Sunday, 28 January 2018

भगवान विश्वकर्मा जयंती

*भगवान विश्वकर्मा जयंती*
----------------------------------------

आज विश्वकर्मा जयंती..ब्रह्मदेवाच्या दक्षिण वक्षभागातून विश्वकर्मा उत्पन्न झाला असे महाभारतात म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हाच अस्तित्वात होता.  प्रारंभी विश्वकर्मा हा सौरदेवतेची उपाधी म्हणून मानला जात होता, पण नंतरच्या काळात तो समस्त प्राणीसृष्टीचा जनक मानला गेला.  एक वैदिक देवता असाही उल्लेख आढळतो.  ऋग्वेदाच्या एका सुक्तात त्याला पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे.  सर्व देवांचे नामकरणही यानेच केले.  हा सर्वद्रष्टा असून, याला असंख्य मुखे, नेत्र, भुजा, पाय इत्यादी अवयव आणि पंखही होते, असे रूपवर्णन पौराणिक साहित्यात केले आहे.  याला सर्वद्रष्टा प्रजापती / विधाता प्रजापती म्हटले आहे.  पुराणे व महाभारत यात विश्वकम्र्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे.  याने इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला.  सुतलनामक पाताळलोक यानेच निर्माण केला.  श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही नगरे यानेच निर्माण केली. एक विख्यात शिल्पशास्त्रकार या नात्याने गरूड भवनाची निर्मितीदेखील विश्वकर्मा यानेच केली. विश्वकर्मावास्तुशास्त्र हा ग्रंथ विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.  या ग्रंथात पुढील गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

 *वास्तुविद्या* :-  वास्तुविद्या म्हणजे गृहरचनाशास्त्र.  वस = राहणे,  या  धातूपासून वास्तू हा शब्द बनलेला आहे.  त्याचा अर्थ निवासस्थान किंवा राहण्याचे घर असा होतो. निवासस्थान बांधण्याचे शास्त्र एवढाच मर्यादित अर्थ प्राचीन काळी वास्तुविद्या या शब्दाला होता. वास्तुविद्या ही शिल्पशास्त्राची एक शाखा होती.  शुक्रनीतिसार या ग्रंथात मंदिरे, देवप्रतिमा, उद्याने, तलाव, प्रासाद इत्यादींच्या निर्मितीचे शास्त्र अशी शिल्पशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. परंतु त्यानंतरच्या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथांत त्या संपूर्ण शिल्पशास्त्रालाच वास्तुशास्त्र म्हटले आहे. तथापि सर्वसाधारणपणे वास्तुविद्या म्हणजे गृहे, मंदिरे, प्रासाद, तट, मनोरे, बुरूज, किल्ले, तलाव, विहिरी, कालवे, स्तूप, विजयस्तंभ इत्यादी बांधण्याचे शास्त्र होय.  याविषयी अनेक संस्कृत ग्रंथ उपलब्ध असून त्यात वास्तुशास्त्राचे नियम दिलेले आहेत.  भारतात सर्वत्र मंदिरे, प्रासाद, मनोरे, स्तंभ, गडकोट, तलाव चांगल्या स्थितीत किंवा भग्नावशेषरूपात आढळतात त्यांना वास्तुशिल्पे  म्हणतात. 

 *वास्तुशास्त्र*  :–   त्या काळी वास्तुरचना हे एक धार्मिक कृत्य मानले जात होते.  वास्तुशास्त्राचे  काही नियमही अस्तित्वात होते, तसेच गृहरचनेविषयी सामान्य मार्गदर्शक तत्त्वेदेखील अस्तित्वात  होती.  उदाहरणार्थ घर बांधण्यासाठी योग्य भूमी कशी असावी, कोणत्या जागी मुख्य स्तंभ उभा करावा, त्याच्या भोवती निरनिराळ्या खोल्यांची रचना कशी असावी, या विषयीचे नियम होते. घरातील दरवाजे कुठे असावेत, यालाही खूप महत्त्व होते.  घराभोवती झाडे लावताना, कोणते झाड कोणत्या दिशेला लावावे किंवा लावू नये याबाबतदेखील नियम होते.  घरे  बांधण्यासाठी भाजलेल्या विटा वापरण्याची पद्धत अस्तित्वात होती. रामायण काळातदेखील वास्तुशास्त्र बरेच विकसित झाले होते.  राजे वास्तुशास्त्रज्ञांना खूप मान देत आणि वास्तुरचनेविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत.  विश्वकर्मा हे त्या काळातले प्रख्यात शिल्पतज्ज्ञ होते.  मय हा असुरांचा तर विश्वकर्मा हा देवांचा प्रमुख वास्तुविशारद मानला गेला आहे.  त्या काळातील भव्य प्रासादांची वर्णने रामायणात पुष्कळ ठिकाणी आढळतात.  त्यांचे विविध प्रकार होते.  सात किंवा आठ मजली प्रासादही त्या काळी बांधले जात.  त्यामध्ये विटा व दगड यांचे उल्लेख अगदी थोडे आहेत.  बहुतेक वर्णने काव्यमय असल्यामुळे वास्तुरचनेसाठी कोणते पदार्थ वापरले जात ते मात्र निश्चितपणे सांगणे कठीण आहे.  वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिणाऱ्या १८ वास्तुशास्त्रज्ञांची नावे पुढीलप्रमाणे  :–

(१) भृगू      (२) अत्री  
(३) वसिष्ठ   (४) विश्वकर्मा 
(५) मय        (६) नारद 
(७) नग्नजित  (८) विशालाक्ष 
(९) पुरंदर      (१०) ब्रह्मा 
(११) कुमार    (१२) नन्दिश   
(१३) शौनक    (१४) गर्ग 
(१५) वासुदेव   (१६) अनिरुद्ध 
(१७) शुक्र      (१८) ब्रहस्पति.

विश्वकर्मा हे नाव परंपरागत आहे.  तो देवांचा वास्तुविशारद होता.  कालांतराने विश्वकर्मा या शब्दाला चांगला वास्तुविशारद असा अर्थ प्राप्त झाला आणि पुढे अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी विश्वकर्मा ही पदवी धारण केली. 
(संदर्भ- भारतीय संस्कृतिकोष )
=========================
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Saturday, 27 January 2018

षष्ठीदेवी

*🔅  षष्ठीदेवी*🔅
--------------------------

नारद म्हणाले, "षष्ठी, मंगलचंडी, मनसा ह्या प्रकृतीच्या कला आहेत. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे." 

श्री नारायण म्हणाले, "प्रकृतीच्या सहाव्या अंशात्मक देवीला षष्ठी म्हणतात. ती विष्णूची माया असून बालकांची अधिष्ठात्री देवता आहे. षोडश मातृकातील ती प्रसिद्ध देवी आहे. ती देवसेना या नावाने प्रसिद्ध असून स्कंदाची प्रिय व सदाचरणी भार्या आहे. बालकांना आयुष्य देणारी, त्यांचे पालन-रक्षण व पोषण करणारी ती सिद्धयोगिनी आहे. आता तिचा पूजा विधी ऐक. 

स्वयंभुव मनूचा पुत्र प्रियव्रताने भार्येचा स्वीकार न करता तो तपश्चर्या करू लागला. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळेच त्याने नाईलाजाने विवाह केला. विवाहानंतर बराच कालावधी गेला. तरी त्यांना पुत्र झाला नाही. म्हणून कश्यपाने त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास लावले. प्रियव्रताने आपली भार्या मालिनी हिला यज्ञाचा चरू भक्षण करण्यास सांगितले. पुढे तिला गर्भ राहिला. देवांची बारा वर्षे तिने तो गर्भ धारण केला. 

पुढे यथावकाश तिने एका सुवर्णकांती असलेल्या बालकास जन्म दिला. पण दुर्दैवाने ते बालक जन्मतःच मरण पावले. त्यामुळे त्याचे सर्व आप्तेष्ट दुःखाकुल झाले. माता अतीव दुःखामुळे मूर्च्छित पडली. राजाने बालकाला स्मशानभूमीवर नेले. पण तेथे अनिवार दुःखामुळे त्याने बालकाला हृदयाशी कवटाळले. राजा मृत पुत्राला सोडण्यास तयार होईना. अखेर तो स्वतःच प्राण देण्यास सिद्ध झाला. त्याचवेळी स्फटिकाप्रमाणे शुद्ध, मण्यांनी विभूषित, तेजस्वी, रेशमी वस्त्राने विभूषित असलेले सुंदर व सचित्र पुष्पमाला धारण केलेले उत्कृष्ट विमान राजाला दिसले. अत्यंत सुंदर अशी भगवती देवी विमानात विराजमान झाली होती. पांढर्‍या चाफ्याप्रमाणे शुभ्र वर्णाची, चिरयौवना, प्रसन्न चेहर्‍याची, दयाळू, भक्तानुग्रही अशा त्या देवीला अवलोकन करताच राजाने हात जोडले. तो तिची स्तुती करू लागला. त्याने आपल्या मृत पुत्रास भूमीवर ठेवले व भगवतीचे पूजन केले. 

तेव्हा ती महातेजस्वी स्कंदभार्या प्रसन्न झाली. राजा म्हणाला, "हे सुंदरी, तू आहेस तरी कोण ? तू धन्य व मान्य आहेस. तू कोणाची कन्या आहेस ?" 

ती देवी पूर्वी देवांच्या सेनेची प्रमुख होती. तिनेच देवांना विजय प्राप्त करून दिला. म्हणून तिला देवसेना म्हणतात. ती जगन्मंगलरूप चंडिका देवसेना म्हणाली, "मीच ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे. उत्पन्न होताच मला पित्याने स्कंदास अर्पण केले. मीच षष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे. मी प्रकृतीच्या सहाव्या अंशाची कला असून मी निपुत्रिकाला पुत्र देते. मी पुरुषाचे मनोरथ पूर्ण करते, दरिद्र्यांना धन व कर्माचे फल देत असते. हे राजा, सुख, दुःख, हर्ष, खेद वगैरे सर्व कर्मामुळे प्राप्त होत असतात. पुत्र होणे, न होणे अथवा पुत्राचा मृत्यु होणे या सर्व घटना कर्मामुळेच घडत असतात. कोणतीही संकटे, आपत्ती ही कर्मामुळेच प्राप्त होतात." असे म्हणून देवीने त्या मृत बालकाला हातात घेतले व त्याला सहज जिवंत केले. तेव्हा त्या हसतमुख पुत्रास पाहून राजाला अपार आनंद झाला. पण त्या बालकाला घेऊनच ती देवी विमानातून निघून जाऊ लागली. ते पाहून राजा हृदयव्याकुळ झाला. नंतर राजाने तिचे स्तवन केले. त्यामुळे देवी संतुष्ट होऊन राजाला म्हणाली, " हे राजा, तू तिन्ही लोकांचा राजा आहेस. म्हणून तू सर्वांना माझी विधिपूर्वक पूजा करण्यास सांग. तसेच तूही माझे पूजन कर. त्यामुळे तुला बलदंड पुत्र होईल. हा पुत्र नारायणाचा अंश आहे. त्याला पूर्व जन्माचे स्मरण असून हा अत्यंत पंडित आहे. शिवाय याच्या अंगी एक लक्ष हत्तीचे बळ आहे. मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झाले आहे. म्हणूनच धनवान, गुणवान, शुद्ध, विद्वान, प्रिय, ज्ञानी,

यशस्वी व संपत्तीदायी असा हा पुत्र तुला मी दिला आहे." 

असे म्हणून देवीने त्या बालकाला राजाचे स्वाधीन केले. राजाने तिची पूजा करण्याचे वचन दिल्यावर राजाला अनेक वर देऊन देवी स्वर्गलोकी निघून गेली. राजाही आपल्या अमात्य व मंत्र्यांसह राजवाडयात परत आला. पुत्र जिवंत झाल्यामुळे राजाची भार्या व इतर आप्त सर्वजण आनंदित झाले. नंतर राजाने पुत्राचा जन्मोत्सव केला. ब्राह्मणांना विपुल दक्षिणा देऊन त्याने दरमहा शुक्ल षष्ठीस प्रजेकडून षष्ठीदेवीचा महोत्सव केला. सूतिकागृहात बालकाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी व एकविसाव्या दिवशी तिचे पूजन करण्यास सुरुवात केली. बालकाच्या सर्व शुभकर्माचे दिवशी त्याने सर्वांकडून षष्ठीचे पूजन करविले व स्वतःही पूजन केले. 

हे नारदा, देवीचे कौमुदशाखेत सांगितलेले ध्यान व पूजाविधी स्तोत्रासह तुला सांगतो. 

शालग्राम, घट, वटवृक्ष, अथवा भिंतीवर पुतळी काढून त्या ठिकाणी तिची कल्पना करावी व तिचे पूजन करावे. 

"जिची कांती श्वेत चंपकाप्रमाणे आहे, विविध रत्नांनी जी विभूषित आहे अशा या श्रेष्ठ देवसेनेची मी पूजा करतो." 

असे म्हणून पूजेच्या निर्माल्यातील पुण्य स्वतःच्या मस्तकावर धारण करून तिचे ध्यान करावे. नंतर व्रतस्थ राहून मूलमंत्रोक्त पाद्य, अर्घ्य, आचमन, गंध, पुष्प, धूप, दीप, निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य, मधुर फळे वगैरे उपचारांनी तिचे पूजन करावे. 

*" ॐ र्‍हीं षष्ठीदेव्यै स्वाहा ।""*

अशा अष्टाक्षरी मंत्राचा जप करावा. तिची स्तुती करून तिला नमस्कार करावा. सामवेदोक्त तिचे स्तोत्र म्हणावे. नंतर अष्टाक्षरी महामंत्राचा लक्ष जप करावा. म्हणजे त्यामुळे पुत्रप्राप्ती होते. आता सर्व शुभकामना पूर्ण करणारे तिचे स्तोत्र सांगतो. 

प्रियव्रत म्हणाला, "महादेवी, शांतस्वरूपिणी, सिद्धी अशा देवीला माझा नमस्कार असो. त्या शुभ व षष्ठी नावाच्या देवसेनादेवीस माझा नमस्कार असो. वरदायिनी, पुत्रदायिनी, धनदायिनी अशा देवीला नमस्कार असो. सुखदा, मोक्षदा, अशा स्कंदपत्नीस प्रणाम असो. सृष्टीरूप, प्रकृतीचा सहावा अंश असलेल्या अशा सिद्ध ईश्वरीस मी वंदन करतो. माया व सिद्धयोगिनी अशा देवी षष्ठीस मी नमस्कार करतो. साररूप शारदा नावाच्या देवीस माझे वंदन असो. बलांची अधिदेवता, कल्याणी, कर्मफलदायिनी षष्ठी देवीस मी नमस्कार करतो. 

भक्ताला प्रत्यक्ष दर्शन देणारी, सर्व कर्मांना पूज्य असलेल्या स्कंद भार्येस माझा प्रणाम असो. हे देवांचेही संरक्षण करणार्‍या षष्ठीदेवी, तुला माझा नमस्कार असो, शुद्ध सत्त्वरूप, सर्वांस वंद्य, हिंसा व क्रोध यांचा त्याग केलेली अशी जी देवी षष्ठी, त्या देवीला मी लोटांगण घालतो. हे सुरेश्वरी, मला धन, स्त्री, पुत्र, मान, जय इत्यादी प्राप्त करून दे. हे महेश्वरी, माझ्या शत्रूचा नाश कर. यशदायिनी षष्ठी देवी, माझा तुला नमस्कार असो." अशी प्रियव्रताने देवीची स्तुती केली. तेव्हा देवीच्या प्रसादामुळे त्याला पुत्रलाभ झाला. हे षष्ठीचे स्तोत्र जो वर्षभर श्रवण करतो, त्याला चिरंजीव पुत्र प्राप्त होतो. तसेच एक वर्ष तिची पूजा करून हे स्तोत्र श्रवण केल्यास पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो. महावांझ पत्नी असली तरी देवीच्या भक्तास पुत्रलाभ होतो. शूर, गुणी, धनवान, रूपवान, दीर्घायुषी असा सर्वलक्षणसंपन्न पुत्र देवीच्या प्रसादाने प्राप्त होतो. 

*काकवंध्या, मृतवांझ स्त्रीलाही षष्ठीच्या सेवेने सुपुत्र होतो. रोगग्रस्त बालकाच्या पित्याने अथवा मातेने हे स्तोत्र श्रवण केल्यास ते बालक एक महिन्यात निरोगी होते."*
@   देवीभागवत..
======================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
   *ज्ञानामृत मंच समुह*

Friday, 26 January 2018

स्वधादेवी

*🔅 स्वधादेवी*🔅
----------------------------
  
श्री नारायण म्हणाले, "हे नारदा, पितरांची तृप्ती करणारे, श्राद्धान्नाचे फल वृद्धिंगत करणारे असे स्वधेचे आख्यान तुला सांगतो." 

सृष्टीच्या आरंभी जगत्कर्त्याने पितृगण उत्पन्न केले. त्यापैकी चार मूर्तिमंत व तीन तेजोरूप होते. त्या सात पितृगणांसाठी त्याने तर्पणयुक्त आहार केला. स्नान व तर्पणयुक्त श्राद्ध, देवपूजन, त्रिसंध्यांत अन्हिक हे ब्राह्मणांचे वेदोक्त कर्म आहे. जे असे आचरण करीत नाहीत ते विषहीन सर्पाप्रमाणे होत. देवीची पूजा न करणारा, श्रीहरीस नैवेद्य न दाखवता खाणारा हा जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे स्मशानात भस्म होईपर्यंत सुतकी समजावा. पितरांसाठी श्राद्धे वगैरे निर्माण केल्यावर ब्रह्मदेव स्वस्थानी गेला. पण ब्राह्मण वगैरे जे तर्पण करीत होते, ते पितरांना प्राप्त होत नव्हते. तेव्हा सर्व क्षुधार्त पितर ब्रह्मदेवाकडे गेले. नंतर ब्रह्मदेवाने एक मानसकन्या उत्पन्न केली. ती गुणरूप व यौवनसंपन्न होती. विद्यावती, शुद्ध, प्रकृतीच्या अंशभूत स्वधा नावाची सुंदर कन्या होती. ती लक्ष्मीच्या लक्षणांनी युक्त पद्मरूप धारण करणारी, पितरांची पत्नी होती. पद्माप्रमाणे नेत्र असलेली अशी ती कन्या ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केली व ब्राह्मणांना तिचा अत्यंत गुप्त उपदेश केला. त्या स्वधात मंत्रामुळे पितरांना भाग मिळण्याची व्यवस्था केली. म्हणून देवांना दान देताना स्वाहा व पितरांना स्वधा असे मंत्र सांगितले आहेत. नंतर पितर, देवता, ब्राह्मण, मुनी वगैरे सर्वांनी स्वधेचे स्तवन केले. स्वधेच्या वरामुळे सर्वजण संतुष्ट झाले. 

"हे नारदा, मी तुला स्वधेचे उपाख्यान निवेदन केले. आता आणखी तुला काय ऐकायचे आहे ?" 

नारद म्हणाले, "हे महामुने, आता स्वधेचे पूजन व तिचे स्तोत्र मला सांगा."

श्री नारायण म्हणाले, "श्राद्धदिनी, मघायुक्त दिवशी, शरदऋतूतील कृष्ण त्रयोदशीस प्रयत्नपूर्वक स्वधेचे पूजन करावे. नंतर श्राद्ध करावे. स्वधेची पूजा न करता श्राद्ध करणार्‍यास तर्पणाची फलप्राप्ती होत नाही. 

"चिरयौवनसंपन्न, पितर व देव यांना पूज्य अशा ब्रह्मदेवाच्या कन्येचे मी स्तवन करतो." असे म्हणून शीला अथवा मंगल घटात तिची कल्पना करावी. नंतर तिला मूलद्रव्ये व पाद्य अर्पण करावे. 

*"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहा ।"*
 असे म्हणून तिची पूजा व स्तुती करावी. आता ब्रह्मदेवाने स्वतः केलेले स्तोत्र ऐक.

स्वधेच्या केवळ उच्चाराने पुरुषाचे तीर्थस्नान घडते. तो पापमुक्त होतो. त्याला वाजपेयज्ञाचे फल मिळते. स्वधा, स्वधा असे त्रिवार स्मरण केल्यास श्राद्ध, बली व तर्पणाचे फल मिळते. श्राद्धाचे वेळी एकाग्र चित्ताने स्वधेचे स्तोत्र ऐकणार्‍यास श्राद्धाचे पूर्ण फल मिळते. तसेच पुत्र अथवा स्त्री प्राप्त होते. स्वधा, तू श्राद्धांची अधिष्ठात्री देवता आहेस. तू नित्य, सत्यरूप व पुण्यरूप आहेत. सृष्टीकाली व प्रलयकाली तुझी उत्पत्ती व लय होतो. *ॐ स्वस्ति नम:, स्वाहा, स्वधा व दक्षिणा या सर्वांना प्रशस्त होत.* कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून परमेश्वराने यांना उत्पन्न केले असे ब्रह्मदेव ब्रह्मसभेत म्हणाला व स्तब्ध झाला. त्याचक्षणी स्वधा तेथे प्रकट झाली. तेव्हा त्या कमलमुख स्वधेला ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केले. त्यामुळे पितर अत्यंत हर्षित झाले. 

हे स्वधेचे स्तोत्र एकाग्र होऊन ऐकल्यास सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते व त्याचे मनोरथ पूर्ण होतात."
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

दक्षिणा देवी

*🔅  दक्षिणा देवी 🔅*
----------------------------------
स्वाहा व स्वधा यांचे स्तुत्य, मधुर व उत्कृष्ट चरित्र मी सांगितले. आता दक्षिणेचे आख्यान सांगतो. 

पूर्वी हरीची प्रिया गोपी सुशीला गोलोकात गेली. ती राधेची मुख्य सखी, धन्य, मनोहर होती. तसेच रूप, गुण, स्वभाव यांनी ती श्रेष्ठ असून कला जाणणारी होती. जिचे अंग कोमल, तेजस्वी, नेत्र कमलाप्रमाणे व जिची श्रोणी उत्तम आहे, स्तन उत्कृष्ट आहेत, वर्ण काळा आहे, शरीर बांधेसूद असून रत्नालंकारांनी विभूषित आहे, थोडक्यात जी अत्यंत सुंदर आहे, कामशास्त्रनिपुण, पतीची इच्छा करणारी अशी कृष्णाप्रिया आहे, तसेच सर्व रसांविषयी रसिक आहे आणि जी रासमंडळात राधेच्या समक्ष कृष्णाच्या अंकावर विराजमान झाली आहे अशी ती, तिच्यापुढे राधिकेनेही मान खाली घातली आहे, मधुसूदनही भयाने खाली पहात आहे, अशी ती श्रेष्ठ स्त्री होती. 

जिचे नेत्र रक्तकमलाप्रमाणे असून कामामुळे वदन लाल झाले आहे, अंग कोपाने कंपित झाले आहे, ओठ स्फुरण पावत आहेत अशा त्या सुंदरीला पाहून व राधेचा हेतू जाणून श्रीकृष्ण गुप्त झाला. कांत पळाल्याचे पाहून सुशीला वगैरे गोपी थरथर कापू लागल्या. तेव्हा राधेस त्या म्हणाल्या, "आमचे रक्षण कर." असे म्हणून त्या राधेस शरण गेल्या. पती पळून गेल्याचे अवलोकन करून राधेने सुशीलेस शाप दिला. 

"आजपासून ती गोपी गोलोकी आली तर पाऊल ठेवताच भस्म होऊन जाईल." असे म्हणून रागाने ती रासेश्वरास बोलावू लागली. पण कृष्ण तिला न दिसल्यामुळे तो एकेक विरहक्षण तिला कोटी युगाप्रमाणे वाटू लागला. ती म्हणाली, "हे नाथ, हे प्राणप्रिया, तुझ्यावाचून प्राण रहात नाहीत. पतीने मान दिला की स्त्रीचा गर्व नित्य वृद्धींगत होत असतो. म्हणून ज्याच्यापासून सुख मिळते त्याचीच सेवा करावी. कुलवान स्त्रियांचा सर्वात परम आप्त म्हणजे पती होय. तोच संपत्तीरूप व भोग देणारा आहे. तोच मान देणारा, संसारातील उत्तम सारभूत स्वामी होय. इतर सर्व आप्तांमध्ये पतीच श्रेष्ठ होय. तोच भरण-पोषण करतो म्हणून त्याला भर्ता म्हणतात. तो पालन करतो म्हणून त्याला पती म्हणतात. 

शरीरावर त्याचा अधिकार असतो. तो काम देतो म्हणून त्याला कांत म्हणतात. तो सुखवृद्धी करतो म्हणून त्याला प्रिय म्हणतात. ऐश्वर्य देतो म्हणून ईश, प्राणांचा स्वामी असल्याने प्राणनायक असे म्हणतात. त्याच्या शुक्रापासून पुत्र होतो. म्हणून तो स्त्रियांस प्रिय असतो. शंभर पुत्र देणारा स्वामी स्त्रियांना अधिक प्रिय असतो. हीन कुळात जन्मलेली स्त्री पतीस जाणू शकत नाही. व्रते, तीर्थस्नाने, यज्ञदक्षिणा, पृथ्वीप्रदक्षिणा, तप, महादाने, गुरूची सेवा, ब्राह्मणाची सेवा, वेदसेवा इत्यादी पुण्य कृत्ये पतीच्या पदसेवेच्या प्रमाणात सोळाव्या कलेइतके पण नाहीत. कारण ह्या सर्वांपेक्षा पती श्रेष्ठ असतो. मी सर्वेश्वरी ज्याच्या प्रसादाने उत्पन्न झाले त्या कांताला मी जाणीत नाही. स्त्री स्वभाव उल्लंघन करता येत नाही." 

असे म्हणून राधेने श्रीकृष्णाचे भक्तिपूर्वक ध्यान केले. ती रडत रडत म्हणाली, "हे नाथ, हे नाथ, हे रमणा, दर्शन दे. मी विरहव्याकुल झाले आहे." 

इकडे सुशीला देवी गोलोकातून भ्रष्ट झाल्यामुळे दीर्घकालीन तपश्चर्येने लक्ष्मीच्या देहात प्रविष्ट झाली. पुढे देवांनी अत्यंत दुष्कर यज्ञ केला, पण त्याचे फल न मिळाल्यामुळे ते खिन्न होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. 

ते ऐकून ब्रह्मदेवाने विष्णूचे स्मरण केले. तेव्हा 'मी तुझे कार्य करीन.' अशी विष्णूने प्रेरणा दिली. नंतर लक्ष्मीच्या देहापासून भगवान नारायणांनी मर्त्याची लक्ष्मी जी दक्षिणा, तिला उत्पन्न केले व ती ब्रह्मदेवाला अर्पण केली. कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून ब्रह्मदेवाने ती यज्ञाला अर्पण केली. यज्ञाने तिची पूजा करून तिचे स्तवन केले. ती अत्यंत तेजस्वी, कोटीसूर्याप्रमाणे प्रभा असलेली, सुंदर, कोमलांगी, कमलनेत्रा, शुद्ध वस्त्र परिधान केलेली, मधुर ओष्ठ असलेली अशी सुदंती होती. ती प्रसन्नमुखी व वस्त्राभूषणांनी विभूषित होती. मोहक, कस्तुरी बिंदूमुळे केशाचा खालचा भाग उज्वल दिसत होता. तिचा नितंबप्रदेश प्रशस्त होता. तिची श्रोणी व स्तन मोठे होते. त्या कामबाणांनी पीडीत झालेल्या सुंदरीस पाहून यज्ञपुरुषास मूर्च्छा आली. त्याने तिचा विधीपूर्वक पत्नी म्हणून स्वीकार केला. नंतर देवांची शंभर वर्षे निर्जन वनामध्ये एकांतात त्याने त्या रमणीसह क्रीडा केली. नंतर देवीने बारा वर्षे दिव्य गर्भधारणा केली. तेव्हा तिला कर्माचे फल या नावाचा पुत्र झाला. कर्म पूर्ण झाल्यावर तिचा पुत्र फल देतो.

हा यज्ञपुरुष दक्षिणा व फल याच्यासह कर्मठांना कर्माचे फल देतो. हे नारदा, त्या पुत्र फलामुळे सर्व देवही संतुष्ट झाले. त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. नंतर ते सर्व स्वस्थानी गेले. 

कर्त्याने कर्म जाणून दक्षिणा द्यावी म्हणजे फलप्राप्ती होते. कर्म कर्त्याने कर्म पूर्ण झाल्यावर दक्षिणा देण्यास विलंब लावला तर फल कमी होते. दक्षिणा न देता एक रात्र गेल्यास ते शंभरपटीने, तीन रात्री गेल्यास त्यापेक्षा शंभरपट, महिना लोटल्यास लक्षपट, एक वर्ष लोटल्यास तीन कोटीपटीने फल निष्फल होते. असा यजमान कर्माचा अधिकारी होत नाही. त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते. देव व अग्नी त्याची पूजा स्वीकारीत नाहीत. 

दक्षिणेकरता याचन करून यजमानाने दक्षिणा न दिल्यास तो यजमान कुंभिपाक नरकात पडतो. तेथे तो एक लक्ष वर्षे राहतो. नंतर व्याधीयुक्त, दरिद्री होऊन चांडाळ होतो. तो पूर्वीचे व नंतरचे सात पुरुष अधोगतीस धाडतो. 

हे नारदा, मी तुला दक्षिणेचे आख्यान सांगितले. आता आणखी काय तुला ऐकायचे आहे ? 

नारद म्हणाला, "दक्षिणाहीन मनुष्य कोणते फल भोगतो ? दक्षिणेचे पूजन कोणत्या प्रकारे करतात ?" नारायण म्हणाले, "दक्षिणाशून्य कर्माचा भोग बळी घेतो. कारण वामनाने ते कर्म बलीस दिले आहे. श्रोत्रिय नसलेल्या ब्राह्मणास श्राद्ध पदार्थ देणे, श्रद्धाहीन दान देणे, अधम ब्राह्मणांचा यज्ञ, अपवित्र पुरुषाचे पूजन, अभक्त शिष्याने केलेली सेवा या सर्व कर्माचे भोग बली हरण करतो. आता दक्षिणेचे पूजाविधान सांगतो. 

यज्ञ कामातुर होऊन स्तुती करू लागला. तो म्हणाला, "पूर्वी तू गोलोकात गोपी होतीस. तू सर्व गोपीमध्ये श्रेष्ठ, राधेच्या बरोबरीची सखी, श्रीकृष्णाची अत्यंत प्रिया होतीस. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी रासमंडळात, राधेच्या महोत्सवकाली, तू लक्ष्मीच्या उजव्या खांद्यापासून प्रकट झालीस. म्हणून तुला दक्षिणा हे नाव प्राप्त झाले." 

हे सुंदरी, शीलसंपन्नतेमुळे तुला सुशील म्हणतात. राधेच्या शापामुळे तू दक्षिणा झालीस. गोलोकातून भ्रष्ट होऊन तू माझ्या भाग्यामुळे तेथे प्राप्त झालीस. माझा स्वामी म्हणून स्वीकार कर. कर्माचे फल देणारी तू आहेस. ब्रह्मा, विष्णु, महेश, दिक्पाल हे देखील कर्माचे फल देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेव कर्मरूपी, महेश्वर फलरूपी, यज्ञरूपी मी विष्णु आहे. तू सर्वांची साररूपी आहेस. फल देणारी परब्रह्म आहेस. स्वतः श्रीकृष्णही तुझ्यासह शक्तिमान होतो. हे प्रिये, तू माझी शक्ती आहेस. तुझ्यामुळेच मी कर्माविषयी समर्थ आहे." 

असे म्हणून यज्ञ तिच्यापुढे उभा राहिला. तेव्हा ती दक्षिणा प्रसन्न झाली. तिने यज्ञ पुरुषाची सेवा केली. जो यज्ञकाली दक्षिणा स्तोत्र म्हणतो, त्याला यज्ञफल सत्वर मिळते. राजसूय, वाजपेय, गोमेध, नरमेध, अश्वमेध यांचे पुण्य लाभते. धन देणारे व पूर्वकर्म फल देणारा गजमेध, लोहयज्ञ, सुवर्णयज्ञ, ताम्रयज्ञ, शिवयज्ञ, रुद्रयज्ञ, बंधुक नावाचा शकयज्ञ, वरुणयाग, कंडक नावाचे वैरीमर्दनकर्म, शुचियज्ञ, धर्मयज्ञ, पापनाश करणारा अध्वर, ब्रह्मरूप, कर्मयाग, मलप्रकृतीयाग वगैरे समारंभाचे वेळी हे स्तोत्र म्हणणार्‍याचे याग निर्विघ्नपणे पार पडतात. आता ध्यान व पूजाविधी सांगतो. 

शालिग्राम अथवा घरामध्ये दक्षिणेचे पूजन करावे. लक्ष्मीच्या अंशभूत असलेली, कमलेची कला, कर्मदक्ष, फलदायी, विष्णूची शक्तीरूप, पूज्य, वंद्य, शुभलक्षणयुक्त, शुद्धीदायी, सुशील अशा दक्षिणेचे पूजन करतो. 

अशा वेदोक्त मंत्राने देवीस पाद्यादि अर्पण करावे. 
*"ॐ श्री क्लीं र्‍हीं दक्षिणायै स्वाहा ।"*

असा हा मंत्र आहे. नंतर तिचे यथासांग पूजन करावे. हे दक्षिणेचे आख्यान सुखदायी व कर्मफल देणारे आहे. निपुत्रिकांना पुत्र प्राप्त होतो. भार्याहीनास भार्या मिळते. विद्याहीनास विद्या, दरिद्र्यास धन, भूमीहीनास भूमी अशी त्यापासून फलप्राप्ती होते. संकट-विपत्तीच्या वेळी एक महिनाभर हे आख्यान श्रवण करावे म्हणजे तो सर्वांतुन मुक्त होतो.
=====================≠=📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Thursday, 25 January 2018

रामनामाने कुंडलिनी जागृती

*…रामनामाने कुंडलिनी जागृती…*

(संदर्भ- चरित्र पृष्ठ ६४० ते ६४१)
---------------------------------------
*कुंडलिनी मोठी प्रकृती म्हणजे विश्वशक्ती.*

ती गोळा होऊन माणसाच्या ठिकाणी वास करते. बहुतेक माणसांमध्ये तिचे तोंड खाली असते, शिवाय ती निजलेली असते.
*अनुग्रहाचा परिणाम -* सद्‌गुरुकडून नाम घेतले म्हणजे ती जागी होते व तिचे तोंड वरच्या दिशेला होते. सत्संगाने व नुसत्या नामस्मरणानेदेखील ती जागी होऊन तिचे तोंड वर होते.
कुंडलिनीचे आरोहण – वर जाणे.
………………………………………
*पहिली पायरी -*
या वेळी माणूस संतदर्शने घेतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, संतकृपा व्हावी म्हणून प्रार्थना करतो आणि नियमाने नामस्मरण करतो.
………………………………………
*दुसरी पायरी -*
ही शक्ती बेंबीपाशी असते. माणसाची वासना बेंबीपाशी वास करते. तेथे कुंडलिनी येऊन स्थिर झाली म्हणजे माणसाची वासनाच बदलते. इंद्रियांचे भोग भोगण्याची लालसा नकळत क्षीण होते. नामाला जीवन वाहावे अशी उत्कट इच्छा होते. आतील संघर्षाचा कमीजास्त तीव्र अनुभव येतो. गतायुष्याबद्दल पश्चात्ताप होतो. पण येथे जीवनाचे खरेध्येय निश्चित होते.
येथे पोचल्यावर काही लोकांना काव्य सुचते, नवीन कल्पना सुचतात, वाक्‌चातुर्य प्राप्त होते. [कुंडलिनी जागृतीचा पहिला टप्पा]
………………………………………
*तिसरी पायरी -*
येथे न थांबता साधकाने चिकाटीने नामस्मरण चालू ठेवले तर कुंडलिनी हृदयापर्यंत पोचते. तेथे एकीकडे आपल्या आराध्य दैवताचे सान्निध्य लाभते आणि दुसरीकडे जागेपणचा सबंध काळ नामाचे स्मरण टिकते. कधीकधी नामस्मरणातून दिव्य नाद ऐकू येतो. आराध्यदैवताच्या किंवा सद्‌गुरुंच्या मनोमय सान्निध्यातून त्यांच्याबद्दल नि:स्वार्थी प्रेम उदय पावते.
………………………………………
*चवथी पायरी -*
हृदयातून कुंडलिनी कंठात जाते. तेथे स्वप्नामध्ये व गाढ झोपेमध्ये नाम चालते. येथे किती वेळतरी मानसपूजा चालते.
………………………………………
*पाचवी पायरी -*
कुंडलिनी दोन्ही भुवयांच्यामध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुणदर्शन घडते. [कुंडलिनीचा दुसरा टप्पा]
कसोटी - येथे स्थिरावणे कठिण असते. लौकिकाची, सिद्धींची, श्रेष्ठपणाच्या कल्पनांची आकर्षणे विघ्ने आणून साधकाचे पाय खाली ओढतात.
संरक्षण – साधकाला श्रीसद्‌गुरुंचे संरक्षण लाभते.
………………………………………
*सहावी पायरी -*
येथपर्यंत फार थोडे जण येतात. साधक संपूर्ण शरणागत होऊन जातो. काही काळ तो भानावर असत नाही. पण मग देहावर योऊन अनेक जणांना नामाला लावतो.
〰〰〰〰♦〰〰〰〰
संकलन -  श्रीधर कुलकर्णी
* ज्ञानामृत मंच ग्रुप*

गायत्री मंत्राचा जप कसा करावा

*गायत्री मंत्राचा जप कसा करावा आणि यामुळे कोण-कोणते लाभ होतात*
……………………………………………
देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. गायत्री मंत्राचा जप केल्याने लवकर शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, या मंत्राच्या खास गोष्टी.

*गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।*

*अर्थ -* त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.

शास्त्रानुसार गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी तीन वेळा सांगण्यात आल्या आहेत. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी पहिली वेळ प्रातःकाळ, सूर्योदयापूर्वी मंत्र जप सुरु करावा. जप सूर्योदयापर्यंत करावा.

मंत्र जपासाठी दुसरी वेळ मध्यान्ह म्हणजे दुपारची आहे. दुपारच्या वेळीसुद्धा या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. यानंतर तिसरी वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गायत्री मंत्राचा जप सुरु करावा.

या तीन वेळेव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप करावयाचा असेल तर मौन बाळगून मानसिक स्वरुपात जप करावा. या मंत्राचा जप मोठ्या आवजात करू नये.
……………………………………………
*🖋🖋 श्रीधर कुलकर्णी*

सूर्यनमस्कार

*🌞🌞सूर्यनमस्कार🌞🌞*

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.
……………………………………………
हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते.वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

*आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने। जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।*

जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्या येत नाही (काहीही कमी पडत नाही)

सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व योगिक अभ्यासासाठी सुर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याच प्रमाणे सूर्य नमस्कार पहाटेच्या समयी सूर्योदयाला घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगी अभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो.
…………………………………………………
*मंत्र*
--------
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे.

*क्र. ____मंत्र ____चक्र*

१ - ॐ मित्राय नमः-अनाहत चक्र
………………………………………
2-ॐ रवये नमः-विशुद्धी चक्र
………………………………………
३ॐ सूर्याय नमःस्वाधिष्ठान चक्र
४ॐ भानवे नमःआज्ञा चक्र
………………………………………
५ॐ खगाय नमःविशुद्धी चक्र
………………………………………
६ॐ पूष्णे नमःमणिपूर चक्र
………………………………………
७ॐ हिरण्यगर्भाय नमःस्वाधिष्ठान चक्र
………………………………………
८ॐ मरीचये नमःविशुद्धी चक्र
………………………………………
९ॐ आदित्याय नमःआज्ञा चक्र
………………………………………
१०ॐ सवित्रे नमःस्वाधिष्ठान चक्र
………………………………………
११ॐ अर्काय नमःविशुद्धी चक्र
………………………………………
१२ॐ भास्कराय नमःअनाहत चक्र
__________________________
सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात
*|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||*

*सूर्यनमस्कार व शरीरसौष्ठव*

सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास

सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासुन सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे.अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.

शिवाजी महाराज व समर्थ रामदाससूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
〰〰〰〰♦〰〰〰〰
संकलन -  श्रीधर कुलकर्णी 
*ज्ञानामृत मंच*

देवळात का जायचे?*

*देवळात का जायचे?*

--------------🌹--------------
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहित असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधिपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.

आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

~~~~~~~~~~~~~~~~
*1)* देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धुऊन मगच मंदिरात प्रवेश करतो:

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स दूषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पांइट्स मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल. 

जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसीविंग मोड मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल.
……………………………………………
*2)* मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे:

ह्यामागेही दोन उद्देश आहेत: पहिला म्हणजे, ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
……………………………………………
*3)* आपले पाच सेन्सेस म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस उद्दीपित करतात:

कापूर जाळणे: दृष्टी.

*कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे:* स्पर्श.

*मूर्तीवर फुले वाहणे:* फुलांच्या अरोमामुळे वास.

कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे..चव. हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे: अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसीविंग मोड मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.

मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली उर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन.

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात ऊर्जेला सामावायला, अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला 
〰〰〰〰♦〰〰〰〰
संकलन - श्रीधर कुलकर्णी 
 *ज्ञानामृत मंच ग्रुप*

मंदिरात कासव का असते ?

*मंदिरात कासव का असते ?*

_________🌹_________
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. श्रीविष्णूकडून कासवाला तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. या ज्ञानामुळेच त्याची कुंडलिनी जागृत व्हावी, अशी त्याने श्री विष्‍णूंकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर श्रीविष्‍णूने आशीर्वादामुळे कासवाला मंदिरात गाभार्‍यासमोर स्थान प्राप्‍त झाले आहे. 

 कासवा हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.
- काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. 
-आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
……………………………………………
*कासवाचे गुण*
------------------------
1)कासवाला 6पाय असतात तसेच माणसाला 6 शत्रु असतात 
काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर 
कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे 
2) कासव हे आपल्या  पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वढवते (स्तन पान करीत नाही)त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना 
3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करवा 
यांकरीता कासव मंदिर मधे असते.
४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवाते.
……………………………………………
*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे. 
〰〰〰〰♦〰〰〰〰
संकलन - श्रीधर कुलकर्णी 
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

प्रदक्षिणा शास्त्र

*प्रदक्षिणा शास्त्र*
…………………………

मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया जी करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो. पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत.

मंदिरात जेव्हा पूजाअर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहातो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मूर्तीच्या कक्षेतील हिच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवा भोवती प्रदक्षिणा घातली जाते. पण प्रत्येक देवतेला वाटेल तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी ठराविक प्रदक्षिणाच घालाव्या लागतात.

गणपती आणि मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
 राम, कृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात.
 देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मात्र भगवान शंकराला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी.

प्रदक्षिणा घालण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावेत. प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये. तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे. त्य़ाच जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी. प्रदक्षिणा घालाताना कुणाशीही गप्पा मारू नयेत. यावेळी ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो, त्या देवाचं ध्यान करत राहावं. कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये.

काही ग्रंथानुसार देवाला समसंख्या व देवीला विषम संख्या त प्रदक्षिणा घालावी 

तरी पाच प्रदक्षिणा हे सर्वाना चालते असे मला वाटते 
〰〰〰〰♦〰〰〰〰
*संकलन - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

वास्तु टिप्स

*📕  ज्ञानामृत मंच 📕*

  🏡*वास्तु टिप्स*🏡

…………………………………………………………
♦आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . 
♦आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते.
♦उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते.
♦आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल.
♦बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात.
♦आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
♦घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये .
♦भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये .
♦झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते.
♦घरातील वय वर्ष २५ ते ६० असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे.
♦घरामध्ये अडगळ ,भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे.
♦घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात.
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

वास्तु टिप्स- २

*📕📕 ज्ञानामृत मंच 📕📕*
       *🏡वास्तु टिप्स- २ 🏡*


नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहुन घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते.
♦नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.
♦नवीन घर घेताना दक्षिण ,पश्चिम ,नैऋत्य आणि आग्नेय या दिशातुन येणारे दरवाजे टाळावेत.
♦भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबु  ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा.
♦घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.
♦घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले ,पाने ,सुकलेली तोरणे काढून टाकावीत . म्हणजे घरामध्ये शुभ उर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत.
♦घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पुर्व भिंतींवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पुर्व व उत्तर या शुभ दिशांना होते.
♦घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावीत म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते.
♦कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते .
♦झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणुस कर्ज बाजारी होतो .
♦घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेऊ नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते .
 ♦सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .
♦बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असु नये .
♦ लाल , काळा , मरून , हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरा मध्ये सुख - समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात .
♦झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये . त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो .
♦घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणुन मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे .
………………………♦…………………………
संकलन - श्रीधर कुलकर्णी 
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

*धारणा म्हणजे काय ?*

*धारणा म्हणजे काय ?*
………………………………………

*धारणा म्हणजे चित्त एकाग्रता, आणि ते केले तरच साधन होईल ना.*
.
भक्ती म्हणजे ईश्वराविषयी, धर्माविषयी प्रेम. भक्तीचे नऊ प्रकार आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.. याचे श्रेष्ठत्व १ पासून ९ पर्यंत असे असते.
.
*भक्तीचेन योग देव|*
*निश्‍चये पावती मानव॥*
*ऐसा आहे अभिप्राव|*
*इये ग्रंथी॥*
.
श्रद्धा हा व्यक्तीचा अत्यंत मौलिक असा अलंकार आहे. आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? ही म्हण आपलेकडे प्रसिद्ध आहे. अंतःकरणात श्रद्धेचा जिवंत झरा नसेल तर भक्ती हा केवळ सोपस्कार होईल. श्रद्धायुक्त भक्तीच साधकाला मोक्ष सुखाचा अनुभव देऊ शकते. सर्वच संतांनी या भक्तीच्या नऊ पायऱ्या सांगितल्या आहेत.
.
आपण फक्त या देहाचे विश्वस्त आहोत. खरा मालक वेगळाच आहे ही धारणा अंतःकरणात पक्की झाली की पुढची सगळी कर्मे आपोआप आपले कडून होतात. नवविधा भक्तीची पहिली पायरी ‘‘श्रवण’’ ही आहे. प्रयत्नपूर्वक चिकाटीने व श्रद्धेने श्रवण केले तर खऱ्या अर्थाने दुसरी पायरी ‘‘कीर्तन’’ आपोआप होईल. कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मियता साधली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
.
भक्तीमध्ये जीवाचे ईश्वराशी नाते जोडले जाते. प्रत्येक जण कशाशी तरी कोणाशी तरी जोडलेला असतो. ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल यत्किंचितही संशय मनात असू नये. यालाच भाव असे म्हणतात. ईश्वर आहेच या दृढ विश्‍वासातूनच भक्ती जन्म घेते. जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्ये आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाढलेला असतो.
.
पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्‍चित जाणीव झाली की भाव केंद्रित होतो. आपल्या हक्काचा आणि हाताशी असलेले स्वानंद जीव गमावून बसतो याचे कारण त्याचे मन. या मनाला भगवंताकडे वळविण्यासाठीच भक्तीचे नऊ प्रकार सांगावे लागले.
.
भक्तीमध्ये ज्ञान आहे. हे ज्ञान झाल्यावाचून जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे. भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हापुन्हा त्याचेच चिंतन करीत राहतो. भक्तीमध्ये कर्म आहे. कारण भगवंतासाठी काहीतरी केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही. भक्तीमध्ये योगदेखील आहे. कारण खर्‍या प्रेमाने भगवंताचे चिंतन करताकरता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो.
➖ ➖ ➖ ➖📕 ➖ ➖ ➖ ➖ 
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

परशुराम यांचे वैशिष्ट्ये

*परशुराम यांचे वैशिष्ट्ये*
_____________🌹____________
*अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।*
*इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।*

*अर्थ :* चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर’, असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.

*धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक :*
 एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.

*दानशूर :* 
परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.

*भूमीची नवनिर्मिती :* 
जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.’ यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला *`परशुरामक्षेत्र’* ही संज्ञा आहे.
परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
〰〰〰〰〰⚔
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

सत्संगती का करावी ?

सत्संगती का करावी ? 
______☀_______

मन सत्संगात गेले नाही, तर दुसरीकडे म्हणजे पर्यायाने कुसंगतीत जाईल.  कारण मन रिकामे राहू शकत नाही.  त्याला कुठलातरी संग जोडलाच पाहिजे.  त्यामुळे कुसंगतीत मन विषयाभिमुख होऊन त्या जीवाचा अधःपात होईल.  कुसंग जीवनाचा महानाश करणारा आहे.   *‘ सङ्गात् संजायते कामः |* ’ व नंतर *‘ बुद्धिनाशात् प्रणश्यति | ’* असा शेवट ठरलेलाच आहे.

हे स्पष्टपणे लक्षात घेऊन विवेकी साधकाने विषयात मन न नेता सत्संगात न्यावे.  स्वभावतःच शरीर, इंद्रिये व मन विषयाभिमुख असल्याने, मुद्दाम विषयांच्या संगात मन न्यावेच लागत नाही. संस्कार व विषयप्राबल्यामुळे मन स्वभावतःच विषयांकडे जाते.  मग डोळे उघडे असोत वा बंद असोत !

*परंतु साधुसंगति मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते.  ती कष्टसाध्य आहे.  आपणहून मन त्या संगतीत जात नाही व रमतही नाही.*  उलट साधुसंगति अज्ञानी, अविवेकी, मूढ मनुष्याला त्रासदायक वाटते, नको वाटते.  त्यांना विषयांची सवय झाल्याने, त्यांची इतकी जबरदस्त चटक मनाला लागते, की सत्संगाचा त्यांना तिटकारा वाटतो.  त्यांचे मन विषयातच रुळते व रमते.

म्हणून विषयातून बाहेर येण्याची कल्पनाच त्यांना असह्य होते. या महाभयंकर कल्पनेतून बाहेर यायलाच ते घाबरतात. जीवनात या विषयांमुळे सतत दुःख व यातनांचे मरणप्राय फटके बसूनही सत्संगाची किंमत त्यांना कळत नाही.  म्हणून साधुसंत कळवळून विनंती करतात –

*कर जोडोनि विनवितो तुम्हा | नका करु संसारश्रमा |*
*नका गुंतु विषयकामा | तुम्ही आठवा मधुसूदना |*

विषयांच्या कर्दमात लोळू नका.  पण व्यर्थ !  हे कोणालाही पटत नाही.  त्यामुळे अनेक शतके जन्म गेल्यावरच सत्संगाची किंमत, त्याचा महिमा कळतो.  म्हणून  *सङ्गः सत्सु विधीयताम् |* हे विधिवाक्य आहे.  शरीराने नव्हे, तर पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक मनानेच मनाला निवृत्त केले पाहिजे व मन सत्संगात नेले पाहिजे.
〰〰〰〰〰〰〰⚜
*सं -* श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

आचमनविधी

*आचमनविधी*
______________


डोके व कंठ वस्त्राने आच्छादित नाही असा, खाली बसलेला, डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत धारण केलेला, पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होत्साता, अंगुष्ठ व कनिष्ठिका मुक्त आहेत अशा हस्ताने अनुष्ण, फेस इत्यादिकांनी रहित असे उदक ह्रदयापर्यंत जाईल असे तीन वेळा प्राशन करावे.

*'केशवायनमः*
*नारायणाय नमः*
*माधवाय नमः'*
या तीन मंत्रांनी हे आचमन करावे.

*गोविंदाय नमः'*
या मंत्राने दक्षिण कराचे प्रक्षालन करावे.

*'विष्णवे नमः*
*मधुसूदनाय नमः'*
या मंत्रांनी दोन ओष्ठांचे प्रक्षालन करावे.

*त्रिविक्रमाय नमः'*
या मंत्राने त्यांना मार्जन करावे.

*'वामनाय नमः'*
या मंत्राने उदक अभिमंत्रण करून

*'श्रीधराय नमः'*
या मंत्राने वामहस्ताचे प्रक्षालन करावे.

*'ह्रषीकेशाय नमः'*
या मंत्राने दक्षिण पायाचे प्रक्षालन करावे.

*'पद्मनाभाय नमः'*
या मंत्राने वाम पायाचे प्रक्षालन करावे.

*'दामोदराय नमः'*
या मंत्राने मस्तकावर प्रोक्षण करावे.

*'संकर्षणाय नमः'*
या मंत्राने ऊर्ध्वोष्ठावर प्रोक्षण करावे.

*'वासुदेवाय नमः'*
या मंत्राने उजव्या नाकपुडीस स्पर्श करावा.

*'प्रद्युम्नाय नमः'*
या मंत्राने डाव्या नाकपुडीस स्पर्श करावा.

*'अनिरुद्धाय नमः'*
या मंत्राने उजव्या नेत्रास स्पर्श करावा.

*'पुरुषोत्तमाय नमः'*
या मंत्राने डाव्या नेत्रास स्पर्श करावा.

*'अधोक्षजाय नमः'"*
या मंत्राने उजव्या कानास स्पर्श करावा.

*नारसिंहाय नमः'*
या मंत्राने डाव्या कानास स्पर्श करावा.

*'अच्युताय नमः'*
या मंत्राने नाभीला स्पर्श करावा.

*जनार्दनाय नमः'*
या मंत्राने ह्रदयास स्पर्श करावा.

*'उपेंद्राय नमः'*
या मंत्राने मस्तकास स्पर्श करावा.

*'हरये नमः'*
या मंत्राने दक्षिण बाहूस स्पर्श करावा.

*'श्रीकृष्णाय नमः'*
या मंत्राने वाम बाहूस स्पर्श करावा.

 कोणी ग्रंथकार, "केशवादि" पहिल्या तीन नामांनी आचमन करून 'गोविंद विष्णु' यांनी दोन हातांचे प्रक्षालन करावे. 'मधुसूदन, त्रिविक्रम' यांनी दोन कपोलांस मार्जन करावे. 'पद्मनाभ' नामाने पायाला मार्जन करावे; अथवा दोन दोन नामांनी ओष्ठास मार्जन व प्रक्षालन करावे. हस्त व पाय यांना एकेक नामाने मार्जन करावे. बाकी पूर्वीप्रमाणे करावे, असे म्हणतात. यामध्ये अंगुलीच्या अग्रांनी ऊर्ध्वोष्ठास स्पर्श करावा. अंगुष्ठ व तर्जनी यांनी दोन नाकपुड्यास स्पर्श करावा. अंगुष्ठ व अनामिका यांनी दोन नेत्रांस स्पर्श करावा. अंगुष्ठ व कनिष्ठिका यांनी दोन्ही कर्णास व नाभीस स्पर्श करावा. तळहाताने ह्रदयाला स्पर्श करावा. हस्ताने मस्तकाला स्पर्श करावा. अंगुलीच्या अग्रांनी भुजांना स्पर्श करावा. याप्रमाणे आचमनविधि करण्यास अशक्त असेल तर तीन वेळा आचमन करून हस्त प्रक्षालन करून उजव्या कानाला स्पर्श करावा. कास्य, लोखंड, शिसे, कथील आणि पितळ यांच्या पात्रांनी आचमन करू नये. श्रौताचमन करणे ते गायत्री मंत्राचे तीन चरण, आपोहिष्ठा० मंत्राचे नऊ चरण, सात व्याह्रति मंत्र, गायत्रीचे तीन चरण आणि गायत्री शिरोमंत्राचे दोन भाग याप्रमाणे चोवीस स्थानांचे ठिकाणी करावे.
@ धर्मसिंधु.....
________________________®
श्रीधर कुलकर्णी :- ९६६५६३२९५३
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

Wednesday, 24 January 2018

भोजन पात्रे

*⚪  भोजन पात्रे* ⚪
================
*सुवर्णाचे पात्र*
सोनं हा अतिशय श्रेष्ठ धातू आहे. तो लवकर झिजत नाही. हवा,पाणी,प्रदुषण या कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. सुवर्ण हे शरीराची झीज भरून काढतं. तसचं त्याच्या नियमित वापराणे शरीराची झीज होण्याची प्रक्रियाही मंदावते. सोन्याच्या ताटात घेतलेलं जेवण हे वात, पित्त, कफ हे वाढल्यास या तिन्ही दोषांचा नाश करणारे तसेच डोळयांना अतिशय हितकर असते. सुवर्णाच्या ताटातील जेवण हे सदैव पथ्यकरच असते. गरम मसाला घालून केलेले मांसाहरी पदार्थ तसेच थंड दूध हे नेहमी स्वर्णपात्रात ठेवावे.
           ✨✨
*चांदीचे पात्र*
चांदी हा अतिशय गुणवान धातू आहे. तो अत्यंत थंड असून उत्तम पित्तनाशक आहे. डोळयांकरिता अतिशय हितकर आहे. दूध, तूप, आमरस, भाताची पेज, कडधान्यांचे सूप तसेच रस नेहमी चांदीच्या भांडयातूनच सेवन करावेत.
            ✨✨
*काशाचे पात्र*
कास्य म्हणजे ताम्र व वंग या दोहोंपासून तयार केलेला धातू होय. कांस्याच्या पात्रात जेवण घेतल्यास ते बुध्दीदायक ठरते. यातील जेवणाने तोंडालाही चव येते. हे पात्र रक्त आणि पित्ताची शुध्दी करणारे आहे. दही, दह्यावरील निवळ, ताक, कढी हे सर्व काशाच्या भांडयातून घ्यावेत. आता फक्त तळपायांची आग थांबविण्यासाठी कोकमतेल लावतांना काशाची वाटी वापरली जाते.
           ✨✨
*पितळेचे पात्र*
पितळेच भांडं हे वातकारक आणि रुक्ष असूनही गुणाने उष्ण आहे. कृमी कफ आणि शूल यांचा नाश करणारं आहे. भात, भाज्या, आमटी यांसारखे पदार्थ पितळेच्या भांडयातूनच करावेत. ही भांडी वापरतांना एक खबरदारी घ्यावी की ती कल्हई करुनच वापरावीत.
           ✨✨
*तांब्याचं पात्र*
पाणी पिण्याचे पात्र नेहमी तांब्याचेच असावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अलिकडे केलेल्या एका संशोधनात असे अढळून आले आहे की, ८ तास पाणी तांब्याच्या भांडयात राहिल्यास त्यातील E-coli सारख्या अनेक जंतूचा नाश होतो. Water purifier सुध्दा या जंतूंचे पूर्ण उच्चाटन करु शकत नाही.
           ✨✨
*लोह पात्र*
लोखंडाचं भांडं हे बल देणारे आहे, त्यात केलेल्या पदार्थांचे पूर्ण गुण शरीराला प्राप्त करून देतं. सूज, पण्डुरोग व कावीळ या रोगांचाही नाश करतं. तूप नेहमी लोखंडी भांडयातच कढवावं.
           ✨✨
*लाकडाचे पात्र*
फार पूर्वीपासून आपल्याकडे आंब्याच्या तसेच सीसमच्या लाकडापासून भांडी बनविली जात असत. लाकडाच्या पात्रात जेवण तयार केल्याने त्याची रूची वाढते व ते कफ वाढवणारेही आहे.
            ✨✨
*पत्रावळ*
झाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे तसेच विष व पाप यांचा नाश करणारे आहे. आपल्याकडे पाळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळयाच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पध्दत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पात्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिक दृष्टया यांना खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.
             ✨✨
*मातीचे पात्र*
आले, जिरे सैंधव वादून ते मातीच्या भांडयाला आतून लावून मग त्यात दही विरजावे. असे दही, ताकच काय तर त्या पासून केलेले श्रीखंडही सुवाच्य आणि पौष्टिक असते. मातीच्या मडक्यावर - खापरावर भाजून केलेली भाकरी ही सुध्दा पचायला अतिशय हलकी असते.ऍल्युमिनियम आणि हिंडालियमया धातूची भांडी आजकाल खूपच वापरात येऊ लागली आहे. यामध्ये वस्तू साठवायला हरकत नाही. द्रव पदार्थ आणि आम्ल पदार्थ मात्र यात ठेवू नयेत, उकळू नयेत किंवा शिजवूही नयेत. कारण मग असे पदार्थ कॅन्सर सारख्या रोगाचे कारण ठरू शकतात.
---------------------------------------------------------
श्रीधर कुलकर्णी

*📝 ज्ञानामृत मंच*

सुवर्णयुग

*♦.  सुवर्णयुग*♦
---------------------------

भारतीय इतिहासात वाकाटक इतके महत्त्व पावले की के.पी. जयस्वालांसारख्या नाणावलेल्या इतिहासकाराने त्यांना अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याचे श्रेय देऊ केले. ते उत्तरेकडील गुप्तसम्राटांचे समकालीन होते.
सातवाहनांच्या उतरणीच्या काळात त्यांच्या साम्राज्याचे हळूहळू विघटन झाले. कोल्हापूर-बेळगांवचे चुटु, सागरकिनाऱ्यावरचे महारथी-मांदव यासारखे मांडलिक राजे स्वतंत्र झाले. मध्य महाराष्ट्रात काही काळ अभिरांनी राज्य केले. परंतु लवकरच सामर्थ्यशाली वाकाटकांची सत्ता इ.स. २५० च्या सुमारास उदयाला आली. मध्य भारतातील छोट्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या विंध्यशक्तिने वाकाटक घराण्याची स्थापना केली. भारतीय इतिहासात वाकाटक इतके महत्त्व पावले की के.पी. जयस्वालांसारख्या नाणावलेल्या इतिहासकाराने त्यांना अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याचे श्रेय देऊ केले. ते उत्तरेकडील गुप्तसम्राटांचे समकालीन होते. जरी समुद्रगुप्ताने जवळजवळ सर्व देश जिंकला तरी वाकाटक राजा प्रवरसेन (इ.स. २७०-३३०) याच्या अधिसत्तेखाली असलेल्या प्रदेशात पाऊल घालण्याचे धैर्य त्याला झाले नाही. समुद्रगुप्ताचा वारस दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य-याने वाकाटकांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपली कन्या प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक राजा दुसर्‍या रूद्रसेनाशी करून दिला. या रूद्रसेनाची राजधानी नंदीवर्धन (नगरधन, जिल्हा नागपूर) इथे होती. दुर्दैवाने प्रभावतीला अल्पकाळातच वैधव्य आले व अल्पवयीन राजपुत्राची प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पहावा लागला. या कामी तिला तिच्या पित्याचे खूपच सहाय्य मिळाले. काही विद्वानांच्या मते त्याने राजपुत्राच्या शिक्षणासाठी प्राचीन भारतातील थोर कवी कालिदास याची नियुक्ती केली होती. वाकाटकांच्या राजधानीतील त्याच्या वास्तव्यातच प्रेमविव्हल होऊन या कवीने *‘मेघदूत’* हे सुप्रशिद्ध काव्य रचले असावे असेही म्हटले जाते.
प्रभावती गुप्त (इ.स. ४०५-४२०) तिच्या पित्याप्रमाणेच विष्णूची निस्सीम भक्त होती. तिने बहुधा बरीच मंदिरे बांधली असावीत. त्यापैकी प्रवरपूरस्वामीचे मंदिर राजधानीतील असावे. या मंदिराचे अवशेष पवनार येथे विनोबाजींचा आश्रम बांधत असताना सापडले. खणत असताना सापडलेल्या मूर्ती तेथील आश्रमात सिमेंटमध्ये बसविण्यात आलेल्या आहेत. यातील लक्षणीय असे एक शिल्प प्राध्यापक मिराशींच्या मते राम-भरतभेटीच्या प्रसंगाचे चित्रण करणारे आहे. परंतु संभाव्यातः ते शिव अंधकासुराचा वध करत असतानाच्या प्रसंगाचे चित्रण असण्याची आहे. “गंगा-भगवती” असा कोरीव लेख असलेले गंगेचे शिल्प अत्यंत वाखाणण्यजोगे आहे. प्रभावती गुप्त हिने नृसिंहाचीही काही देवळे बांधली. त्यापैंकी एका मंदिराचे अवशेष रामगिरीच्या (रामटेक) टेकडीवर मिळाले आहेत. हिंदू मंदिराच्या बांधणीच्या सुरूवातीच्या काळातील ही मंदिरे होत. य दृष्टीने मंदिरस्थापत्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासात या मंदिरांचे स्थान अजोड आहे. ही मंदिरे महाराष्ट्रामध्ये इ,सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वैष्णव संप्रदायाची निदर्शक होत. असे असले तरी शैव संप्रदायासही तितकेच महत्त्वाचे स्थान होते हे मुंबईतील जोगेश्वरी, घारापुरी, मंडपेश्वर ही लेणी व वेरूळ येथील रामेश्वर गुंफा (क्र. २१) यावरून सिद्ध होते.
प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन शाखा झाल्या. एक प्रवरपूर (पवनार) येथे व दुसरी वत्सगुल्म (वाशिम, ता, अकोला) येथे. कालांतराने हरिषेणाच्या (इ.स. ४७५-५१०) अधिपत्याखाली दोन्ही घराणी पुन्हा एकत्र आली. हरिषेण हा वाकाटकांचा शेवटचाच ज्ञात असलेला राजा होय. तो कला व वाङ्‍मय यांचा आश्रयदाता होता. अजिंठ्याच्या उत्तर कालखंडातील सर्व गुंफा खोदण्याचे व उत्तमोत्त्म चित्रांनी सजविण्याचे काम त्याच्या कारकीर्दीतच पार पडले. त्याच्यानंतर आलेल्या राजाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. असे असले तरी प्राध्यापक मिराशींनी दशकुमार चरितम्‌ या ग्रंथातील ऐतिहासिक माहितीच्या आधारे त्यांचा वृतांत थोडक्यात जुळवून दिलेला आहे. परंतु इ.स. च्या सहाव्या शतकाच्या सुरूवातीचा काळ हा अंदाधुंदीचा वा धामधुमीचा होता. मांडलिक राजे स्वतंत्र होऊ पहात होते. याच सुमारास त्रैकूटक घराण्याच्या राजांनी पश्चिम महाराष्ट्र आपल्या काबूत आणला व शिवावतार लकुलिशाचा संप्रदाय सुरू केला.

वाकाटक कारकीर्दीत आर्थिक सुबत्ता व राजकीय शांतता असल्यामुळे महाराष्ट्रात सुवर्णयुगाचे आगमन झाले. वात्स्यायनाचा “नागरक” बनण्याची लोकांमध्ये अहमहामिका सुरू झाली. अजिंठाच्या वैविध्यपूर्ण भित्तीचित्रांतून प्रतीत केले गेले ते हेच समृद्ध जीवन. लोकांचे दैनंदिन जीवन लक्षणीय रीत्या सुधारले होते. त्यांच्या निवासासाठी पक्के बांधकाम केलेल्या उत्तुंग इमारती होत्या. विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे ते परिधान करीत. शिवून तयार केलेले पोषाख हळूहळू अधिक लोकप्रिय होऊ लागलेले होते. सुंदरसुंदर अलंकार लोक वापरीत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शब्दातच सांगायचे झाले तर, “अजिंठा आपल्याला एका दूर, स्वप्निल परंतु तरीही सत्य अशा जगतात घेऊन जाते.” थोडक्यात ते कालिदासाचे विश्व होते. सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर भारतात महत्वाच्या घडामोडी होत होत्या. हूणांच्या आक्रमाणामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले. याच काळात दक्षिणेकडे बदामीच्या चालुक्यांचा (जिल्हा विजापूर, कर्नाटक) उदय झाला. आणि दुसरा पुलकेशी या बलशाली सम्राटाने (इ.स. ६१० ते ६४२) तीन महाराष्ट्र (म्हणजे आजचा संपूर्ण महारष्ट्र) जिंकून घेतले.
➖➖➖➖➖📕➖➖➖➖➖
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

चित्ताच्या अवस्था

*……चित्ताच्या अवस्था……*
…………………………………………………………
*१) मूढ :- *तमोगुणाचा जास्त प्रभाव,सारासार विचार नाही. भांडाभांड मारामा-या, लोकांना फसवणे, लुबाडणे, असे चित्तात विचार येतात. आळस, निद्रा, स्तुती. 

*२) क्षिप्त :-* रजोगुणाचा प्रभाव, इकडे तिकडे, धावणारे मन, बहिर्मुख चित्त, संसारात गुरफटणे. 

*३) विक्षिप्त :- *रजोगुण प्रभाव, अंतर्मुख जास्त, क्वचित बहिर्मुख, सत्वगुण वाढीस लागतो. 

*४) एकाग्र :-* सत्वगुणाचा प्रभाव. परमार्थातील एखाद्या विषयावर स्थिर राहणारे, चित्त शुद्ध होते, अंतर्मुख होते. ध्यानात मन एकाग्र होते. ह्या एकाग्र रूप अवस्थेला संप्रज्ञात समाधी म्हणतात.

*५) निरुद्ध :-* चित्त अखंड आत, त्रीगुणाच्या पलीकडे मनच नाही अशी अवस्था, सर्व वृत्तींचा निरोध होतो. आनंदरूप अवस्था दृष्ट्याचे स्वरूपात अवस्थान. बुद्धीतील संशय, विपर्यास, अज्ञान, राग, लोभ, मोह, अस्मिता इत्यादी दोष पूर्णपणे, नष्ट होतात. चित्तावर घडलेले वाईट संस्कार नष्ट होतात. एकाग्रतेचे अवलंबन सूक्ष्म होते. संसारात बिजभूत असलेल्या भावना दग्ध प्रत्य होतात. म्हणून या अवस्थेला *'निर्बीज समाधी'* असंप्रज्ञात समाधी म्हणतात. 

मन पंचज्ञानेंद्रियातून सतत आपल्या भोवती असणा-या प्रत्येक वस्तूशी सारुप्य साधण्याचा प्रयत्न करते. याला *मनाची वृत्ती* म्हणतात.
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

मार्कंडेय प्रार्थना

*🙏🏻    मार्कंडेय प्रार्थना*  🙏🏻
…………………………………………………………
अकस्मात येणारी अरिष्ट, संकट, अपमृत्यु इ. गोष्टी उद्भऊ नयेत म्हणून या शांती कराव्या. साठीशांती नंतर सप्तचिरंजीव आणि मार्कंडेय यांची विषेश प्रार्थना करायला सांगितली आहे. ती प्रार्थना अशी आहे.
…………………………………………………………
*१) मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पांतजीवन ।*
*आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि मे मुनिपुंगव ॥*
*२) द्रौणे मे त्वं महाभाग रुद्रतेजः समुद्भव । आयुर्बलंयशो देहि अश्र्वत्थामन् नमोस्तुते ॥*
*३) दैत्येंद्रकुलसंभूत यज्ञदान क्रियारत । बले त्वां शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छमे ॥*
*४) वसिष्ठकुल संभूत वेदशास्त्र विशारद । नारायणांश संभूत वेदव्यास नमोस्तुते ।*
*५) अंजनीगर्भ संभूत कपीन्द्र सचिवोत्तम । रामप्रिय*
*नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा ॥*
*६) बिभीषण नमस्तुभ्यं रामपादाब्जपूजक ।*
*आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि पौलस्त्यनंदन ॥*
*७) व्दिजेंद्र भरताचार्य सर्वविद्याविशारद ।* *शरणं त्वां प्रपन्नोस्मि कृप मां रक्ष सर्वदा ॥*

*८) रेणुकेय महाभाग कार्तवीयकृतान्तक ।* *आयुः प्रयच्छ मे राम जामदग्न्य नमोस्तुते ॥*
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच*

*मौन् सर्वर्था साधन्*

*मौन् सर्वर्था साधन्*
…………………………………
मौन म्हणजे चूप राहणे, निःशब्द असणे किंवा न बोलणे आहे. साधारणतः, याचा अर्थ अश्या प्रकारे घेतला जातो.परंतू, निःशब्दता व भारतीय लोकांत प्रचलित असलेले 'मौन' यात बराच फरक आहे.मुळात, ही एक मनुष्यजीवनातील उच्चकोटीची मानसिक स्थिती आहे.संस्कृतमध्ये या शब्दाची व्याख्या *'मुनैर्भावः इति मौन'*(मुनींच्या मनात असलेला भाव) अश्या प्रकारे केल्या गेली आहे.
*स्वरूप आणि कारणे*
शक्यतोवर, दुःख झाल्यास, भीतीमुळे,प्रकृती अस्वास्थ्य,अ़ज्ञानापोटी, न बोलण्याचे ठरवुन, प्रतिक्रिया देण्याची स्थिती टाळण्यासाठी,वाणीभंग झाल्यास,असमंजस व्यक्तिंशी सामना झाला असल्यास, अपराधीपणा वाटल्यास, पापाशन, अति कर्तुत्ववान व्यक्तिच्या दर्शनाने, भांडण/ वादावादीचा प्रसंग आल्यास,चिंतन करण्यासाठी इत्यादी कारणांमुळे सहसा मौन धारण करण्यात येते किंवा ती व्यक्ती मौन होते.

*गुण किंवा फायदे*
एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे,मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे इत्यादी असे याचे अनेक गुण व फायदे आहेत. *(मौनं सर्वार्थ साधनम्)*
*कधी मौन रहावे*
*ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे | मौन स्वीकारावे हेचि भले |*
- ज्ञानेश्वर
वरील उद्धरणाचा चिंतन/विचार न करता बोलण्यापेक्षा मौन स्वीकारणेच उत्तम आहे.
दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसात बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात.
*आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः । बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्‌ ॥*
-- पंचतंत्र ४.४८
अर्थ-स्वतःच्या मुखातील दोषामुळे(बोलण्यामुळे), शुक(पोपट) व मैनेस बंधनात (पिंजर्‍यात) ठेवले जाते. तेथे बगळ्याला मात्र बंधनात ठेवले जात नाही.(कारण तो बोलत नाही). मौनाने सर्व काही साधते.
*स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा | विनिर्मितं छादनमज्ञताया: | विशेषतः सर्वविदां समाजे | विभूषणं मौनमपण्डितानाम्‌ ||*- भर्तृहरेः सुभाषितसंग्रह--६८ 
शेवटच्या ओळीचा अर्थ : विशेषत:, विद्वानांच्या समाजात मौन हे अपंडितांचे भूषण आहे.
*उच्चारे मिथुनेचैव प्रस्रावे दन्तधावने। स्नाने भोजनकालेच षट्सु मौनं समाचरेत्।।*
---हारीत नामक धर्मगंथ 

*मनुष्याने कधी मौन धारण करावे याबाबत असे साधारणतः सांगितले जाते की* -
उच्चार करण्यापूर्वी(बोलण्यापूर्वी), मैथुन करतांना,शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), दात घासतांना, अंघोळ करतांना, जेवतांना अशा सहा वेळी मौन धारण करावे
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

भरणी श्राद्ध

भरणी श्राद्ध : निधन के पहले वर्ष निषेध

भरणी श्राद्ध पितृपक्ष के भरणी नक्षत्र के दिन एकोद्दिष्ट पितृ को उद्देश्य कर किया जाता है परन्तु व्यक्ति के निधन के पहले वर्ष भरणी श्राद्ध नहीं होता। इसका कारण यह है कि प्रथम वार्षिक अब्दपूर्ति एवं वर्षश्राद्ध होने तक मृत व्यक्ति को प्रतत्व रहता है।

पहले वर्ष महालय के अन्तर्गत किसी भी श्राद्ध का अधिकार नहीं होता। ऎसा होने पर भी आग्रहपूर्वक पहले वर्ष भरणी श्राद्ध सम्पन्न किया जाता है। इसके लिए कोई ठोस शास्त्राधार नहीं है। प्रथम वर्ष के बाद भरणी श्राद्ध अवश्य करना चाहिए। वास्तव में भरणी श्राद्ध प्रतिवर्ष करने का शास्त्र संकेत है। किन्तु एक ही बार करने वाले व्यक्ति कम से कम प्रथम वर्ष भरणी श्राद्ध न करें। अनेक लोग अपने जीवन में कोई भी तीर्थ यात्रा नहीं कर पाते। ऎसे लोगों की मृत्यु होने पर उन्हें मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ एवं बद्रिकेदार आदि तीर्थो पर किए गए श्राद्ध का फल मिले, इसके लिए भरणी श्राद्ध किया जाता है। जिन लोगों को अपने पितरों का श्राद्ध गयादि तीर्थो पर करने की तीव्र इच्छा हो किन्तु आर्थिक स्थिति या समयाभाव के कारण वे असमर्थ हों तो ऎसे समय मृत व्यक्ति को उद्देश्य कर भरणी श्राद्ध करना चाहिए। प्रत्येक वर्ष भरणी श्राद्ध करना हमेशा श्रेयस्कर रहता है।

इसे प्रथम महालय में न करते हुए दूसरे वर्ष से अवश्य करें। नित्य तर्पण में मृत व्यक्ति को पितृत्व का अधिकार प्राप्त होने पर ही उसके नाम का उच्चारण करें। इसे पहले साल न करें। फिर भी कुछ पुरोहितों के मतानुसार सपिंडीकरण तथा षोडशमासिक श्राद्ध आदि सभी विधि की तरह भरणी श्राद्ध भी करवा लें तो कोई दोष नहीं है। शास्त्रों के अनुसार भरणी श्राद्ध प्रथम वर्ष करवा लेने में भी कोई दोष नहीं होता।
=================================°
सं :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

नक्षत्र वाटिका

*🌿🌿|| नक्षत्र वाटिका ||*🌿🌿
------------------------------------------------
नक्षत्र उद्यान ही ऋषी मुनींच्या काळापासुन चालत आलेली संकल्पना आहे. यामध्ये 360 अंशाचे संपूर्ण वर्तुळ आहे.
360 ÷ 12 = 30 अंशाचे 12 भाग केलेले आहेत. प्रत्येक भागास राशी म्हणतात. अशा एकुण 12 राशी आहेत.
एका राशीमध्ये 9 चरण असतात म्हणजे 1 चरण = 30 ÷ 9 = 3 अंश 20 मिनीटे अशा चार चरणांचे 1 नक्षत्र होते
म्हणुन 4 × 3 अंश 20 मिनीटे = 13 अंश 20 मिनीटांचे 1 नक्षत्र होते. अशी 27 नक्षत्रे ऋषीमुनीनी सांगितली आहेत.
त्यातील काही नक्षत्रांची माहिती शोच्या पहिल्या भागात आपल्याला पहावयास मिळेल.
या 27 नक्षत्रांसाठी आयुर्वेदाने 27 आराध्य वृक्षे निश्चित केलेली आहेत.
साधारणत: त्या - त्या नक्षत्रात जे-जे वृक्ष त्या-त्या प्रमाणात वाढतात व त्यांचे ऑक्सिजन देण्याचे प्रमाण योग्य असते.
तो वृक्ष त्या-त्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तिंसाठी प्रमाणबध्द श्वासोश्चवासास मदत करत असल्याने त्यास त्या व्यक्तिचा आराध्य वृक्ष मानतात.
ज्योतिष व आयुर्वेदामध्ये असे आराध्यवृक्ष, पर्यायी वृक्ष व धार्यावर्धी वृक्ष (वृक्षाच्या मुळ व खोडाच्या दांड्या हातात किंवा गळ्यात घालतात) दिलेले आहेत.
त्यानुसार आम्हांला उपलब्ध झालेल्या 27 वृक्षांची मांडणी 27 नक्षत्रात केलेली आहे.
(अर्थात जे 1/2 महाराष्ट्रात मिळत नाही ते बाहेरून मागवलेली आहेत)
* भारतात कुठेही नाही अशी, 80 फुट व्यासाच्या वर्तुळामध्ये अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने अंशाची मिनीटांमध्ये विभागणी करून उद्यानाची बांधणी केली आहे.
* प्रत्येक राशीत नक्षत्रांची जशी विभागणी असते ती जशीच्यातशी आपणास येथे पाहावयास मिळते.
* प्रत्येक नक्षत्राच्या आराध्यवृक्षाची खगोलिय, ज्योतिषिय व आयुर्वेदीय मांडणी प्रवेशद्वारावरील चक्रात व आयुर्वेदिय माहिती त्या-त्या राशीसमोर दाखविलेली आहे.
* श्रध्दा-अंधश्रध्दाच्या फंदात न पडता आरोग्यदायी वृक्षांच्या सानिध्यात कांही क्षण व्यतित करणे शास्त्रीय दृष्टयाही नक्कीच फायदेशीर राहील.
प्रवेशद्वारावरील चक्रातील मधल्या पांढऱ्या चक्रात ऊर्जेचा मुलाधार सूर्य दर्शविलेला असुन त्यासमोर लोलक (प्रिझम) ठेवुन त्या पांढऱ्या सूर्य प्रकाश शलाकेचे तरंगलांबी नुसार (़ुर्रींशश्रशपसींह) सप्तरंगात विभाजन दाखविले आहे. ते सप्त रंग म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा (ठशव, जीरपसश, धशश्रश्रेु, ॠीशशप, इर्श्रीश, खपवळसे,
तळेश्रशीं = तखइॠधजठ)
या रंगांपैकी तांबडा : ऋतु नारंगी : मराठी महिने
पिवळा : राशी व ज्योतिषिय वर्णन
हिरवा : नक्षत्र आकृती व ज्योतिषिय वर्णन
निळा : खगोलिय माहिती
पारवा : आराध्यवृक्षाचे नाव व चित्र
जांभळा : आयुर्वेदीय माहिती सांगतो.
असे ज्योतिषिय, खगोलिय व आयुर्वेदिय संरचनात्मक चक्र तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालेल.
तसेच डाव्या बाजुस क्रांतीवृत्ताच्या दोन्ही बाजुस 27 नक्षत्रांची स्थाने (ठिकाणे) कोठे व कसे आहेत हे बघता आले पाहिजे.
नक्षत्र व त्यांचे वृक्ष खालील प्रमाणे आहेत
====================================
●|| नक्षत्र व त्यांचे वृक्ष ||●


1-अश्वनि-केला, आक, धतूरा
2-भरणी- केला ,आंवला
3-कृतिका-गूलर
4रोहिणी-जामुन
5-मृगशिरा-खैर
6-आर्द्रा-आम, बेल
7-पुनर्वसु- बांस
8-पुष्य- पीपल
9-आश्लेषा-नागकेशर,या चंदन
10मघा- बरगद
11-पू.फा.ढाक,(पलास)
12-उ.फा.-बड़, पाकड़
13-हस्त-रीठा
14-चित्रा-बेल
15-स्वाती- अर्जुन
16विशाखा-नीम/विकंक
17-अनुराधा-मौलसिरी
18-ज्येष्ठा-रीठा
19-मूल-राल वृक्ष
20-पू.षा.-मौलसिरी, जामुन
21-उ.षा.-कटहल
22-श्रवण-आक
23-धनिष्ठा-शमी/सेमर
24-शतभिषा-कदम्ब
25-पू.भा.-आम
26-उ.भा.-पीपल/सोनपाठा
27-रेवती-महुआ
===================================
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

ज्ञानेश्वरी जयंती विशेष

*🔺 ज्ञानेश्वरी जयंती विशेष 🔺*
------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा आपण सहज मागोवा घेऊन पाहावा तर थक्कच होतो. 700 वर्षांपूर्वी माउलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलंय ते आजही आपण विज्ञानातून अनुभवतोय. नवीन शोध म्हणून त्याकडे बघतो आणि सहज मान्य करतो की, ही ज्ञानेश्वरी किती विज्ञानस्पर्शी आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा समन्वय ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानमयो विज्ञानमयोसी आहे.
‘अमृताने पैजा जिंकीन’ असा सार्थ अभिमान ज्या मराठी भाषेबद्दल ज्ञानदेवांच्या मनात होता, त्या मराठी भाषेतील ‘न भूतो, न भविष्यति’ अशा अप्रतिम, अद्वितीय ग्रंथाची निर्मिती ज्ञानदेवांच्या हातून झाली. तीच ज्ञानेश्वरी. खरे तर भगवद्गीता या मूळ संस्कृत ग्रंथावर केलेले ते भाष्य आहे. पण, गीतेतील 700 श्लोकांवर भाष्य करताना ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीतून 9033 ओव्या बाहेर पडल्या. ज्ञानदेवांच्या अभिजात कवित्वाची ही साक्षच!
*वाचे बरवे कवित्त्व । कवित्त्वी बरवे रसिकत्त्व*
*रसिकत्त्वी परतत्त्व । स्पशरु जैसा*
या ओवीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हा परतत्त्व स्पर्श करणारा म्हणजेच जीवनाचे रहस्य उलगडून दाखविणारा ग्रंथ आहे, म्हणूनच हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ असला तरी त्याला प्रेमाची माधुरी आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वयरू शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर तर म्हणतात, ‘ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय कोणी मरूच नये’ वाचणार्‍या प्रत्येकाला प्रत्येक वेळी ज्ञानेश्वरीतील कितीतरी पैलू नव्यानेच खुणावतात. तत्त्वज्ञान आणि वाड्मय माधुर्यासोबतच त्यातील भक्तीमयता, आध्यात्मिकता, वैचारिकता, ज्ञान आणि किती काही.. जे शब्दात पकडता येणार नाही. पण, अनुभवता मात्र येईल. ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा आपण सहज मागोवा घेऊन पाहावा - तर थक्कच होतो. 700 वर्षांपूर्वी माउलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलंय ते आजही आपण विज्ञानातून अनुभवतोय. नवीन शोध म्हणून त्याकडे बघतो आणि सहज मान्य करतो की, ही ज्ञानेश्वरी किती विज्ञानस्पर्शी आहे.
ज्ञानदेवांनी ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या किती सहजतेने केली आहे.. जे निश्चित स्वरूपाचे असते आणि जेथे तर्क करायला वाव नसतो ते ज्ञान होय. ज्ञानाच्या साहाय्याने जे जाणले जाते ते विज्ञान होय.
*विज्ञान योग’ हा ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय.*त्यात माउलींनी सांगितलंय,
*तैसी जाणीव जेथ न रिघे ।*
*विचार मागुता पाऊली निघे ।*
*तकरु आयणी नेघे । आंगी जयाचा ।*
*अर्जुना तया नाव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान*
*तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान । हें ही जाण ।*
जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, जेथून विचार मागे फिरतो आणि त्यासंबंधी तर्कचातुर्य चालत नाही- ते ज्ञान. ज्ञान म्हणजे निसर्गाचे न बदलणारे तत्त्व. परंतु, त्याचसोबत निसर्गात घडणार्‍या घटनांबाबत संशोधन करता येते, प्रयोग करता येतात, अनुमानाने व अंदाजाने तर्क करता येतात, निष्कर्ष मिळतात. त्या क्षेत्रात बुद्धीचा प्रवेश शक्य झाल्याने जे हाती लागते ते विज्ञान होय. हे सांगतानाच ज्ञानदेवांचा दृष्टिकोन किती व्यापक आहे याची जाणीव होते.
द्वापारयुगात श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेवर ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात भाष्य केले. खरे तर युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा ‘विज्ञान’ विषयावर संवाद होणे हेच विशेष आहे. अशा प्रसंगी विज्ञानाचे काय करायचे आहे? असा प्रश्न सहज मनात येतो. त्यावर ज्ञानदेव म्हणतात,
*एथ विज्ञाने काय करावे । ऐसे घेसी जरी मनोभावे*
*तरी पै आधी जाणावे । तेचि लागे ।*
येथे विज्ञानाशी काय करायचे आहे? ही समजूत दूर करून आधी विज्ञानच समजून घेणे आवश्यक आहे आणि आज तर एकविसाव्या शतकात ‘रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग’ आहे म्हणूनच आपणा सर्वांना विज्ञानाचे आणि अर्थातच या ओवीचे महत्त्व नक्कीच पटले आहे.
ज्ञानेश्वरी वाचताना अनेक असे प्रसंग येतात की, आपण थक्क होतो. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आधुनिक विज्ञानातील Energy can neither be created nor be destroyed; only one form of energy gets converted into another form of energy. Total energy of the universe always remains constant. पण कितीतरी पूर्वीच ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय.
*उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे ।*
*हे घटिका यंत्र तैसे । परिभ्रमे गा ।*
जे निर्माण होते ते नाश पावते आणि जे नाश पावते ते पुन्हा दिसते. असे वारंवार घटिका यंत्रासारखे परिभ्रमण करीत राहाते. खर्‍या अर्थाने विश्वातील ऊर्जा नाशरहित आहे. विश्वाच्या ठिकाणी नित्यता बुद्धी आहे. ज्ञान हे नित्य आहे आणि तेच विज्ञानाच्या जन्मास कारण आहे. हेच तत्त्व आजही ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून सिद्ध होताना जाणवते. 700 वर्षांपूर्वी जिवंत समाधीस्थ झालेल्या माउलींच्या आळंदीतील समाधीशिळेवर मस्तक टेकवताना आजही ओम्काराची स्पंदने जाणवतात; हा सत्य अनुभव वारकरी बंधु-भगिनींचा. आणि शास्त्रज्ञांनी आव्हान म्हणून तेथे कंपण मापकयंत्र नेले तर खरोखरच त्या ठिकाणी जाणवणारी कंपणांची गती इतरत्रच्या भूमीपेक्षा अधिक. हा अनुभव विज्ञानाचा.
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ही घटना सतराव्या शतकातली, पण, ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात लिहिलंय..
*का चंद्राचे नि पूर्णपणे । सिंधु भरती ।*
पूर्ण चंद्राच्या उदयाने समुद्राला भरती येते, अर्थातच त्यामागे गुरुत्वाकर्षण आहे. आश्चर्य वाटते ते असे की, वयाच्या केवळ सोळाव्या वर्षीही ज्ञानेश्वरी लिहिण्याएवढे सारे ज्ञान कसे झाले असेल ज्ञानदेवांना?
भौतिकशास्त्रानुसार अखिल विश्व ज्या चार बलांच्या आधारे अस्तित्वात आहे, त्याविषयी ज्ञानेश्वरीत विस्तृत वर्णने आहेत. 1. गुरुत्त्वीय बल 2. विद्युत चुंबकीय बल 3. क्षीण / मंद बल 4.तीव्र बल केवळ एवढेच नाही तर सुयोग्य उदाहरणांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे.
आयुर्वेद, शरीरविज्ञान शास्त्रच नव्हे तर नेत्रचिकित्सेसारखी विज्ञानशाखाही ज्ञानेश्वरीतून डोकावते. ज्ञानदेव म्हणतात..
*हे असो डोळ्यांचे । डोळांचि पडदे रचे ।*
*तेणे देखणेपण डोळ्यांचे । न गिळिजे कायि ।*
डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यांवर येतो व तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करतो. आधुनिक नेत्र चिकित्सेनुसार यालाच आपण ‘मोतीबिंदू’ म्हणतो.
ज्ञानदेवांचे केवढे हे ज्ञान. आणि त्यातून परावर्तीत होणारे विज्ञान. उत्तराचा वेध घ्यावा ज्ञानदेवांच्याच अभंगातून; तर कळते
*स्थिरावले मन, ज्ञानाचिये वृत्ती।*
*विज्ञान संपत्ती, साधली या।*
ज्ञान मिळविण्याच्या वृत्तीने जर मन स्थिर म्हणजेच एकाग्र केले तर विज्ञानाची संपत्ती साधता येते, हे तर मानसशास्त्र. मानसशास्त्र ही आधुनिक विज्ञानाची शाखा-मनाचे शास्त्र. तेदेखील ज्ञानेश्वरीतून स्पर्शिले आहे. एका ओवीत ज्ञानदेव म्हणतात, स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हलताना जसे बाहेरून सुंदर दिसतात तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती कृतीतून प्रकट होताना दिसतात, म्हणूनच आपल्या मनोवृत्ती चांगल्या असणे गरजेचे आहे; मग कृती आपसूकच चांगल्या घडतात.
==================================
श्रीधर कुलकर्णी :९६६५६३२९५३

*📝 ज्ञानामृत मंच*

पंचमहायज्ञ

*पंचमहायज्ञ :*

गृहस्थ व्यक्तीच्या नित्यकर्मात अंतर्भूत असलेल्या देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ व ब्रह्मयज्ञ या पाच यज्ञांना ही संज्ञा आहे. याच पाच यज्ञांचा संबंध ऋणकल्पनेशी जोडला जातो. प्राचीन वैदिक वाङ्मयात देवयज्ञ व पितृयज्ञ यांचा संबंध देवऋण व पितृऋण यांच्याशी दाखविला आहे. तैत्तिरीय संहितेत (६.३.१०) देवऋण, पितृऋण व ऋषिऋण या ⇨ऋणत्रयाचा उल्लेख फेला आहे. म्हणजे त्या काळी या यज्ञांत ब्रह्मयज्ञ या तिसऱ्या  यज्ञाचा समावेश झालेला दिसतो. ऋषींनी रचलेल्या वाङ्‌मयाचे अध्ययन करणे, हाच ब्रह्मयज्ञ होय.शतपथ ब्राह्मणमध्ये मनुष्याला अथवा इतर प्राण्यांना अन्न देणे, या स्वरूपात भूतयज्ञाचा उल्लेख केला आहे. याचे दोन भाग कल्पून या ब्राह्मणग्रंथाने पाच यज्ञांचा निर्देश केला आहे. पाच यज्ञांचा स्पष्ट उल्लेख व त्यांचे स्वरूप तैत्तिरीय आरण्यकात (२.१०) आलेले आढळते. अग्‍नीमध्ये आहुती देणे वा वैश्वदेव करणे हा देवयज्ञ, पितरांना स्वधा म्हणून पाणी देणे किंवा तर्पण करणे हा पितृयज्ञ, प्राण्यांना अन्न देणे वा बलिप्रदान करणे हा भूतयज्ञ, माणसांना सत्कारपूर्वक अन्न देणे वा अतिथिपूजन करणे हा मनुष्ययज्ञ आणि स्वाध्याय किंवा शिष्याला अध्यापन करणे हा ब्रह्मयज्ञ होय. हे पाच यज्ञ प्रत्येकाने रोज केले पाहिजेत, असे तैत्तिरीय आरण्यकात म्हटले आहे.
या पंचमहायज्ञांचे तपशीलवार विवेचन गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे आणि स्मृतिग्रंथ यांत केलेले आहे. यांतील भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ यांतून व्यक्तीच्या सामाजिक कर्तव्याचाही निर्देश होतो. या पाच यज्ञांना अहुत, हुत, प्रहुत, ब्राह्‌म्यहुत वा प्राशित असेही म्हणतात (मनुस्मृति ३.७३). जप हे अहुत, होम हे हुत, भूतबली हे प्रहुत, द्विजाची पूजा हे ब्राह्‌म्यहुत व पितृतर्पण हे प्राशित होय. नित्य व्यवहारात चूल, पाटा, केरसुणी, उखळ व पाण्याचे भांडे या पाच ठिकाणी जीवहत्या होण्याचा संभव असतो. या पापाच्या परिहारार्थ पंचमहायज्ञ करावेत, असे मनू सांगतो (मनुस्मृति३.६८-६९).

श्रीधर कुलकर्णी : ९६६५६३२९५३

📝 *ज्ञानामृत मंच*

*चौसष्ट योगिनी मंदीर*

*चौसष्ट योगिनी मंदीर*
______________________
*योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता*त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेने ६४ रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वाच्या शक्तिनिशी दैत्यांशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्यांचा पराभव केला. भारतामध्ये अनेक ठिकाणी चौसष्ट योगिनी मंदिरे आहेत. त्यांपैकी ही काही मंदिरे :
*चौसष्ट योगिनी मंदिर, जबलपूर :* जबलपूर येथील प्रसिद्ध भेडाघाटजवळ हे मंदिर आहे. येथेच नर्मदा नदी संगमरवराचे डोंगर फोडून मधून वाहते. या मंदिराचे बांधकाम इसवी सन १०००च्या आसपास कलचुरी वंशातील राजांनी केले होते. मंदिराच्या सभामंडपात राणी दुर्गावतीच्या भेटीसंबंधी एक शिलालेख आहे. या मंदिराच्या आवारातून राणी दुर्गावतीच्या महालाकडे जाणारे एक भुयार आहे, असे सांगण्यात येते.
मंदिरात शंकराची पिंडी आहे व आजूबाजूला ६४ योगिनींचा घेराव आहे. एकूणएक मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आहेत.
*चौसष्ट योगिनी मंदिर, खजुराहो :* इ.स. ८७५ ते ९०० या काळात बांधलेले हे मंदिर अनेक बाबतीत अनोखे आहे. हे मंदिर खजुराहो येथील मंदिरांच्या पश्चिम गटात येते. या मंदिराला किंवा त्यांच्या भिंतींवर कोणतीही खास सजावट नाही. या मंदिरात ६४ योगिनींसाठी कोनाडे असून शिवाय एक मोठे महिसासुरमर्दिनीचे देऊळआहे आणि बाकी दोन कोनाड्यांत मत्रिका ब्राह्मणी आणि महेश्वरीच्या मूर्ती आहेत. ६४ योगिनींपैकी काही मूर्तींचे पाय तोडले आहेत, बाकी बहुतेक मूर्ती जवळपास अखंड आहेत.
*चौसष्ट योगिनी मंदिर, मोरेना :* महाराजा देवपालाने ८व्या शतकात बांधलेले हे मंदिर म्हणजे १७० फूट त्रिज्येची एक वर्तुळाकृती इमारत आहे. भारताच्या पार्लमेन्टची इमारत या मंदिराचीच प्रतिकृती आहे. मंदिराच्या भिंतीसलग ६४ खाने आहेत, त्यांत ६४ योगिनींच्या मूर्ती होत्या. वर्तुळाच्या मध्याला शंकराची पिंड आहे. मंदिराचे बांधकाम गुर्जर प्रतिहार शैलीमध्ये आहे.
*चौसष्ट योगिनी मंदिर, हिरापूर (ओरिसा) :* हे भुवनेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. ९व्या शतकात हे मंदिर ब्रह्म राजवटीतील हिरादेवीने बांधले. ६४ कोनाड्यात स्थापिलेल्या ६४ योगिनींच्या मूर्ती ग्रेनाईट दगडातून घडवल्या आहेत. मंदिराच्या मध्यभागी मनुष्याच्च्या डोक्यावर पाय देऊन उभी असलेली कालिकादेवीची मूर्ती आहे. बुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात.ओरिसा पर्यटनात हे ठिकाण अगदी न चुकता पाहावे असेच आहे.
*चौसठ योगिनी मंदिर, काशी.:* हे मंदिर गंगा नदीच्या चौसष्ठी घाटावरील एका उंच जागेवर आहे. मंदिरात जाण्यासाठी पायर्‍या चढून जावे लागते. ६४ पैकी सध्या फत ६०च मूर्ती शिल्लक आहेत. चौसष्टी घाट हा दशाश्वमेध घाटाच्या दक्षिणेला दिक्‌पतिया घाटाच्या जवळ आहे.
*चौसष्ट योगिनी मंदिर, राणीपूर झरिअल (ओरिसा) :* या मंदिरात योगिनींच्या फक्त ६२ मूर्ती शिल्लक आहेत.

तसेच उज्जैन ,व इतर विविध ठिकाणी याेगिनींचे मंदिर आढळते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖♦
*श्रीधर कुलकर्णी*
9665632953

*जगद्गुरू चा खरा अर्थ*?

*जगद्गुरू चा खरा अर्थ*?
------------------------------------
एकदा एका माणसाने श्रीमद्शंकराचार्यांना प्रश्न विचारला, “तुम्ही कसे काय साऱ्या जगाचे गुरु? ‘जगद्गुरू’ हे पद काय म्हणून लावता?”  यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले,  “कोण म्हणतो मी जगाचा गुरु आहे?  मी सर्व जगाचा गुरु नाही. *जगद्गुरू म्हणजे ‘जगत् एव गुरुः यस्य सः |’  संपूर्ण जग ज्याचे गुरु आहे असा जगद्गुरू !  सर्व विश्व माझे गुरु आहे.”*श्री.. कु...
सर्व काही या विश्वातून शिकावे.  नदी व सागराच्या एकरूपतेतून अद्वैत शिकावे.  हंस या पक्ष्याकडून सारासार विवेक घ्यावा, कारण दूध व पाणी एकत्र मिसळल्यावर हा पक्षी दूध व पाणी वेगळे करून त्यातील फक्त सारभूत दूध घेतो व निःसत्व पाणी टाकून देतो.श्री... कु....
आपल्याभोवती चांगले वा वाईट सर्वच आहेत.  विषय, प्रसंग व माणसे यांचे सद्गुण हेरून ते अंगी आणणे हे महत्वाचे आहे.  सतत जागरूक राहून नीरक्षीरविवेक माणसाने ठेवावा.  तसेच दुसऱ्यांच्या दुर्गुणांपासून आपण योग्य तो बोध घेऊन, ते आपल्याला चिकटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  त्याचप्रमाणे सदैव गुणग्राहकवृत्ति ठेवावी. आपल्यापेक्षा सद्गुणांचा पूर्णपणे अभाव असलेल्या किंवा आपल्यापेक्षा जास्त वरचढ असलेल्या गुणी व्यक्तीचा निष्कारण मत्सर करण्याचे कटाक्षाने टाळावे.
श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले ते एवढ्यासाठीच.  पर्वत, वृक्ष, नाग, वेश्या ई. त्यांना गुरुस्थानी होते.  त्यांच्यासारख्या महात्म्याचे विचार व अज्ञ माणसाचे विचार यात मूलतःच जमीन अस्मानाचा फरक असतो.  अशी उथळ स्वरूपाची विचारसरणी साधकाने ठेवू नये.

साधुसारखे विशाल मन करण्यासाठी, नव्हे, घडविण्यासाठी ही फार मोठी खडतर तपश्चर्या व त्याग आहे हे क्षणोक्षणी मनात रुजवावे.  पुस्तके वाचून किंवा अभ्यास करून हे सद्गुण आत्मसात होत नाहीत.
_"साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंदसरस्वती लिखित पुस्ताकामधून_
========================®
*श्रीधर कुलकर्णी :* ९६६५६३२९५३
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

मिथ्या मृत्युशोक

*------ मिथ्या मृत्युशोक------*
___________🌱___________
*अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |*
*गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः || ११ ||*

(भगवद्गीता २-११)
पारमार्थिक दृष्टीने जर पहिले तर प्रत्येक जीव नित्य, शाश्वत, चिरंतन, जन्ममृत्युरहित परब्रह्मस्वरूप आहेत.  ते कधी आलेले नाहीत व कधी जाणारही नाहीत.  मग ज्यांना जन्ममृत्यु नाही त्यांच्याबद्दल तू कसा शोक करणार ?  कारण त्या तत्त्वाला तू कधीही मारू शकत नाहीस.
ज्याप्रमाणे सोन्यामधून अनेक प्रकारचे अलंकार निर्माण झाले असले तरी सोनाराची दृष्टि सोन्याची असते.  त्या तत्त्वाच्या दृष्टीमध्ये सर्व भेद नाहीसे होतात.  सोनार सर्व अलंकार एकत्वाच्या दृष्टीने पाहतो.  त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्टीमध्ये जिवांमधील भेद नसून एकच अखंड तत्त्व आहे.  अशा प्रकारे कोणत्याही दृष्टीने त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही.
तसेच मृत्यू आपल्या शोकाचे कारण होत नाही.  मृत्यु जर कारण होत असेल तर कोणत्याही अज्ञात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेखील शोकाचे कारण झाला पाहिजे.  पण तसे दिसत नाही.  तेथे आपण मृत्यु ही एक सत्य घटना म्हणून पाहतो.  त्याठिकाणी स्वतःच्या भावना येत नाहीत.  तर उलट जो जो जन्माला आला तो मृत्यु पावणारच अशी भावना असते.

परंतु तोच मृत्यु ज्यावेळी अत्यंत प्रिय व्यक्तीचा नाश करतो तेव्हा मृत्यूची घटना तीच आहे.  तर मग विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूने आपण शोकाकुल का होतो ?  त्याला मृत्यु हे कारण नाही तर त्या व्यक्तीमध्ये असलेला ममत्वभाव हे कारण आहे.  ती प्रिय व्यक्ति नाश पावू नये असे वाटत असते तरी सुद्धा त्या कल्पनेला धक्का बसतो आणि दुःख होते.  थोडक्यात अनेक शरीरामध्ये निरनिराळी नाती निर्माण करून ममत्व-भाव निर्माण करतो.  ममत्वाच्या मागे अहंकार असतो.  हा अहंकार – ममकार अज्ञानकल्पित असून शोकाला कारण होतो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्दसरस्वती लिखित पुस्तकामधून
===========≠===========®
*श्रीधर कुलकर्णी*: ९६६५६३२९५३
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

*मंत्रशास्त्रात शिष्याची पात्रता*

*मंत्रशास्त्रात शिष्याची पात्रता*
--------------------------------------------

मंत्रशास्त्राच्या दृष्टीनें मागील भागांत गुरु कसे असावे याचा विचार झाला . आतां शिष्याचे ठायीं कोणते आचार व गुण असावे हें थोडक्यांत पुढें दिलें आहे .

पुरुषांनां ३० वर्षीचे पूर्वी मंत्रसिद्धि लवकर होते , स्त्रियांनां विवाहापूर्वी मंत्रसिद्धि प्राप्त होते . पुरुषांनां ३० ते ५० वर्षीपर्यंत उशिरां होते व ५० ते ६० पर्यंत कष्टसाध्य असते .

ब्राह्यणांनां मंत्रसिद्धि होण्यास ते सदाचारसंपन्न असावे . संध्या प्रतिदिनीं द्विकाल करून १०८ गायत्री मंत्राचा जप करावा लागतो . शिखा यज्ञोपवीत धारण करणारे व मातृपितृभक्त व एकपत्नीव्रती असावे . ब्रह्यचारी असल्यास उत्तमच .

क्षत्रिय व वैश्य संस्कारसंपन्न असावे . मद्य . मांसविर्जित , स्नान , विष्णुसहस्त्रनाम , रामरक्षा पाठ करीत असलेले , गीता , ज्ञानेश्र्वरी , दासबोध , एकनाथी भागवत यांपैकीं एकाचा तरी पाठ करीत असलेले असावे .

स्तुति , निंदा , वर्ज्य असावी , कायिक , वाचिक व मानसिक शुद्धिसंपन्नता असावी . सत्यवाणी , परदारविवर्जित , परदुःखेन दुःखित , परोपकारनिरत , न्यायानें धनोपार्जन करणारे , कुलदेवता , इष्ट देवता उपासक असावे , गुरूचे ठायीं आदरबुद्धि ठेवणारे , गुरुचनावर पूर्व श्रद्धा ठेवणारे व गुरुवचनांवर पूर्ण विश्वास ठेवणारे असावे .

कोणी न विचारतां बोलणारा व अवास्तव बोलणारा , आपल्याशींच बोलणारा , असा नसावा ; मित भाषण करणारा , बोलतांना लहानमोठयांशीं नम्र भाषण बोलणारा , सदा आनंदी , गुरुसेवेला तत्पर असणारा , इष्टदेवतेतर देवतांची निंदा न करणारा , इंद्रियनिग्रह असणारा , सत्य , न्याय , दया , इत्यादि रक्षण करणारा असा असावा . मंत्रसिद्ध होईपर्यंत गुरुसानिध्य असावें . तो शारीरिक व्यंगरहित , निरोगी असावा .

व्यवहारांत शिष्यानें गुरूला योग्य सल्ला द्यावा . गुरु घोडी शिष्य जोडी असा व्यवहार शिष्यानें गुरूशीं करूं नये .
=======================📕
*श्रीधर कुलकर्णी*
         *ज्ञानामृत मंच ग्रुप*

देवीभक्तीचे महात्म्य -

देवीभक्तीचे महात्म्य -

सावित्री म्हणाली, "मला देवीभक्ती दे. तेच मुक्तीचे कारण आहे. ती देवी अशुभांचा नाश करते, कर्माचे छेदन करते, पापाचे हरण करते. हे धर्मराजा, मुक्तीचे प्रकार किती ? भक्तीचे स्वरूप काय ? तिचे प्रकार कोणते ? हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले तत्त्वज्ञान मला सांग. दान, यज्ञ, स्नान, व्रत, तप ही पुण्याच्या सोळाव्या कलेस पात्र आहेत. पित्यापेक्षा मातेची महती शंभरपट अधिक आहे. त्याहीपेक्षा गुरू शंभरपट जास्त आहे." 

धर्मराज म्हणाला, "हे देवी, तुला मी इष्ट असा वर दिलेला आहे. माझ्या वरामुळेच तुला शक्तीची भक्ती जडेल. वक्त्याच्या व श्रोत्याच्या कुलाचे रक्षण करणारी ती देवी श्रेष्ठ आहे. हजार मुखे असून शेषही तिचे वर्णन करू शकणार नाही. मृत्युंजयसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहे. चतुर्मुख ब्रह्मदेव, सर्वज्ञ विष्णु, सहा मुखांचा कार्तिकेय, योग्यांचा गुरू गणेश, प्रत्यक्ष चार वेद हे सर्वही तिची कीर्ती सांगण्यास असमर्थ आहेत. 

प्रत्यक्ष सरस्वतीही तिचे वर्णन करू शकली नाही. सनत्कुमार, धर्म, सनंदन, सनक, कपिल, सूर्य असे सर्वजण तिचे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत. मी तिचे कीर्तन कसे करणार ? साक्षात् ब्रह्मदेव, विष्णु, शिव हेही तिच्या पदकमलाचे चिंतन करीत असतात. ब्रह्मदेवापेक्षा गणेश अधिक जाणकार असून सर्वज्ञ शंभु त्याच्याहीपेक्षा अधिक जाणतो. कारण पूर्वी कृष्णाने गोलोकातील रासमंडळात एकांतात त्याला उपदेश दिला होता. नंतर पुढे शिवाने ते ज्ञान धर्मास दिले. धर्माने सूर्याला सांगितले. माझ्या पित्याने तप करून तिच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. 

हे सुव्रते, मी पूर्वी यमलोकाचे अधिपत्य घेण्याचे टाळीत होतो. मी तपाची इच्छा केली. तेव्हा पित्याने देवीचे चरित्र सांगितले. ते आता तू ऐक. 

सर्वांवर नियंत्रण करणारी तसेच सर्वांचे परिपालन करणारी ती देवी नित्यरूप, देहवान्, निराकार, निरंकुश, निर्गुण, निरामय, निर्लेप अशी आहे. तिच्या विकारांना प्रकृती म्हणतात. सर्वसाक्षी, सर्वाधारभूत परात्‌पर, प्रकृतीमय, परमात्मा व प्रकृती परस्पर भिन्न नाहीत. ती सच्चिदानंदरूपिणी आहे. 

प्रथम त्या देवीने गोपालसुंदरीरूप उत्पन्न केले, ते सुंदर, रमणीय, शामवर्ण असे किशोररूप अत्यंत लावण्यसंपन्न होते. मनोहर पद्मांची शोभाही त्याच्यापुढे फिकी पडेल. विविध भूषणांनी विभूषित चेहर्‍यावर स्मित असलेले, पीत वस्त्र परिधान केलेले, ब्रह्मतेजाने झळकणारे, राधेला प्रिय, रासमंडलात रत्नांच्या सिंहासनावर अधिष्ठित झालेले, हातात मुरली असलेले, द्विभुज, वनमाला धारण केलेले, वक्षस्थलावर कौस्तुभमणी विराजत असलेले, कुंकुम, अगरू, कस्तुरी, चंदन देहावर चर्चिले आहेत असे, मालतीपुष्पे ल्यालेले, भक्त ज्याचे नित्य पूजन करीत असतात असे ते रूप होते. 

ज्याला जगत्कर्ताही भयभीत होऊन सृष्टी निर्माण करतो, कर्माप्रमाणे पुरुषांचा हिशोब करतो, ज्याच्यायोगे विष्णू जगताचे पालन करतो, रुद्र संहार करतो, तो योगेश्वर प्रभू ज्याच्यामुळे ज्ञानी झाला. परमानंदरूप, भक्तीवैराग्ययुक्त, शीघ्र गमन करणारे, ज्याच्या भीतीमुळे वायू वाहतो, सूर्य उष्णता देतो, इंद्र वृष्टी करतो, मृत्यु प्राण्यांमध्ये संचार करतो, अग्नी दहन करतो, दिक्पाल दिशांचे रक्षण करतात, राशीचक्रे व ग्रह फिरत असतात अशा प्रकारचे सर्वाधारभूत असे सर्वत्र संचार करणारे ते स्वरूप होते. 

ज्याच्या आज्ञेने वायु जलराशींना धारण करतो, उदक कूर्माला आधार देतो, कूर्म अनंतास सावरतो, भूमी, समुद्र, पर्वत, रत्ने यांना आधार देतो, पृथ्वी क्षमारूप होते. 

अठठावीस युगे हे इंद्राचे आयुष्य होय. असे अठठावीस इंद्र म्हणजे ब्रह्मदेवाची एक अहोरात्र. असे तीन दिवस झाले म्हणजे एक महिना, दोन महिन्यांचा ॠतु, असे सहा ॠतूंचे एक वर्ष, ते ब्रह्मदेवाचे आयुष्य होय. ब्रह्मदेवाचा देहत्याग होताच हरीचे नेत्र मिटतात. यालाच लय असे म्हणतात. 

प्राकृतप्रलयासमयी चराचर सृष्टी वगैरे सर्व काही श्रीकृष्णाच्या नाभीकमली लीन होते. शेषशायी विष्णु कृष्णाच्या डाव्या बाजूला लीन होतो. त्याच्या ज्ञानामध्ये शिवाचा लय

होतो. दुर्गाशक्ती श्रीकृष्णाच्या बुद्धीमध्ये बुद्धीची अधिष्ठात्री देवता होते. श्रीकृष्णाचा अंश, देवांचा अधिपती जो गणपती तो त्याच्या बाहूमध्ये लीन होतो. पद्मेच्या अंशभूत देवीसहित लक्ष्मी राधेमध्ये लीन होते. गोपी वगैरे सर्व स्त्रियाही तिच्यात लीन होतात. 

श्रीकृष्णाच्या प्राणांची अधिष्ठात्री देवता राधा ही कृष्णाच्या प्राणामध्ये वास करते. वेद, शास्त्रे, सरस्वतीमध्ये लय पावतात. वाणी परमात्म्याच्या जिव्हेत लीन झाली. गोपाल त्याच्या लोमात लीन झाले. प्राण वायूत, अग्नी जठराग्नीत, जल जिव्हाग्रात, विष्णूभक्त चरणकमलात लीन होतात. विराटाचे सर्व अंश महाविराटात लय पावतात. महाविराट कृष्णात लय पावतो. ज्याच्या रोमरंध्रामध्ये विश्वब्रह्मांडे असतात, त्याच्या नेत्रोन्मीलनानंतर प्राकृत प्रलय होतो. नंतर त्याचे नेत्र उघडताच पुन्हा सृष्टी निर्माण होते. 

श्रीकृष्णाच्या नेत्रांच्या एका उघडझापीएवढया काळात ब्रह्मदेवाची शंभर वर्षे होतात. तेव्हा सृष्टीचा सूत्रलय होतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कणांची गणना करता येणार नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या सृष्टीची व प्रलयांची गणना करता येत नाही. त्या परमात्म्याच्या नेत्रांच्या उघडण्याच्या वेळी सृष्टी होते व नेत्र मिटताच प्रलय होतो. कृष्ण प्रलयकाली प्रकृतीमध्ये लीन होतो. 

पराशक्ती एकच असून निर्गुण ईश्वर परमपुरुष होय. पूर्वी सर्व जगत् सत होते. मूलप्रकृती अव्यक्त असून ती संज्ञायुक्त आहे. तिचे गुणकीर्तन करण्यास ब्रह्मांडात कोण समर्थ आहे ? 

वेदाज्ञेप्रमाणे चार प्रकारच्या मुक्ती आहेत. देवभक्ती ही सर्वात श्रेष्ठ व सालोक्य मुक्ती देणारी आहे. दुसरी सारुप्यमुक्ती, तिसरी सामिप्य मुक्ती व चवथी निर्वाणमुक्ती आहे. पण भक्तसालोक्य मुक्तीची अपेक्षा धरतात. शिवत्व, अमरत्व, ब्रह्मत्व, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, भय, शोक, धन, दिव्यरूपधारण, निर्वाण, मोक्ष या सर्वांना भक्त तुच्छ लेखतो. 

कर्माचा भोग भोगल्यानेच कर्मनाश होतो. कर्माचे खंडन करणे म्हणजेच श्रीविष्णूचे सेवन करणे होय. हे सावित्री, मी तुला सर्व ज्ञान सांगितले. आता तू सुखाने स्वगृही जा." 

असे म्हणून सूर्यपुत्र यमाने सत्यवानास जिवंत केले. सावित्रीने त्याला नमस्कार केला. त्याने तिला आशीर्वाद दिला. पण यम जाण्यास निघाल्याने तिला साधूवियोगाचे दुःख होऊन ती रडू लागली. तेव्हा धर्मराज म्हणाला, "पुण्यमय भारतभूमीत तू लक्ष वर्षे सुख भोगशील. शेवटी देवीलोकात जाशील. तू बहात्तर वर्षे सावित्रीव्रत कर. तेच स्त्रियांना मोक्ष देणारे आहे. 

भाद्रपदातील शुक्ल, अष्टमीस महालक्ष्मीचे व्रत करतात. ज्येष्ठातील शुक्ल चतुर्दशीला सावित्रीचे व्रत करावे. हे सावित्री, हे व्रत दहा वर्षे करावे. देवीस प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक शुक्ल षष्ठीस, मंगल षष्ठीस, आषाढातील संक्रातीस व्रत करतात. कार्तिकी पौर्णिमेस, राधेस, प्रत्येक शुक्लाष्टमीस विष्णूमायेस, भगवतीस, दुर्गेस, जगदंबेस, यंत्रात संबोधून यंत्राची पूजा करावी. अशाप्रकारे देवीचे नित्य पूजन करावे." 

असे सांगून धर्मराज स्वगृही गेला. सावित्री व सत्यवान स्वस्थानी परत आली. नंतर सावित्रीच्या पित्याला वराप्रमाणे पुत्र झाले. श्वशुरास नेत्र प्राप्त झाले. तसेच पुढे सावित्रीलाही पुत्र झाले. 

नंतर पुण्यक्षेत्र भारतात एक लक्ष वर्षे सुख भोगून आपल्या पतीसह ती देवीलोकाप्रत गेली. ती सूर्याची अधिदेवता, मंत्रांची अधिष्ठात्री देवता, वेदांचीही माता असल्यामुळे तिला सावित्री असे म्हणतात." 
=================================
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...