*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
*भाग :- १२..*
हे मार्कंडेया, सद्धर्माचरण हें कधींही नाश पावत नाहीं. मध्ये कितीही अडथळे आले तथापि ते पुनरपि कर्त्यांचे बुद्धीला सन्मार्गाकडे ओढीत नेतात. याकरिता तुझी मति वारंवार धर्माकडे लागूं दे. विशेषत: योगाचरणाकडे मति लागली असतां ती दिवसेंदिवस फारच उत्तम होत जाईल. पण, बाबा, योग कांहीं वाटेवर पडला नाहीं. अल्पबुद्धीच्या लोकांना हा कधींच प्राप्त होत नाहीं. कदाचित मोठ्या कष्टानें प्राप्त झालाच तरी हे मूर्ख लोक मृगयादि नाना क्रूर व्यसनांच्या नादी लागून प्राप्त झालेल्याची नासाडी करितात व स्वतः सदा अधर्मानेच राहातात आणि आपल्या गुरूंचाही द्रोह करितात; अशांच्या हातीं योग लागत नाहीं, तर तो कोणाच्या हातीं लागतो तें ऐक.
जे लोक न मागण्याजोग्या ज्या वस्तु आहेत त्या कधींही मागत नाहींत; शरण आलेल्यांचे रक्षण करितात; दुर्बलांची अवहेलना करीत नाहीत; पैशाच्या उबेमुळें उन्मत्त होत नाहींत; ज्यांचे आहारविहार व स्वकर्तव्यासंबंधी सर्व व्यापार हिशोबी व नेमस्त असतात; जे सदा ध्यान व अध्ययन यात निरत असतात; नायनाट झालेल्या वस्तूसाठी सोधण्या घालीत बसत नाहींत; केव्हांही विषयोपभोगात गढून पडत नाहींत; मद्यमांस भक्षण करीत नाहींत; स्त्रीशी विलास करण्यांत आला तो दिवस घालवीत नाहींत; ब्राह्मणसेवेविषयीं अदक्ष असत नाहींत; हलकट गोष्टींत मन घालीत नाहींत; आळसाने ज्यांना गिळले नाहीं; मान-सन्मानाची ज्यांना विशेष चाड नाहीं; व जे आत्मप्रशंसेंत फारसे पडत नाहींत; जे वृत्तीने अति शांत; ज्यांनीं क्रोध जिंकला आहे; ज्यांना बढाई व मीपणा यांचा विटाळही नाहीं; व जे सदा पुण्यमय विचाराने भरलेले असतात, अशांनाच योग प्राप्त होतो. योग ही चीज मृत्युलोकांत फार दुर्मिळ आहे. भाग्यवान असतील तेच व्रताचरण करितात. पूर्वकाळचे ब्राह्मण असे असत. प्रसंगीं त्यांचे हातून चुकीने दोष घडलाच तर त्याची पुरी आठवण ठेवून ते आपला रस्ता सुधारीत व ध्यान आणि अध्ययन यांत गर्क राहून शांतीचे मार्गाला लागत.
हे धर्मज्ञा मार्कंडेया, योगधर्माहून अधिक महत्वाचा असा दुसरा कोणताही धर्म नाहीं. हा धर्म सर्वही धर्मात वरिष्ठ आहे. यासाठीं, हे भृगुकुलोत्पन्ना, त्याचीच कांस धर. तूं जर अल्पाहार करणारा, जितेंद्रिय, तत्पर, पवित्र व श्रद्धावान होशील तर तुला आस्ते आस्ते कालगतीनें योगसिद्धि प्राप्त होईल.
असें बोलून भगवान् सनत्कुमार जागचे जागी अदृश्य झाले. ते गेल्यापासून मी त्यांची उपासना करण्यांत एकसारखा अठरा वर्षेपर्यंत निमग्न होतों; परंतु ती अठरा वर्षें मला केवळ एका दिवसासारखी वाटली; किंवा मला कालाचे कसें तें भानच उरले नाहीं. मी जेव्हां शुद्धीवर आलों, तेव्हां शिष्याजवळ पूसतपास केली, त्यावरून मला अठरा वर्षे लोटली असें कळले. हे भीष्मा, त्या देवाच्या कृपेचा प्रभाव केवढा म्हणून सांगू ? त्या अठरा वर्षांत मला तहान लागली नाहीं; भूक लागली नाहीं; किंवा अन्नपाणी नाही म्हणून मी यत्किंचितही कोमेजलों किंवा थकलो नाही.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment