*श्राध्ददेव व पितृवर्णन*
------------------------------
*श्राध्दमाहात्म्य:- ४..*
*हंसवर्णन*:-१
मार्कंडेय सांगतातः - ते मानससरोवराचे तीरी विहार करणारे पद्मगर्भ, अरविंदाक्ष, क्षीरगर्भ, सुलोचन, उरुबिंदू, सुबिंदु व हेमगर्भ, अशीं नांवे असलेले सातही हंस, जल आणि वायु भक्षण करून योगाभ्यासानें आपलें शरीर शुष्क करीत होते. राजा बिभ्राज याची स्थिति थेट उलट होती. तो शरीराने गलेलठठ असून कामुक होता, व आपल्या स्त्रिया व भोगांगना बरोबर घेऊन इंद्र जसा नंदनवनांत शिरतो, त्याप्रमाणें मानससरोवरावरील वनांत शिरला, व तेथें हे पक्षी योगाभ्यास करण्यांत गुंतले आहेत असें त्यानें पाहिले. हे पक्षी होऊन जर योगाभ्यास करितात, तर मी मनुष्य होऊन विषयासक्त राहाणे हे मोठेंच लज्जाकर आहे, असे वाटून हीच गोष्ट मनांत घोळीत घोळीत तो आपल्या नगरास परत फिरला. त्याला अणुह नांवाचा एक धार्मिक पुत्र होता. याला अणुह नांव पडण्याचे कारण अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म असेही धर्माचार साधण्याविषयीं तो परम तत्पर असे, हें होय. याला जी स्त्री मिळाली होती तीही मोठी योगनिष्ठ, सद्गुणी, सत्यशील व सर्वथा पूज्यलक्षणांनीं युक्त अशी होती. ही स्त्री म्हणजे शुक्राचार्यांची कन्या जी कृत्वी ती. हे भीष्मा, ही कृत्वी म्हणजे बर्हिषद पितरांची कन्या जी पीवरी म्हणून पूर्वी सनत्कुमारांनी जी मला सांगितली होतो तीच; व त्या वेळीही ही मोठी सत्यपरायण, अजितेंद्रियांना अगम्य व स्वतः योगनिष्ठ असून योगनिष्ठाचीच माता व योगनिष्ठाचीच पत्नी होईल म्हणून मी सनत्कुमारांच्या तोंडची पितृकल्पाची हकीकत सांगत असतां बोललोच आहें; व त्याप्रमाणेंच ती झाली. असो; बिभ्राज राजा घरीं येतांच त्यानें आपले प्रजाजन व ब्राह्मण यांस बोलावून स्वस्तिवाचन वगैरे करवून मोठ्या आनंदाने आपला पुत्र अणुह यांस राज्यावर बसविले; व स्वतः ते सहचारी हंसपक्षी मानससरोवराचे कांठीं जेथे आढळले होते तेथेंच तपश्चर्येसाठी गमन केलें. तेथे गेल्यावर त्या सरोवराचे शेजारीच मोठी तीव्र तपश्चर्या आरंभिली. त्यानें सर्व विषयवासना सोडून दिल्या, व अन्नपाणीही सोडून केवळ वायुभक्षण चालू ठेविले. ही तीव्र तपश्चर्या करण्यांत त्याचा गूढ हेतु असा होता कीं, आपण या जन्मी दृढ संकल्प करून त्याचे बळावर पुढील जन्मी हे जे योगनिष्णात हंसबंधु आहेत यांपैकी एकाच्या उदरी येऊ. म्हणजे आपणांस अनायासेंच योगप्राप्ति होईल. ही गोष्ट मनांत घेऊन त्यानें मोठया नेटाने तपश्चर्या आरंभिली, व आपलें तपस्तेज इतकें वाढविले कीं, पाहाणाराला तो सूर्यासारखा दैदीप्यमान दिसूं लागला; व त्यानें प्रकाशित केल्यामुळें त्या वनाला व त्या सरोवरालाही तेव्हांपासून बैभ्राज असेंच नांव पडलें. इकडे त्या सात पक्ष्यांपैकी जे अखंड योगनिष्ठ होते ते चार, व जे पूर्वी सांगितल्याप्रमाणें योगभ्रष्ट होते ते तीन हे सर्वही तपानें निष्पाप होऊन कांपिल्यनगरीत जन्मांस आले.
यांपैकी ब्रह्मदत्त हा धुरीण होता. यांपैकी जे चौघे पूर्वजन्मी अखंड योगनिष्ठ होते ते या जन्मी ज्ञान, ध्यान, तप, पूजा, वेद, वेदांग, यांत निष्णात असून पूर्वजन्मींचे त्यांना स्मरण होतेंच; आणि बाकीचे जे तीन त्यांना मात्र भूल पडली. यांपैकीं पूर्वींचा जो स्वतंत्र तो ब्रह्मदत्त नांवानें अणुहाचे पोटीं उत्पन्न झाला. कारण, पूर्वी पक्षियोनीत असतां असाच जन्म आपणांस व्हावा असा त्याचा संकल्पच होता. हा ब्रह्मदत्तही या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप, इत्यादिकांनीं पवित्र असून मोठा यशस्वी व वेदवेदांगनिपुण होता. छिद्रदर्शी व सुनेत्र हे जे उरलेले दोघे बंधु ते या जन्मी वत्स व बाभ्रव्य वंशांत उत्पन्न झाले. हेही मोठे कर्मनिष्ठ व वेदवेदांगप्रवीण होते; व पूर्वजन्मापासून एकत्र राहिले असल्यामुळें या जन्मी ब्रह्मदत्ताचे सोबती झाले. या जन्मी त्यांना पांचाल व कण्डरीक अशीं नावे होतीं. पैकी पांचाल हा ऋग्वेदामध्ये प्रवीण होता, व यामुळे त्यानें आचार्यत्व स्वीकारले. कण्डरीक हा सामवेद व यजुर्वेद यांत निष्णात असल्यानें त्यानें छंदोगत्व व अध्वर्युत्व पत्करिलें. राजा ब्रह्मदत्त हा सर्व प्राण्यांचे शब्द समजण्यांत निपुण होता.
त्याची ह्या पांचालकण्डरीकांशीं मोठी गट्टी जमली. हे तिघेही पूर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे कामलोलुप होऊन मैथुनादि कर्मात जरी आसक्त होते तरी पूर्वसंस्कारामुळें त्यांना धर्म, अर्थ, काम या तिन्ही शास्त्रांची माहिती पुरापूर होती. असो; निर्मळ ब्रह्मदत्ताला राज्यावर बसवून अणुह जो तपश्चर्येला गेला तो पूर्ण योगनिष्ठ होऊन परमगतीला पोचला. ब्रह्मदत्ताला जी बायको मिळाली ती असितकुलोत्पन्न जो देवलऋषि त्याची मुलगी होती. हिचे नांव सन्नति असें होतें. हिच्या नांवाप्रमाणेच ही सन्नतिमान म्हणजे सज्जनांशी नम्रपणे वागणारी किंवा सत् म्हणजे जें ब्रह्म त्याचे ठिकाणी जिची मति लीन आहे अशी होती. सौंदर्यानेंही फार उत्तमच होती. हिचे तेज मोठे उग्र असे व हिला योगाचा नाद असल्यामुळें ब्रह्मदत्ताच्या व हिच्या समजुतीचा एकमेळ होता; व हें पाहूनच ब्रह्मदत्तानें तिला देवलापासून भार्यात्वासाठी मागून घेतली.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment