*वज्रगोपिकानाम*
-------------------------
*भाग :- ११..*
*प्रेमपराकाष्ठा* ' ही शेवटची अकरावी भूमिकेवर गोपिका आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे.
जर त्यांना महात्म्यज्ञान नसेल तर ते वैषयिक प्रेम होईल व ते निकृष्ट समजले जाते, म्हणून या पुढील सूत्रात 'तद्विहीनं जाराणामिव' म्हणजे महात्म्यज्ञानविहीन (रहित) प्रेम जारप्रेमाप्रमाणे निकृष्ट होईल असे नारद म्हणतात. 'जरयति इति जार.' जो धर्माचा नाश करतो, पावित्र्याचा नाश करतो, नीतीचा नाश करतो तो जार. भगवत्प्रेमस्वरूप तर हृदयाला निर्मल पवित्र करणार आहे. ' *जाराणा* ' हे अनेकवचन अनेक घातक गोष्टी येथे एकत्रित आल्याप्रमाणे होईल हे सांगत आहे. सूत्रातील 'इव' हे पदही दृष्टान्त जसाच्या तसा अक्षरशः घेऊ नये हे सुचवीत आहे. जार किंवा जारिणी हे केवल ऐंद्रिय सुखाची अपेक्षा करत असतात. ते सुख मिळत राहील तोपावेतोच त्यांचा समागम असतो, ते न मिळाल्यास परस्परांचा त्याग होतो, श्रीकृष्ण व गोपिकांचे अन्योन्य प्रेम अखंड, अबाधित व अव्यभिचारी होते, जार-प्रेम व वास्तव प्रेमातील भेद पुढील वाक्यात दाखविला आहे.
काम व प्रेम यांतील भेद या सूत्राच्याद्वारे स्पष्ट केला जात आहे. कामामध्ये कामी स्त्री किंवा पुरुष स्वतःच्या सुखभोगाकडेच पाहत असतो. जारिणी जारापासून स्वतःला किंवा जार जारिणीपासून आपल्याला सुख व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करीत असतो, व जोपावेतो ते सुख मिळत राहते तोपावेतोच अनुकूल संबंध राहतो. जर दुसर्याची सुख देण्याची शक्ती संपली किंवा प्रतिबंध आला तर परस्परांचा संबंधविच्छेद होतो, हे कामाचे स्वरूप आहे. पण प्रेमात स्वसुख-सुखित्वापेक्षा तत्सुख म्हणजे जो प्रेमविषय आहे त्याच्या सुखाने प्रेम करणारा सुखी होत असतो, किंवा स्वतःला सुखी समजत असतो. कामी पुरुष दुसर्याला भोग्य समजून स्वतःला भोक्ता समजतो. तसेच त्याचे प्रेम प्रेमविषयाच्या आत्म्यापेक्षा बाह्य स्वरूपावरच असते व त्या बाह्य विषयापासून ऐंद्रियिक सुखाचा भोग होत असतो. त्यासच तो श्रेष्ठत्व देतो. तो स्वतःला अंगी व ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अंग समजतो. पण खरा प्रेमी स्वतःला अंग व प्रेमविषयाला अंगी समजत असतो; म्हणूनच त्याच्या ठिकाणी तत्सुखसुखित्व हे प्रेमाचे खरे लक्षण लागू पडते. 'उज्ज्वल नीलमणि' या ग्रंथामध्ये एक श्लोक आला आहे.
*स्यान्नः सौख्यं यदपि बलवत् गोष्ठमाप्ते मुकुंदे । *
*यद्यल्पापि क्षतिरुदयते तस्य मार्गात्कदापि ॥ *
*अप्राप्तेऽस्मिन्यदपि नगरादार्तिरुग्रा भवेन्नः । *
*सौख्यं तस्य स्फुरति हृदिचेत्तत्र वासं करोतु ॥ *
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment