Sunday, 21 January 2018

मृत्युजय - महारथ शांती

*मृंत्युजय-महारथ शांती*
----------------------------------

वयाची पासष्ठ वर्षे पूर्ण झाली की करतात. यजमानांच्या जन्मदिवशी किंवा शुभ दिवस पाहून शांत करावी. यजमान सपत्नीक बसून शरीरशुद्धीसाठी पंचगव्य प्राशन करून अधिकारानुसार यज्ञोपवीत धारण करतात. कुलदेवता, वडील मंडळी यांना वंदन करून कार्याला प्रारंभ होतो. पंचाग वाचून यजमानांना संकल्प सांगितला जातो. त्याचा भावर्थ असा- पासष्ठ वर्ष मला पूर्ण झाली आता येणारी संकट दृष्टीमाल्य, भितीवाटणे, धन-धान्य नाश होणे, ग्रहांची पीडा या सारखी असिष्ट येऊ नयेत म्हणून महारथी शांत करतो असा संकल्प करून (गणेशपूजन, पूण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्द ) हे विधी केले जातात.
  कलशावरती मुख्यदेवता मृत्युंजयमहारथ या देवतेची प्राणप्रतिष्ठा पूर्वक आवाहन, पूजन करतात. या देवतेची यजमानांना कृपा लाभावी म्हणून जप केला जातो. ग्रहमंडल देवता, मुख्यदेवता, ब्रह्मादीमंडल देवता यांच्यासाठी हवन केले जाते. वेदांमधील वेग-वेगळी सूक्त यजमानांना ऎकवली जातात. नंतर बलीदान, पूर्णाहुती करून अभिषेक करतात. आयुष्याची वृद्धी होण्यासाठी दूध, तीळ, गूळ हे एकत्र प्रमाणात घेऊन मंत्र म्हणून यजमान प्राशन करतात. पाप क्षालनासाठी कासे धातूच्या पात्रामध्ये तूप घालून त्यामध्ये स्वतःचा चेहरा पहावा. ब्राम्हणांना गाय, भूमी, तीळ, सुवर्ण अशी दहा प्रकारची दाने द्यायला सांगितली आहेत. आलेले आप्तेष्ट यजमान व पत्नी यांना आहेर करतात. पेढे वाटतात. येथे कार्याची सांगता होते.
========================📓
*सं:- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...