केल्यावर आलेले जुरूजी गृहशुद्धी करण्यासाठी पिवळी मोहरी, पंचगव्य, शुद्धपाणी हे सगळीकडे शिंपडतात. ब्रह्मादीमंडल देवतांचे आवाहन पूजन करून त्या देवता वस्त्राने झाकून तांदूळाची रास करून त्यावर विधिवत् कलश स्थापना त्यावरती वरूण पूजन करतात. बरोबर सहस्रचंद्रदर्शन शांतीची मुख्य देवता चन्द्र, मृत्युंजय, सूर्य आणि यजमानांच्या जन्मनक्षत्र देवता याची आवाहन पूजन केले जाते. हवन करण्यासाठी अग्नि स्थापन करून ग्रहमंडल देवतांचे आवाहन पूजन होते. हवनाला प्रारंभ………

ग्रहमंडल देवतांचे प्रथम हवन होते यामध्ये बेचाळीस देवता असून त्यांच्यासाठी समिधा, भात / तांदूळ, तूप काही ठिकाणी तिळ घेतले जातात. मुख्यदेवता चन्द्र १००८ / १०८ वेळा तूपाची आहुती देतात परिवार देवतांच्यासाठी हवन केले जाते. येथे हवनाचा विषय पूर्ण होतो. यजमानांच्या आयुष्य वृद्धीसाठी ऋग्वेदा मधील काही मंत्र आलेले गुरूजी पठण करतात. आवाहन केलेल्या सर्व देवता संतुष्ट होवून भूत, प्रेत इ वाईट शक्ति यांचा उपद्रव न होण्यासाठी बलिदान करून कर्माची सांगता म्हणून पूर्णाहुती करतात. सर्व घरातील मंडळी यजमान यांच्यावरती गुरूजी अभिषेक करतात. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र बदलावे पहिले वस्त्र मुख्य गुरूजींना द्यावे. सप्तचिरंजीव मार्कण्डेय यांची प्रार्थना करून पाप क्षालनासाठी कासे या धातूच्या पात्रामध्ये तूप ओतून त्यामधे चेहरा पाहतात. आयुष्य वाढण्यासाठी थोडे दूध, तिळ, गूळ हे एकत्र करून मंत्र म्हणून प्राशन करतात. आलेल्या गुरूजींना दहा प्रकारची दाने करायला सांगितली आहेत आलेले पाहुणे मंडळी यजमान दंपती यांना आहेर करून औक्षण करतात. पेढे वाटून कार्याची सांगता होते. आता ऎंशी वर्षामध्ये १००० चंन्द्र दर्शन कसे होते ते पाहू……………

ऎंशी वर्षामध्ये प्रत्येक महिन्यातील शुद्ध द्वितीया या तिथीला चंद्रदर्शन + पुरूषोत्तम मास ( अधिक महिना ) +ग्रहणाचे दिवस असे मिळून एक हजार चन्द्रदर्शन पूर्ण होते.
〰〰〰〰📕〰〰〰〰
*संकलन - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...