*वज्रगोपिकानाम*
-------------------------
भाग :- २
*द्वापारांते करिष्यामि भवतीनां मनोरथम् । *
*श्रद्धया परया भक्त्या व्रजे गोप्यो भविष्यथ ॥ *
'द्वापारयुगाचे शेवटी श्रीकृष्ण अवतारात तुमचे मनोरथ पूर्ण करीन. तुम्ही परमश्रद्धावान आहात, त्या वेळी तुम्ही गोकुळात गोपी बनाल.'
पद्मपुराणात कथा आहे की, श्रीरामचंद्र दंडकारण्यात आले असता अनेक ऋषी त्यांच्या दर्शनास गेले. रामचंद्राचे अत्यंत सुंदर व लावण्यादिकाने युक्त स्वरूप पाहून त्यांच्या ठिकाणी स्त्रीभाव जागृत झाला. तेव्हा रामचंद्राने त्यांना गोकुळात तुम्ही गोपीरूपाने द्वापारयुगात जन्म घ्याल व माझे सुख भोगाल असा वर दिला. नंतर त्या वराप्रमाणे ते ऋषी स्त्रीभावास प्राप्त झाले, उदाहरणार्थ, उग्रतपानामक ऋषी अग्निहोत्री व तपस्वी दृढव्रती होता. त्याने पंचदशाक्षर मंत्राचा जप अनंत काल केल्यानंतर सुनंदनामक गोपाच्या पोटी सुनंदानामक कन्येच्या रूपाने जन्म घेतला. सत्यतपा नावाचा मुनी वाळलेल्या पानावर राहून दशाक्षर मंत्राचा जप करून दहा कल्पानंतर सुभद्रनामक गोपाची कन्या सुभद्रा नामक गोपी झाला. हरिधामा ऋषी निराहार राहून क्लींबीजयुक्त वीस अक्षरी मंत्राचा जप करून तीन कल्पानंतर सारंग नामक गोपाच्या पोटी रंगवेणी या नावाच्या गोपीच्या रूपाने अवतरला. तसेच जाबाली नावाचा ब्रह्मज्ञानी ऋषी विशाल अरण्यात विहरण करीत असता त्याने एक मोठी विहीर पाहिली. त्या विहिरीच्या पश्चिम तटावर एका वटवृक्षाखाली एक तरुण स्त्री कठोर तपश्चर्या करीत बसलेली त्याला दिसली. तिचा डावा हात आपल्या कमरेवर असून उजव्या हाताने तिने ज्ञानमुद्रा धारण केलेली होती. जाबाली ऋषीने तिला नम्रतेने तू कोण आहेस असे विचारले असता ती म्हणाली,
*ब्रह्मविद्याहमतुलां योगींद्रैर्या च मृग्यते । *
*साहं हरिपदाम्भोज काम्यया सुचिरं तप ॥ *
*चराम्यस्मिन्वने घोरे ध्यायन्ती पुरुषोत्तमम् । *
*ब्रह्मानंदेन पूर्णाहं तेनानंदेन तृप्तधीः ॥ *
*तथापिशून्यमात्मानं मन्ये कृष्णरतिं विना ॥* पद्मपुराण.
ती म्हणाली, 'जिचा मोठमोठे योगी शोध करतात अशी मी ब्रह्मविद्या आहे. कृष्णप्रेमप्राप्तीकरिता या घोर वनामध्ये त्या पुरुषोत्तमाचे ध्यान करीत दीर्घकाल तप करीत आहे. मी ब्रह्मानंदाने पूर्ण आहे, पण श्रीकृष्णप्रेम मला अद्यापि प्राप्त झाले नाही म्हणून स्वतःस शून्य समजत आहे.' हे ऐकून ब्रह्मज्ञानी जाबालीने तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिच्यापासून श्रीकृष्णप्रेमदीक्षा घेतली. एका पायावर उभे राहून कठोर तप केले. त्या कल्पानंतर प्रचंड नावाच्या गोपाचे घरी चित्रगंधा या गोपीच्या रूपाने अवतार घेतला. अशा अनेक गोपिकांच्या पूर्व जन्माच्या कथा सापडतात.
श्रीशुकाचार्यांसारखे महान ज्ञानीही गोपिकांना गुरुस्थानी मानीत होते असे वर्णन आढळते.
एवढा विचार करण्याचे कारण असे की ज्या अर्थी श्रीनारद महर्षींनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तिलक्षणाकरिता आवर्जून घेतले आहे त्या अर्थी त्याचाही अधिकार तसा श्रेष्ठ असला पाहिजे.
नारदाच्याही आधी ज्यानी भक्तिविषयक सूत्राची रचना केली, ते श्रीशांडिल्य महर्षीही आपल्या भक्तिसूत्रातून गोपिकांचेच उदाहरण घेतात.
*अतएव तद्भावाद्बल्लवीनाम ॥ २ - ५ *
'भक्ती ही सर्वसाधननिरपेक्ष अनंतफलस्वरूप आहे. यावर उदाहरण बल्लवी म्हणजे गोपिकांचेच आहे.'
या सूत्रावरील आपल्या विस्तृत संस्कृत टीकेत श्रीनारायणतीर्थ यती, ज्यांनी अनेक शास्त्रावरील मोठमोठ्या ग्रंथावर टीका केल्या आहेत व त्यावरून ते मोठे प्रकांड पंडित होते असे दिसून येते, यानी आदि पुराणातील गोपी महात्म्याचे-काही श्लोक उद्धृत केले आहेत
*त्रैलोक्ये केभवद्भक्ता केत्वां जानन्ति मर्मणि । *
भक्त अर्जुन श्रीकृष्णास त्रैलोक्यात तुमचे भक्त कोण आहेत व कोण तुम्हाला यथार्थ जाणतो असा प्रश्न करतो, त्याचे श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात-
*न मां जानन्ति मुनयो योगिनश्च कथंचन । *
*नच रुद्रादयो देवा यथा गोप्यो विदन्ति मां ॥ *
*मन्माहात्म्यं मत्सपर्यां मच्छ्रद्धां मन्मनोगतिम । *
*गोप्य एवहि जानन्ति नान्यो जानाति मर्मणि ॥ *
*वेदान्तिनोऽपि मुनयो न मां जानन्ति तत्त्वत । *
*यथा ता गोपसुदृशो मम जानन्ति वैभवम् ॥ *
*अहमेव परं रुपं न्यान्ये जानन्ति केचन । *
*गोप्य एवहि जानन्ति मद्रुपं मत्क्रियादिकम ॥* आदिपुराण
'श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, मला योगी, मुनी, रूद्रादिदेवदेखील गोपिकाप्रमाणे जाणू शकत नाहीत. माझे महात्म्य, पूजा, श्रद्धा, मनोगत केवळ गोपिकाच जाणतात. गोपिका जशा मला जाणतात तशा स्वरूपात वेदांती, मुनीही मला जाणत नाहीत. माझ्या खर्या रूपास व मद्विषयक ज्या क्रिया करावयाच्या त्या केवळ गोपिकाच जाणतात.
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment