Sunday, 21 January 2018

हिमालय पर्वत समुह

*🏔 हिमालय पर्वत समुह*🏔
------------------------------------

 पहिला विभाग हिमालय पर्वत आणि त्यांच्या दक्षिणेकडे गेलेल्या श्रेणी होत. हा भाग जगांत सर्वांत उंच आहे. टॉलेमीनें हिमालयपर्वतांनां एमोडस असें नांव दिलें होतें. यांचा आकार जंबीयासारखा असून पात्याचा भाग दक्षिणेकडे आहे. हीच हिंदुस्थानची १५०० मैलांची उत्तर सरहद्द होय. या सरहद्दीच्या ईशान्य कोणाशीं तिबेटची सानपो आणि आसामची ब्रह्मपुत्रा यांनां जोडणारी दिहांग नदी श्रेणीच्या मध्यांतून वर उसळली आहे. समोरच्या बाजूस म्हणजे वायव्य कोणाशीं सिंधू ही हिमालयाला फोडून खालीं पंजाबांत उतरते. हा ओसाड पर्वतप्रदेश पुष्कळ ठिकाणीं माणसांनां आगम्य असा असून आधुनिक लष्कराला तर कोठेंच वाट देत नाहीं. प्राचीन प्रसिध्द व्यापारी मार्ग अद्याप आहेतच. त्या मार्गांनीं पंजाबाचा माल १८००० फूट उंचीवरल्या पूर्वतुर्कस्तान आणि तिबेट या देशांत जातो. मुझतक, काराकोरम आणि चंचीनमो हे मार्ग सर्वांत जास्त प्रसिध्द आहेत.

हिंदुस्थानच्या उत्तरेस आपली दुहेरी भिंत घालून हिमालयानें त्याचें संरक्षण केलें आहे. एवढेंच नसून पूर्व आणि पश्चिम टोंकापासूनहि दक्षिणेस श्रेणी पाठवून ईशान्य आणि वायव्य सरहद्द घालून मजबूत केली आहे. ईशान्येकडे या श्रेणींना नागा आणि पटकोई पर्वत म्हणतात व ते आसामांतील सुधारलेला प्रदेश व उत्तर ब्रह्मदेशांतील रानटी जाती यांमध्यें भिंतीप्रमाणें उभे आहेत. तिकडे वायव्य सरहद्दीवरील पर्वतश्रेणी संबंध ब्रिटिश सरहद्द व्यापून समुद्रापर्यंत पोंचल्या आहेत. या श्रेणी दक्षिणेकडे जात असतांना त्यांच्या डोळ्यांत भरणार्‍या भागांनां सफेद कोह, सुलेमान आणि हाला पर्वत अशीं नांवें पडलीं आहेत. पण ही पर्वताची अभेद्य भिंतहि कोंपर्‍यांत फोडलेली दिसत असून तींतून काबूल नदी हिंदुस्थानांत शिरते. जवळच खायबर मार्ग, त्याच्या दक्षिणेस कुर्रम मार्ग, डेराइस्माईलखानजवळ गोमल मार्ग, गोमल आणि कुर्रम यांमधील टोंची मार्ग, आणखी दक्षिणेकडे असलेला बोलन मार्ग हे हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांमधील रस्ते होत. हिंदुस्तान आणि बलुचिस्तान यांमधील हाला, ब्राहुइ आणि पाब पर्वत कमी उंचीचे आहेत.
========================🏔
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...