*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
*_भाग :- १.._*
जनमेजय विचारतो - "हे वैशंपायना, आपण मनुवंशानुकीर्तनें सांगत असतां विवस्वान याला श्राद्धदेवही म्हणत असें सांगितलें; श्राद्धदेव ही संज्ञा विवस्वानाला कां प्राप्त झाली व श्राद्धाचा श्रेष्ठ विधि कोणता, हें, हे विप्रश्रेष्ठा, ऐकावयाची माझी इच्छा आहे; त्याचप्रमाणें पितर पितर म्हणतात ते कोण ? हे पहिल्याप्रथम कसे उत्पन्न झाले ? त्याचप्रमाणें वेदवेत्ते ब्राह्मण, असें सांगतांना आम्हीं ऐकिले आहे कीं, स्वर्गात हे जे पितर म्हणून आहेत ते देवांचेही दैवत आहेत, हें कसें ? तसेंच या पितरांचे कांहीं गण म्हणून सांगितले आहेत ते कोणचे ? या पितरांचे सामर्थ्य काय ? आम्हीं येथें श्राद्ध करावे, त्यानें स्वर्गात ते पितर कसे तृप्त होतात व तृप्त होऊन त्यांनीं तेथून आशिर्वाद दिले असतां त्या योगाने आमचे येथें कल्याण कसें होतें ? हे सर्व प्रश्न व पितरांची एकूण उत्पत्ति या सर्वांचा उलगडा समजावा, असा हेतु आहे."
वैशंपायन म्हणतात - "बा जनमेजया, तुझा प्रश्न ऐकून मला फार आनंद झाला. ठीक आहे. तुला मीं पितरांची श्र्लाघ्य उत्पत्ति कशी झाली, आपण केलेल्या श्राद्धानें स्वर्गात पितर कसे संतुष्ट होतात व संतुष्ट झाल्यावर तेथून आमचे कल्याण कसे करितात, ते सांगतो ऐक. तूं जे हे कांहीं प्रश्न विचारतोस ते सर्व प्रश्न पितामह भीष्म शर-शय्येवर पडले असतां त्यांना धर्मराजानें विचारले होते. भीष्मांनींही तत्पूर्वी त्याच शंका मार्कंडेयाला विचारिल्या होत्या, व मार्कंडेयांचे त्याविषयी समाधान सनत्कुमारानीं केलें होतें, अशी या विषयाची परंपरा आहे; तेव्हां भीष्म-युधिष्ठिराचा झालेला संवाद मी तुला सांगतो. युधिष्ठिराने विचारिलें, 'हे भीष्मा, जर कोणाचे मनांत आपल्याला पुष्टी प्राप्त व्हावी असें असेल तर ती त्याला कशी प्राप्त व्हावी ? व काय कर्म केलें असतां लोकांचा शोक दूर होईल, तें आपण मला सांगा; आपण धर्मज्ञ आहां, म्हणून मी आपल्याला विचारितो." भीष्म म्हणतात, 'बा युधिष्ठिरा, पितरांचे श्राद्ध हें वाटेल तें तें फल देणारे एक अनुष्ठान आहे, म्हणून जो कोणी शुचिर्भूतपणानें व तत्परतेने पितृश्राद्धे करून पितरांचा संतोष करितो तो श्राद्धकर्ता इहलोकीं व मरणोत्तर परलोकीही आनंदात राहातो. हे राजा, ज्याला धर्मेच्छा असेल त्याला पितर धर्मबुद्धि देतात; ज्याला संततीची इच्छा असेल त्याला संतति देतात, व ज्याला पुष्टीची इच्छा असेल त्याला पुष्टि देतात.
धर्मराज म्हणतो - "पितामहा, आपण हें म्हणता खरें, पण जसें कर्म करावे तसें फल घ्यावे, हा कायदा सर्व प्राण्यांना सारख्याच नियमानें लागू असल्यामुळें कोणाचे पितर स्वर्गात असतील तर कोणाचे नरकांतही असतील; मग जे स्वतःच नरकांत आहेत ते दुसर्याला पवित्र फल कोठून देणार ? बरे, जो जो कोणी श्राद्ध करितो तो तो चांगल्याच फलाची इच्छा करितो व यासाठीं वारंवार श्राद्धकाली लोक आपला पिता, पितामह व प्रपितामह या त्रयीच्या उद्देशाने पिण्ड देऊन श्राद्धे करीत असतात. ही श्राद्धे पितरांना कशी पोचतात, व त्यांतील जर कांहीं नरकांत असले तर तेथून ते आपणास सत्फल कसें देऊं शकतात ? ज्या वेळीं केव्हा पितर नरकांत असतील त्या वेळीं जें आपण यजन करितो तें अशाच पितरांचे किंवा त्याऐवजी दुसर्याच कोणाचे ? शिवाय स्वर्गातील देवही पितरांचे यजन करितात म्हणून आम्ही ऐकत हें कसें ? हे भीष्मा, आपण अत्यंत तेजस्वी आहां, करितां माझे हे सर्व प्रश्न पुरापूर उलगडून सांगा. आपली बुद्धि केवळ अलोट आहे, यास्तव येथे पितरांचे उद्देशाने केलेल्या श्राद्धाने इहलोकीं आपला बचाव कसा होतो ?"
*क्रमश.....*
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment