*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
*श्राध्दमाहात्म्य*:-१
मार्कंडेय म्हणतात - "हे भीष्मा, श्राद्धाचे माहात्म्य तुला किती म्हणून सांगू ? अरे, इहलोकी विद्या, धन, कुल, सत्पुत्र, पशु, आदिकरून जी सुखस्थितीची साधने आहेत तीं तर श्राद्ध केल्याने प्राप्त होतातच. पण, त्याहूनही अधिक जो श्रेष्ठ जो मोक्ष किंवा ब्रह्मैक्य तेही या श्राद्धविधीने प्राप्त होतें असें या श्राद्धाचें अनुपम फल आहे व तें ब्रह्मदत्ताला सात जन्मांत मिळत गेलें. त्या योगानेच त्याची बुद्धि दुर्मार्गापासून हळूहळू आपोआप परावृत्त होऊन सन्मार्गाकडे लागली व इतरांचीही लागते. याकरितां मी तुला श्राद्धाचा विधि सर्व सांगतो. हे निष्पापा, पूर्वकाली कांहीं ब्राह्मणांनी इतर धर्मविधींना धाब्यावर बसवून गोहत्यादि करून केवळ श्राद्ध मात्र केलें होतें, पण तेवढयानेच त्यांना अत्युत्तम फळ प्राप्त झाले. ते कसें, तें सर्व तुला सांगतो ऐक."
मागें भगवान् सनत्कुमार मला दिव्य दृष्टि देऊन अंतर्धान पावले, हें मीं सांगितलेंच आहे. ते गेल्यावर या दृष्टीच्या बलानें मीं सनत्कुमारांनी पूर्वी निर्दिष्ट केलेले सात ब्राह्मण कुरूक्षेत्रांत धर्मश्रद्धेनें पितृश्राद्ध करीत आहेत, असें प्रत्यक्ष पाहिले. या सातांची नांवे - वाग्दुष्ट, क्रोधन, हिंस्त्र, पिशुन, कवि, खसृम व पितृवर्ति, अशीं होतीं. व या नामांनुरूपच त्यांची कृति होती. हे सर्व कौशिक विश्वामित्राचे पुत्र होते, व गार्ग्यमुनीचे शिष्य होते. त्यांचा पिता विश्वामित्र त्यांना शाप देऊन वेगळा सरला, तेव्हां ते सातही बंधु गार्ग्याच्या घरीं जाऊन शिष्यवृत्ति पत्करून ब्रह्मचर्यव्रतानें राहिले.
तेथें असतां त्यांच्या गुरूची न्यायाने संपादिलेली अशी एक सुंदर दुभती एकरंगी गाय होती; तिला गुरूच्या आज्ञेवरून एक दिवस ते वनांत घेऊन चालले होते. या गाईचे वांसरूंही तिचेसारखेच एकवर्णी होतें. या धेनुवत्सांना घेऊन जात असतां वाटेत त्यांना अतिशय भूक लागली व पोरवय आणि अज्ञान यांमुळें या गाईवरच आपली भूक भागवावी, अशी दुष्टबुद्धि त्यांचे मनांत उपजली. त्यावेळीं कवी व रवसृम या दोघांनी 'असें करूं नका' म्हणून आपल्या बंधूंशी याचना केली. परंतु, ते निवृत्त होतना. त्या वेळीं त्यांतील पितृवर्ति म्हणून जो भाऊ होता, तो नित्य श्राद्ध करणारा होता. तो धर्माचे ठिकाणी स्थिरबुद्धि असल्यानें रागाने आपल्या बंधूस म्हणाला, 'बाबांनो, या सुंदर गाईला अवश्य मारावयाचीच असें ठरत असेल तर त्यांत माझी एक गोष्ट तरी लक्षपूर्वक ऐका. ती ही कीं, गाय मारणेंच तर ती पितृश्राद्धार्थ म्हणून मारावी. असें केलें असतां या गाईचाही धर्मकार्यांत विनियोग होऊन तिला सद्गति मिळेल व आपणही पित्रार्चन केल्यानें अधर्म केल्यासारखे होणार नाहीं.' ही त्याची मसलत सर्वांना पटली. मग त्यांनी गाईचे प्रोक्षन (वध) करून व ती पितरांना अर्पण करून मग तिजवर यथास्थित ताव मारिला. नंतर, तळिराम गार करून गुरुगृही परतले व तिचें तें वांसरूं पुढें करून गुरूला म्हणाले, "गाय वाघाने खाल्ली; वांसरूं तेवढे राहिलें आहे, हे संभाळा." गुरु बिचारा निष्कपट होता. त्याला ती गोष्ट खरी वाटली व त्याने "बरें आहे," म्हणून तो वत्स आपले ताब्यांत घेतला.
याप्रमाणें त्या सर्व ब्राह्मणांनीं आपल्या गुरूला खोटीच गोष्ट सांगून ठकविलें. पुढें ते सर्वहीजण आयुष्य संपतांच मेले. मेल्यानंतर पुढील जन्मी ते सातहीजण पूर्वजन्मींच्या क्रूर कर्मामुळे हिंस्त्र, आपल्या गुरूशीं नीचपणा केल्यामुळें उग्र व हिंसादिकर्मांत आनंद मानणारे असे होऊन पारध्याचे पोटीं जन्मास आले. ते मोठे बळकट व दिलदार होते. पूर्वजन्मीं त्यांनी पितरांचे धर्मबुद्धीनें अर्चन केलें व गोवधही पितरांचेच उद्देशानें केला होता. यामुळे त्यांस चालू जन्मांत पूर्वजन्मींची स्मृति राहिली होती. यामुळे ते जरी दशार्ण देशांत या जन्मीं व्याधासारख्या क्रूर कुलांत उत्पन्न झाले होते तरी ते मोठे धर्मनिपुण असून निर्लोभ व सत्यप्रिय होते. ज्या कुळांत आले तेथील कर्म ते करीत खरें, पण ते केवळ प्राणरक्षणापुरतेंच तेवढे केलें म्हणजे बाकीचा काल ते आत्मानुसंधानांत घालवीत असत. या जन्मीं त्यांची नांवे पुढीलप्रमाणे होतीं. ती - निर्वैर, निर्वृत्ति, शांत, निर्मन्यु, कृति, वैधस व मातृवर्ती. त्यांची कर्मे या संज्ञांनुरूपच होतीं, एकंदरींत ते व्याध होऊन परमधार्मिक होते.
जातीचे हिंसाकर्म ते करीत खरें, पण बाकीचा वेळ आपल्या वृद्ध मातापितरांचे पूजनांत व संतोषांत घालवीत. पुढें त्याची मातापितरें यथाकाल मरण पावली, त्या वेळीं त्यांनी आपल्या हातांतली शिकारीची धनुष्यें टाकून देऊन वनांतच देहत्याग केला.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment