Sunday, 21 January 2018

उग्ररथ शांती

*उग्ररथ शांती*
----------------------

साठ वर्षे पूर्ण झाल्यावर ही साठीशांत करतात. या शांतीचा उद्देश साठ वर्षानंतर अपमृत्यु, वाईटस्वप्न दिसणे, आई-वडील, पत्नी, पुत्र यांचा वियोग, पिशाच्च बाधा इ. घडू नये म्हणून साठीशांत करतात त्याला उग्ररथ शांत असे नाव आहे. गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध हे विधी केले जातात. 

 आलेल्या गुरूजींमार्फत ग्रहमंडल देवतांचे आवाहन पूजन करून बाजूला ब्रह्मादीमंडल देवतांची पूजा करतात. त्यावरती कलश स्थापन करून या शांतीची मुख्य देवता मार्कण्डेय याची विधिवत् पूजा होते. त्या देवतांच्या प्रीतीसाठी मुख्यदेवतेला तसेच परिवार देवतांना हवन केले जाते. बलीदान, पूर्णाहुती करून यजमानांच्या आरोग्यासाठी विशेष मंत्र ऎकवले जातात. यजमान मार्कण्डेय देवतेची प्रर्थना म्हणून अर्धा वाटी दूध घेऊन त्यामध्ये तीळ व गूळ घालून मंत्र म्हणून प्राशन करतात. आलेले आप्तजन यजमान व यजमानपत्नी यांचे औक्षण करून त्यांना पेढे वाटतात. या शांतीमध्ये ब्राह्मणांना सुवर्ण, कासे या धातूचे पात्र दान करावयास सांगितले आहे.
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...