*वज्रगोपिकानाम*
--------------------------
*भाग :- १२..*
भक्तवर्य उद्धव गोकुळात श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला, काही दिवस तेथे वास्तव्य करून गोपिकांच्या दिव्य प्रेमाचा अनुभव घेतल्यावर परत जाताना वृषभानुकिशोरी राधेला त्याने संदेश मागितला, तेव्हा ती उद्धवाला म्हणाली, 'हे पाहा, प्रियतम शामसुंदर कदाचित येथे आला तर आम्हा सर्वांना अपार सुख होईल हे खरे. परंतु येथे येण्यामध्ये त्याला किंचितही क्लेश होत असतील तर त्याने येथे न आलेले बरे. त्याच्या न येण्याने आमच्या सर्वांच्या भीषण दुःखाला सीमा राहणार नाही, तरी तेथे वास्तव्य करण्यात त्याला सुख होत असेल तर तो आनंदाने तेथेच राहो. कारण त्याच्या सुखातच आम्ही सुखी होऊ.' हे वाक्य ऐकून भक्तवर्य उद्धवाचे तोंडून 'हे राधे, तुझ्या दिव्य प्रेमाचा विजय असो.' असे उद्गार निघाले.
अनेक भक्तांच्या मुखाने एक कथा ऐकण्यात येते ती अशी की, एकदा देवर्षी श्रीनारद द्वारकेत गेले, श्रीकृष्णाची भेट झाली, गोकुळातील काही जुन्या आठवणी निघाल्या, कारण श्रीकृष्णास त्या विसरणे शक्य नव्हते.
*नारद म्हणाले,* 'देवा ! तुम्ही गोकुळवासी गोपिकांचे वारंवार स्मरण करीत असता त्यामुळे श्रीरुक्मिणीदेवी, सत्यभामादि आपल्या स्त्रिया या अप्रसन्न असतात, त्यांना वाटते आमचे श्रीकृष्णावर प्रेम नाही काय ? गोपिकांच्या प्रेमात अशी विशेषता काय आहे ?' यावर भगवान *श्रीकृष्ण म्हणाले,* 'देवर्षे ! तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढे केव्हा तरी देईन, पण सध्या माझ्या मस्तकात फार वेदना होत आहेत, मला फार क्लेश होतात.' नारद म्हणाले, 'मी एखाद्या वैद्याला बोलावून आणतो.'
*श्रीकृष्ण* - वैद्याला आणणे व्यर्थ आहे. त्याच्या औषधाचा काही उपयोग होणार नाही.
*नारद* - मग कसे करावे ? आपणास बरे वाटण्यासाठी कोणता उपाय करावा ?
*श्रीकृष्ण* - उपाय आहे, औषध आहे, पण ते कोणी देईल तेव्हा ना ?
*नारद* - तुम्ही औषधाचे नाव तर सांगा, मी कोठूनही, कोणापासूनही आणीन.
*श्रीकृष्ण* - नारदऋषे, एखाद्या भक्ताची चरणधूली आणून ती मस्तकाला लावली तरच ह्या वेदना कमी होतील. ते औषध संपादन करण्याकरिता नारद बाहेर पडले. जो जो कोणी भक्त म्हणविणारा भेटेल त्याला नारदांनी श्रीकृष्णाची वेदना सांगावी व औषध मागावे. पण कोण असा सापडेल की आपली चरणधूळ देवाच्या मस्तकाला लावू देईल ? हे पाप करण्यास कोण तयार होईल 'द्वारकेत जाऊन पट्टराण्यांनाही विचारले की, तुम्ही श्रीकृष्णाच्या पूर्ण भक्त आहा, पतिव्रता प्रेमी आहा, त्याच्याकरिता तुम्ही तरी ते औषध द्या. चरणधूली द्या. पण त्या म्हणाल्या, 'हरीहरी आपल्या पायाची माती त्या परमात्म्याच्या कपाळास लावावी, ज्याच्या पायावर ब्रह्मा, शिव, इंद्रादी तेहतीस कोटी देव आपली मस्तके नम्र करतात, त्याच्या मस्तकास ही माती लावली तर कोणत्या नरकात जाऊन पडावे लागेल, नारदा, तुम्हाला विचारावे तरी कसे वाटते ?' शेवटी निराश होऊन नारद परत श्रीकृष्णाकडे आले व सांगितले की, 'देवा ! पुष्कळ भक्त भेटले, पण कोणी पदरज देण्यास तयार नाही.' *श्रीकृष्ण म्हणाले,* 'नारदा, तुम्ही वृंदावनात गेला होता का ?'
कथेचा पुढील भाग पुढल्या भागात...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment