*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
*भाग :- ३..*
*चटकोपाख्यान*
हे धर्मा, मी भूमीवर दर्भासनावर लटकलों असतां त्या उग्रायुधानें आपल्या त्या दूताला मध्ये अग्नीच्या ज्वालेप्रमाणें तीव्र असे हे शब्द माझ्या कानी पाडिले. हे धर्मनिष्ठा, त्या वेळीं मीं त्या नीचाचा अभिप्राय काय तो ध्यानी आणून युद्धार्थ सज्ज होण्याविषयी माझ्या सर्व सेनाधीशांना आज्ञा केली. मला इतक्या चिडीला येण्याला असें कारण झालें कीं, माझ्या मातेचा पुत्र जो विचित्रवीर्य तो अद्यापि केवळ लहान असून सर्वथा माझ्या आश्रयावर अवलंबून होता. त्याकडे पाहून मला त्या हलकटाचा (उग्रायुधाचा) इतका संताप आला कीं, युद्ध करून त्याची हाडे मोडावी, यापलीकडे मला दुसरी कोणतीही गोष्ट सुचेना. परंतु, त्या वेळीं माझे भोंवतीं सल्लामसलतींत कुशल असे माझे सचिव बसले होते, तसेच साक्षात वेदस्वरूप असे माझे ऋत्विज बसले होते, व माझें खरें हित कशात आहे तें जाणणारे माझे जिव्हाळ्याचे स्नेही बसले होते. त्या सर्वांनी मला युद्धापासून निवृत्त होण्याविषयीचा आग्रह केला. ते सर्वच शास्त्रज्ञ असून माझ्या प्रेमातले असल्यानें मला त्यांचें ऐकावे लागलें. शिवाय त्यांनीं आपल्या म्हणण्याला सयुक्तिक कारणें काय तीही मला ऐकविली. माझे मंत्री म्हणाले, हा पापी उग्रायुध सैन्य घेऊन ठेपला, ही गोष्ट खरी; आपण अजून वडिलांचे सुतकांतच आहां, मोकळे झाला नाहीं. शिवाय घे म्हणल्या युद्धाला उठणे ही राजकारणी पुरुषांच्या दृष्टीने कांहीं अव्वलप्रत मसलत नव्हे. साम, दान, भेद, इत्यादि युद्धेतर सौम्य उपाय आहेत ते आम्ही प्रथम चालवून पाहातो. तोपर्यंत आपणही सुतक फिटून शुद्ध व्हाल. मग देवतांना वंदन करून, स्वस्तिवाचन करून, ब्राह्मणांकडून अग्नीत होम देऊन, ब्राह्मणांची पूजा करून व त्यांची आज्ञा संपादून आपण विजयार्थ बाहेर पडावे. कारण, जोंपर्यत कोणाही राजाला अशौच आहे तोपर्यंत त्यानें रणात शिरू नये किंवा अस्त्रप्रयोगही करूं नये, अशी वृद्धांची आज्ञा आहे. आमच्या मते आपण प्रथम सामानें किंवा दानानेच त्याला गप्प कराल. तितकेच न साधलें तर भेदाने, आणि हे सारेच उपाय हुकले तर पराक्रम करून मारणे हेही आपणाला कठीण नाहीं. इंद्राने शंबराला ज्याप्रमाणें तेव्हांच चिरडून टाकले त्याप्रमाणें आपणही यास केव्हांच चिरडाल. त्याची कथा काय !
भीष्म म्हणाले - राजा युधिष्ठिरा, असें आहे कीं, आणीबाणीचे प्रसंगीं विशेष जाणत्या लोकांचा व त्यातूनही वयोवृद्धांचा उपदेश ऐकावा. तेव्हां हें तत्त्व ध्यानांत आणून मीं माझ्या मंत्र्यांचे सांगीप्रमाणें युद्धाचा विचार तूर्त सोडून दिला. माझे मंत्री राजकार्यकुशलच होते. त्यांनीं तत्काल उत्तम उत्तम उपाय चालू केले. प्रथम शहाण्या शहाण्यांच्या विचारास आलें त्या त्या रीतींनी साम, दाम, इत्यादिकांचीं बोलणी लावून त्या उग्रायुधाला वाटेवर आणण्याचा उपाय केला. परंतु, खराखुराच नीचबुद्धि तो ! तो असल्या उपायांनी कशाचा वळणावर येणार ? त्यानें कांहीं न ऐकता घमेंडींतच आपल्या हातांत असलेले सुदर्शनासारखे तें जाज्वल्य चक्र आम्हांवर फेकले. परंतु, चमत्कार काय सांगावा कीं, तें तत्काल परत फिरले. कारण, त्या पातक्यानें दुसर्याची स्त्री हरण करण्यासारख्या नीच हेतूनें तें सोडले असतां, तें चालावे कसें ? बाकी त्याचें तें चक्र त्यानें गुरूनें सांगितलेली मर्यादा सोडून जेव्हां भलत्याच कामी सोडलें तेव्हांच तें फुकट गेलें, असें मी समजून चुकलो होतों. तसेंच भल्याभल्यांनीं त्या दुष्टाची त्याच्या या कृतीबद्दल निंदा केली असल्यामुळें तो आपले कर्मानेंच मेला आहे, हेंही मी समजून होतों. तथापि, लोकाचाराप्रमाणें माझें सुतक फिटल्यावर मीं विप्रांकडून आशीर्वाद संपादून धनुष्यबाण घेऊन रथांत बसून शहराबाहेर पडून शत्रूंशी भिडलों. नंतर हातझोंबीला येऊन एखाद्या बेहोष झालेल्या माणसाप्रमाणें शत्रूचा व माझा सतत तीन दिवस अंगबल व अस्त्रबल यांचा झगडा सुरू राहिला. तो इतका भयंकर कीं, त्याला एक देवासुरांचेच युद्धाची उपमा योग्य. अखेरीस मीं माझ्या अस्त्रतेजानें अगदीं भाजून काढिला, तेव्हां, हे धर्मा, तो इतका शूर खरा, तथापि, प्राण सोडून माझ्या समोरच तेथल्यातेथेच रणांगणांत पडला. इतक्या अवकाशांत म्हणजे नीप राजा व हा उग्रायुध हे नाहींसे होत आहेत तो पृषत राजा हा कांपिल्य नगरीला येऊन पोंचला; व त्यानें आपलें वडिलार्जित जें अहिछत्र नगरीचें आसपासचें राज्य ते सर्व काबीज केलें. हा पृषत म्हणजे द्रुपदाचा बाप. हा तेव्हां माझ्या तंत्रानें वागत असे. याचे हें राज्य पुढें अर्थातच द्रुपदाकडे आलें. परंतु कांहीं कालाने अर्जुनानें बाहुबलाने द्रुपदाला रणांत जिंकून कांपिल्य नगरीसकट तो सर्व अहिछत्र प्रांत द्रोणाला अर्पण केला. विजयी द्रोणांनी शिष्याच्या त्या देणगीचा सादर स्वीकार तर केलाच; पण, त्यांतून कांपिल्यनगरी त्यानें द्रुपदाला परत दिली, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. हे धर्मा, याप्रमाणे मी तुला ब्रह्मदत्त, द्रुपद व वीर उग्रायुध यांच्या वंशांची सविस्तर हकीकत सांगितली.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment