*श्राध्ददेव व पितृवर्णन*
-------------------------------
*भाग - ८..*
अच्छोद नांवाचे जे परम रमणीय विख्यात सरोवर आहे तें निर्माण झाले. हिने आपले पितर पूर्वी कधींही पाहिले नव्हते आणि यामुळे पुढें जेव्हा ते अमूर्त स्थितीत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां आपण ज्यांच्या मनोबलाने उत्पन्न झालो तेच म्हणजे हे आपले पितर, हें त्या शुचिस्मितेच्या लक्षांत आलें नाहीं व यामुळे ती सुंदरी खुद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञानामुळे त्यांना परपुरुषाप्रमाणें लाजली, व अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमानात बसून स्वर्गलोकांत फिरत असणार्या अमावसु नांवाच्या आयूच्या यशस्वी पुत्राला पाहून मोहित झाली.
खरें पाहाता हा वसु किंवा अमावसु आकाशगामी पितरांपैकी एक असतां हिनें त्यावर लोलुप होऊन त्याजविषयी कामवासना धरिली; व या पातकामुळे म्हणजे भलत्याचीच कामार्थ प्रार्थना केल्यामुळें ती योगापासून भ्रष्ट होऊन स्वर्गातून पतन पावली. खालीं पडता पडता वाटेत तिला परमाणूहूनही सूक्ष्म आकाराची अशीं तीन विमाने दिसली; व त्यांत अग्नीत असलेल्या विस्तवाचे ठिणगीप्रमाणें अव्यक्त व अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचे तिचे खरे पितर तिच्या दृष्टीस पडले. तेव्हां लज्जेने खाली मान घालून दुःखित होत्साती 'मला तारा, मला तारा' असें म्हणू लागली. त्यावेळीं तूं 'भिऊ नको, भिऊ नको' अशा शब्दानी तिला आश्वासन दिल्यामुळें ती तशीच आकाशांत थबकून राहिली. नंतर मोठया दीनवाणीने तिने पितरांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतलें, तेव्हां ते मर्यादोल्लंघन केल्यामुळें ऐश्वयार्पासून भ्रष्ट झालेल्या स्वकन्येला म्हणाले, "हे शुचिस्मिते, तूं ज्याअर्थी स्वदोषामुळे ऐश्वर्यभ्रष्ट झाली आहेस त्या अर्थी तुला मृत्युलोकीं गेलेंच पाहिजे. कारण असा नियम आहे कीं, स्वर्गात राहाणारे जे देव त्यांचे कर्माची फळें त्यांना तत्काल व त्याच शरीरांत म्हणजे ज्या शरीरांकडून तीं कर्मे केली गेली असतील त्या शरीरांतच मिळतात. परंतु, मनुष्यलोकांतील नियम वेगळा आहे. त्या लोकांत केलेल्या कर्माची फळें मरणोत्तर प्राप्त होतात. यासाठी, हे कन्ये, तूं आतां मृत्युलोकी जाऊन तेथें तपश्चर्या करून नंतर मरण पावशील. तेव्हां पुन्हा येथें येऊन तुला तपाचें फल भोगावयास मिळेल. करितां तूं संतोषानें मृत्युलोकीं जा. याप्रमाणे पितरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून तिने संतोष पावून त्यांची कृपा संपादिली. तेव्हां ते सर्व दयार्द्र होऊन त्यांनीं ध्यानस्थितीत पुढें अवश्य होणारी गोष्ट कोणती ती ध्यानी घेऊन मोठया प्रसन्न चित्ताने तिला म्हणाले कीं, हे मुली, तुझें ज्यावर मन गेले होते तो महात्मा अमावसु पृथ्वीवर मनुष्ययोनींत राजकुलांत उत्पन्न झाला आहे. त्याची तू कन्या होशील व तो जन्म पुरा झाला म्हणजे पुन्हा या दुर्लभ लोकाला प्राप्त होशील. मृत्युलोकांत असतां तूं पराशर मुनींचा वारस असा एक पुत्र प्रसवशील.
तो मोठा ब्रह्मर्षी होईल व आजकाल जो एकच एक अखंड वेद आहे त्याचे तो भाग करून चार वेद करील. पराशराला अशा लक्षणांचा पुत्र देऊन नंतर तूं पूर्वजन्मीचा जो महाभिष नांवाचा राजा तो सांप्रत मृत्युलोकी, शंतनु नांवाचा राजा झाला आहे. त्याची तूं स्त्री होऊन त्याला विचित्रवीर्य नांवाचा एक धर्मनिष्ठ पुत्र व चित्रांगद नांवाचा आणखी एक सुलक्षणी पुत्र, असे दोन पुत्र देऊन नंतर तूं पुन्हा या लोकास येशील. तूं पितरांची अमर्यादा केलीस यास्तव तुला वाईट जन्म प्राप्त होईल. तूं असावसूचीच कन्या होशील व तीही अद्रिका नामक जी अप्सरा त्याजबरोबर होती, तिच्याच पोटी येशील; व तूं अठठाविसाव्या चौकडीत जें द्वापरयुग त्या युगांत एका मत्स्याच्या उदरांतून बाहेर येशील. पितरांनीं याप्रमाणे तिला सांगितल्यावर ती अच्छोदा मत्स्यीच्या पोटीं येऊन धीवरकुलांत प्रगट झाल्याने ती लोकांत धीवरकन्या म्हटली गेली; व पुढें त्या धीवराने ती वसुराजाला नजर केल्यामुळें ती त्याही राजाची कन्या मानली गेली.
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment